वेध माझा ऑनलाइन
कराड
"कचऱ्या'वरून शहरातील राजकारण पेटत चालल्याचे चित्र सध्या निवडणूकीच्या तोंडावर दिसत आहे गेल्या काही महिन्यांपासूनचा येथील कारभाराचा पट पहिला तर शहराच्या राजकारणाचा कचरा झालाय की काय... अशी शंका यायला वाव आहे...लोकशाही गटाचे नेते सुभाषकाका पाटील एका पत्रकार परिषदेत म्हटलेही होते... गावाच्या राजकारणाचा तमाशा झालाय...आणि तंतोतंत तोच अनुभव येत असल्याची सध्या गावात चर्चा आहे...
कराड शहराला देशाचे माजी उपपंतप्रधान स्व यशवंतरावजी चव्हाण यांच्या नावाची ओळख आहे तर आदरणीय स्व पी डी पाटील साहेबांच्या कर्तत्वाचा आदर्श शहरासमोर आहे याच दोन ताकदीवर कराडला साता समुद्रापार ओळखलं जातं या दोघांच्याही कार्याला देश पातळीपर्यंत व त्याहीपलीकडे जाऊन गौरवले गेले आहे त्याचे भान कराडकर म्हणून प्रत्येकाला आहेच आणि अभिमानही... दिवंगत द शी एरम असतील, युनूसभाई कच्छी असतील, माजी नगराध्यक्ष जयवंत जाधव असतील तसेच भाजपा नेते राजाभाऊ देशपांडे असतील या सर्वांनी आपापल्या काळात शहराची यथायोग्य सेवा करत आपले योगदान देत शहर वासीयांना अभिमान वाटावा असे कर्तृत्व लोकांसमोर ठेवले आहे त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि कामाचा शहराला उपयोगच झाला आहे त्यांचाही अभिमान प्रत्येक कराडकराला आहे
त्या काळाची तुलना आत्ताच्या राजकारणाशी केल्यास त्यामध्ये जमीन अस्मान चे अंतर पडल्याचे दिसून येते याची कारणे देखील तशीच आहेत त्याकाळात जरी मतभेदाच्या भिंती होत्या तरी मनभेदाचे राजकारण होत नव्हते राजकारण संपले की विरोधाचे "कवच' बाजूला ठेवून एकत्र येत शहराच्या प्रगतीसाठीची पाऊले उचलली जायची त्यासाठी एकत्रपणे विचार करून त्याची अमलबजावणी होत असे त्याचाच परिणाम म्हणून आजही त्यावेळच्या घेतलेल्या अनेक सार्वजनिक निर्णयामुळे सध्याची पिढी आमचे शहर विकसनशील आहे असे अभिमानाने बोलताना दिसते ड्रेनेज ची व्यवस्था पाणी रस्ते कचरा निर्मूलन अशा सर्वच प्रकारच्या मूलभूत विषयाना केंद्रबिंदू मानून कारभार होत असे त्यामुळे सामान्य माणूस बिनझोक पणे त्या कारभारावर विश्वास ठेवताना दिसत होता हे त्यावेळच खास वैशिष्ट्य...
सध्याची राजकारणाची परिस्थिती जरा वेगळी झाली आहे... विशेषतः गेल्या काही महिन्यापासून... म्हणजे जोपर्यंत उपाध्यक्ष जयवंत पाटील आणि यादव गटाची एकमेकांबरोबर जवळीक दिसत होती तोपर्यंत पालिकेत काय राजकारण चाललंय याची भणक देखील लोकांना नव्हती... मात्र यशवन्त आघाडीकडे उपाध्यक्ष पद जाणार अशी चर्चा सुरू झाली आणि शहरातील राजकारणात माशी शिकली...त्यानंतर काही दिवसानी यादव गट व जयवंत पाटील गट वेगवेगळे वावरताना दिसू लागले उपध्यक्षानी तर स्वतंत्र बैठक व्यवस्थेची मागणी केली... यादवांना मानणाऱ्या नगरसेवकांचा वावर फक्त यादवांच्या भोवती दिसू लागला... तर जयवंत पाटील यांचे नगरसेवक स्वतंत्रपणे जयवंतदादांच्या भोवती दिसू लागले... एकूणच जनशक्तीत दुफळी झाल्याचे शहराला समजले आणि शहराच्या राजकारणाला अंधारी येवू लागल्याचे जाणवु लागले... दरम्यान विधानसभा निवडणुक झाली... त्यानंतर मात्र येथील राजकारण खऱ्या