Monday, July 12, 2021

कृष्णा कारखान्याच्या अध्यक्षपदी डॉ सुरेश भोसले...

वेध माझा ऑनलाइन

कराड

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश भोसले यांची तसेच उपाध्यक्षपदी जगदीश जगताप यांची बिनविरोध निवड झाली. या कारखान्याची नुकतीच निवडणूक झाली हाेती. यामध्ये डाॅ. अतुल भाेसले यांच्या नेतृत्वाखाली जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला सभासदांनी सर्वच्या सर्व 21 जागा जिंकून देत विराेधकांना घरचा रस्ता दाखविला हाेता

आज (साेमवार) कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळाने सर्वानुमेत चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची नावे निश्चित केली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर यांनी डाॅ. सुरेश भाेसले आणि जगदीश जगताप यांची अऩुक्रमे चेअरमन, व्हाईस चेअरमन म्हणून बिनविराेध निवड झाल्याचे जाहीर केले

यावेळी डाॅ. सुरेश भाेसले यांनी मनाेगत व्यक्त केले. ते म्हणाले कृष्णा कारखाना निवडणुकीत यंदा सभासदांनी आम्हांला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. यामुळे आमच्यावरील जबाबदारी वाढली आहे. या जबाबदारीची जाणीव नवीन संचालक मंडळाला आहे. त्यादृष्टीने कारखान्याच्या हितासाठी व प्रगतीसाठी लगेचच कार्यरत होत आहाेत. सभासदांना अपेक्षित अशी कामगिरी आम्ही करुन दाखवू असा विश्वास डाॅ. भाेसले यांनी व्यक्त केला

No comments:

Post a Comment