कराड
भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी फडणवीस मुख्यमंत्री असताना शहराच्या विकासासाठी 5 कोटी निधी आणला होता त्यातला अडीच कोटीचा निधी शासन आदेश डावलून दोन नगरसेवकाच्या 2 कामासाठी वळवण्यात आला असल्याने 14 जुलै च्या सभेतील विषय क्रमांक 17 बाबतचा ठराव हा कलम 308 खाली रद्द करावा अशी तक्रार भाजपा चे पालिकेतील गटनेते अण्णा पावसकर यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याकडे केली आहे त्यामुळे स्वतःच्या फायद्यासाठी सरकारी निधीचा गैरवापर करण्याच्या प्रकारला यानिमित्ताने पायबंद बसेल असेही पत्रकात म्हटले आहे
पत्रकात म्हटले आहे की,भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष.विक्रम विनायक पावसकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना कराड शहराच्या विकासासाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून आणला होता.त्यामध्ये शहरातील २८ रस्त्यासाठी सुमारे २.५० कोटी निधी टाकण्यात आला होता. सदरचे रस्ते पूर्ण झालेले आहेत. उरलेला २.५० चा निधी हा शहरातील L.E.D. दिवे बसवण्यासाठी म्हणून आणलेला होता.परंतु सरकारने शहरातील L.E.D. दिवे बसवण्यासाठी नवीन अटी घालून योजना अमलात आणल्यामुळे सदरचा २.५० कोटी रुपयांचा निधी नगपरिषदेच्या अखत्यारीतील ४ जागांचा विकास करण्यासाठी म्हणून व ६ कामे गावातील ले आउट मधील विकास करण्यासाठी म्हणून ठराव करून तो शासनास देवून त्याला मंजुरी घेतली. या कामामध्ये, सोमवार पेठेतील जुन्या मतीमंद शाळेच्या ठिकाणी वाचनालय अभ्यासिका बांधणे. शॉपिंग सेंटर बांधणे. कुंभार पाणवठा येथील दशक्रिया विधी शेड सुशोभिकरण करणे, कृष्ण नाका प्लॉट मध्ये आभ्यासिका बांधणे.
वरील कामासाठी म्हणून १ कोटी ५५ लक्ष रुपये खर्च करावेत तसेच शहरातील ले आउट मधील ६ ओपन स्पेस
यासाठी ९५ लाख रुपये खर्च अपेक्षित केला परंतु नगरसेविका सौ.स्मिता हुलवान यांच्या वार्ड क्र.११ यामधील २ ओपन प्लॉट मध्ये २.५० कोटी रुपयांचा निधी बेकायदेशीरपणे खर्च करण्याचा घाट घातला गेला....... त्यावेळेला आम्ही तक्रार केल्यानंतर सदरचे बेकायदेशीर काम थांबवण्यात आले
नगरपरिषदेच्या विशेष सभेमध्ये याबाबतचा विषय क्रमांक १७ हा अतिशय घाईगडबडीत मंजूर करण्यात आला आहे शासन निर्णयानुसार कुठल्या कामावर किती खर्च करावा याचे स्पष्ट आदेश दिले आहेत शासनाचे आदेश डावलून मुख्याधिकारी डाके यांच्याकडून चुकीचा अहवाल घेवून त्यांच्या सहकार्याने कल्याणी कॉलनीमध्ये जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांचा बंगला असल्याने व नगरसेविका सौ.स्मिता हुलवान यांचा वार्ड क्र.११ येत असल्याने बेकायदेशीरपणे ठराव करून स्वतःच्या
वार्डात व स्वतः च्या गटनेत्यांच्या बंगल्याशेजारील भाग विकसित करण्याचा घाट घातला गेला आहे. तरी नगरपरिषदेच्या विकास कामामध्ये अडथळे आणून शहराचा विकास न करता सरकारकडून आलेल्या निधीचा वापर फक्त २ कामावर करून स्वतःचा फायदा करून घेण्याचा घाट घातला गेला असून यासाठी या ठरवास आमचा विरोध आहे ३०८ खाली हा ठराव रद्द करण्यात यावा अशी मागणी गटनेते अण्णा पावसकर यांनी केली आहे त्यामुळे स्वतःच्या फायद्यासाठी सरकारी निधीचा गैरवापर करण्याच्या प्रकारला पायबंद बसेल असेही पत्रकात म्हटले आहे
No comments:
Post a Comment