Sunday, July 11, 2021

नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदेचे आरोग्य सभापतींवर घणाघाती आरोप... म्हणाल्या... गुंड्याभाऊ वाटेगावकरांमुळे शहरात घंटा गाड्या फिरल्या नाहीत...वाटेगावकर गलिच्छ राजकारण करतात...

वेध माझा ऑनलाइन
कराड
घंटागाडी प्रकरणावरून झालेले राजकारण हे अतिशय निंदनीय ,घाणरडे राजकारण असल्याचे सांगत नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे आरोग्य सभापतीवर चांगल्याच बरसल्या स्वतःला सर्वज्ञ समजणारे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी मुद्दाम हे घंटा गाडी विषयीचे राजकारण घडवून आणले आहे. काही विशिष्ट ठेकेदारांची मोठी बिले, आणि मोठी टेंडर  सह्याला आली, कि दुस-या मिनटाला मी सह्या केल्या पाहिजेत हीच त्यांची गेल्या साडेचार वर्षात भूमिका राहिली आहे, नगरपालिकेची मिटिंग असुद्या,चर्चा असुद्या ह्यांना फक्त विशिष्ठ मोठ्या ठेकेदरांची बिले,मोठी टेंडर यातच यांचा जास्त इंटरेस्ट असतो असा गौपयस्फोट करत घंटा गाड्या त्यांच्यामुळेच शहरातून फिरल्या नाहीत वाटेगावकर शहरात गलिच्छ राजकारण करत आहेत असा शेराही त्यांनी लगावला आहे. 

दरम्यान मी गेल्यावर्षी  कोरोना पोजीटीव होऊन गेल्यानंतर त्याचे साइड इफेक्ट जाणवू लागल्याने  सध्या पोस्ट कोविड संदर्भात डोळ्याच्या काही treatment घ्याव्या लागत आहेत यासाठी शुक्रवारी ९ जुलै रोजी मी दावाखान्यात दाखल होते,  शनिवार व रविवार शासकिय सुटी असल्याने सोमवारी सदर टेंडरवर मी सह्या करून देते असे  सांगितले होते, याबाबत मी मुख्याधिकारी यांच्याशी बोलले होते. व त्यांना  काम सुरु ठेवा कोणत्याही परिस्थितीत काम थांबवू नका असे आदेश दिले होते. संबधीत ठेकेदार यांना सुद्धा मी याच सूचना दिल्या होत्या. ठेकेदार यांनी काम सुरु करण्यास मान्यता दिली होती असा खुलासाही त्यांनी याविषयी केला आहे

 प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्या पुढे म्हणतात... ,आपल्या अधिकारकक्षेच्या बाहेर जावून दुस-यांच्या अधिकारात ढवळाढवळ करायची, आणि सर्व नगरपालिका मीच चालवतो असा अविर्भाव आणून  दुस-याला कमी लेखायचे, इतर सभापतींच्या अधिकारात लक्ष घालायची अशी सवय वाटेगावकर याना आहे एवढेच नाही तर मी औषध फवारणीसाठी नगरपरिषद कर्मचा-यांना घेवून निघाले तेव्हा त्यांनी या कर्मचा-यांना दमदाटी करून व मुख्याधिकारी यांच्यावर दबाव टाकून शहरातील औषध फबरणी बंद करायला लावली. कोरोनाच्या काळात सुद्धा यांनी गलीच्छ राजकारण केले आहे. शहराच्या प्रश्नासंदर्भात नगरपरिषदेच्या निघणा-या प्रत्येक मिटिंग मध्ये सुरुवातीलाच कोणतीही परवानगी न घेता सभा कश्या पद्धतीने उधळली जाईल यासाठी निरर्थक व संदर्भहीन वाद निर्माण करून सभा बंद पडण्याचा उद्योग ते करत असतात. जनशक्ती मध्ये मी एकटाच नेता म्हणून अभ्यासू कसा आहे हे दाखवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो

घंटागाडी टेंडर संदर्भात बुधवार दिनांक ७ जुलै २०२१ रोजी दुपारी सदर टेंडर माझ्याकडे साहि ला आले. कोणतीही गोष्ट सहि ला आली कि त्याची संपूर्ण माहिती घेऊन मगच प्रोसेस होऊन सही होत असते. माहितीसाठी मी आरोग्य अधिकारी श्री.भालदार यांना निरोप दिला असता ते सातारा येथे मिटींगला गेले आहेत असे कळले.त्यामुळे, त्यादिवशी चर्चा होऊ शकली नाही . गुरुवार दिनांक ८ जुलै २०२१ रोजी नगरपरिषदेची विशेष सभा होती.सभेनंतर या टेंडर मधील मला काही गोष्टींची माहिती घेण्यासाठी मी सर्व फाईल्स मागून घेतल्या. उपनगराध्यक्ष आणि अण्णा पावसकर यांच्याशी  या टेंडर मधील त्रुटीबाबत चर्चा केली. 

  रविवारी सकाळी ७.३० वाजताच आरोग्य सभापती यांनी नगरपालिकेत येवून संबधित कर्मचारी व ठेकेदार यांना तुम्हाला ऑर्डर नाही तुम्ही काम करायचे नाही. असे सांगून मुद्दाम काम सुरु करू दिले नाही.  लगेच एवढ्या सकाळी पत्रकारांना बोलवून उलट सुलट बातम्या यांनीच पत्रकाराना दिल्या आहेत.यामागे निव्वळ राजकारण असून राजकीय स्टंट निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पालिकेची येणारी निवडणूक पाहता त्यांच्याकडून असे प्रकार वारंवार घडवून आणून जाणीवपूर्वक मला व भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचा हा त्यांचा केविलवाणा व निरर्थक प्रयत्न  सुरु आहे.
कराड शहरात गेली १६ वर्ष स्वच्छता अभियान अतिशय चांगल्या प्रकारे राबवले जात असून शहरातील नागरिक हे  सुज्ञ आहेत. हे  नागरिक,गृहिणी स्वच्छता अभियानला  चांगल्या प्रकारे साथ देत आहेत, कोणत्याही भागात एखाद्या अडचणीमुळे जर घंटागाडी आली नाही तर नागरिक हा कचरा घरातच ठेवतात. ते कधीही हा कचरा रस्त्यावर फेकत नाहीत.   दुस-या दिवशी गाडी आल्यावर त्यामध्ये तो कचरा टाकला जातो. परंतु आज एकच दिवस निव्वळ नगरसेवक वाटेगावकर यांच्या आडमुठी  राजकारणामुळे संपूर्ण कराड शहरात घन्टागाड्या जावू शकल्या  नाहीत,  आणि या उलट यानीच  शहरात  कचरा साठला, रस्त्यावर पडला, असा कांगावा केला.यामुळेच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे हा त्यांचा आरोप म्हणजे मला बदनाम करण्यासाठी रचलेले कुभांड असून असे बिनबुडाचे आरोप करताना त्यांनी शहरातील नागरिकांच्या सुज्ञपणाचा देखील अपमान केला आहे. पुढील काळात येणा-या निवडणुका पाहता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आपल्या कराड नगरपालिकेसारख्या मातृसंस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न वाटेगावकर यांनी करू नये असा इशाराही त्यांनी आपल्या निवेदनातून दिला आहे

No comments:

Post a Comment