अर्थाने चव्हाट्यावर आले... स्वच्छ सर्वेक्षणात पहिला नंबर येण्यासाठी धडपड केलेल्या पालिकेचे तत्कालीन सी ओ डांगे यांनी सत्ताधार्यांमध्ये फूट पाडून मुख्याधिकार्यांच्या मुखवट्यातून स्वतः राजकारण करत अनेक भानगडी केल्या त्यांच्याबाबतीत अनेक आरोप वारंवार होतानाही दिसले... याचाच परिणाम म्हणून केवळ स्वच्छ शहराचा दिंडोरा वाजवून... 24 तास पाणी योजना,घनकचरा प्रकल्प, यासह महत्वाच्या कामांना दूर ठेवण्यात आले...यावरून भाजपा व जनशक्ती यांच्यात नेहमीच खडाजंगी पहायलाही मिळाली प्रभागात कामे होण्यावरून एकमेकावर आरोपही होताना दिसले... तर लोकशाही आघाडी या साडेचार वर्षात विरोधीपक्ष वाटलाच नाही... मात्र त्यांचा अधून मधून विरोध मात्र दिसायचा हेही खरे... त्यात गेल्या काही दिवसांपासून जनशक्ती व भाजप यांच्या पत्रकार परिषदेतून एकमेकांत अगदी खालच्या स्तरावर आरोप पहायला व ऐकायला मिळाले... निमित्त होते बजेटचे....या विषयावरून इतका "विकोप' अनुभवायला मिळाला की एकमेकांना टक्केवारी च्या आरोपात जनशक्ती व भाजपा अडकवताना दिसले...आणि शहरात याचीच चर्चा चघळून चघळून होऊ लागली... त्याबरोबरीने झालेले आणखी बरेच आरोप शहरात गाजले...लोकांसाठी अचानक हे सगळं नवीन होत... कारण अशाप्रकारचे पालिकेत प्रकार असू शकतात याची जाणीव लोकांना त्यानिमित्ताने झाली... लोक शहाणे झाले...त्यादरम्यान अतृप्त आत्मा...किंवा वासरात लंगडी गाय शहाणी...जनतेंनी तुम्हाला नापास केलय...असे त्यावेळचे एकमेकावर झालेले आरोप आजही चर्चेत असतात...एकूणच निवडणूक येईल तशी येथील राजकीय परिस्थिती खालच्या व व्यक्तिगत आरोप करण्यापर्यंत खालावली गेली... ही परिस्थिती आणखी दैनिय होतेय की काय... अशी भीती निर्माण झाली आहे...शहराचे बजेट अडकून राहिल्याचा प्रकार कराडच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्याचे ऐकिवात आले...त्यामुळे बजेटचा दंगा राज्यभर झाला... मात्र त्यावेळी शहरात चर्चा बजेटची नाही... तर कोणी कोणावर काय शेरेबाजी केली...काय आरोप केले... याची अधिक झाली... राजकारणाची पातळी किती खाली जाऊ शकते याची जाणीव यानिमित्ताने झाली...
मग प्रश्न आहे... कुठे आहे पहिले राजकारण..? ते राजकारणी...कुठे गेली तत्वे...विचार ? सगळंच सध्या अकलनिय वाटतय...आणि विचित्रही...त्यातच भर म्हणून आता शहरातील कचरा गाडीच्या टेंडरवर सही करण्यावरून व शहरातील कचरा गोळा करण्यावरून चाललेल्या राजकारणाचा "स्टंट' सध्या सोशल मिडियासह जनतेत जोरदार चर्चेत आहे...त्यावरूनदेखील एकमेकांवर चाललेले आरोप अद्यापही थांबता थांबेनात...टेंडर मध्ये इंटरेस्ट...आणि कोणा...कोणाचा...असाही त्यामागचा सूर आहे...हे सगळं का...कशासाठी...हे लोकांना आता कळतय...येत्या निवडणुकीत हे जे काही घडतंय ते सगळं लोक लक्षात ठेवणार आहेत...आणि यापुढे आपलं उत्तर देऊन शहराला चुकीच्या कचाट्यापासून नक्कीच वाचवणार आहेत...पण तोपर्यंत चर्चा आहे ती राजकारणाच्या झालेल्या या एकूणच घाण
"कचऱ्या' ची...सुभाषकाका पाटील यांच्या भाषेत सांगायचे झाले तर राजकारणाच्या झालेल्या तमाशाची...
No comments:
Post a Comment