कराड
शहरातील समस्त मुस्लिम समाज हापिझ उलमा कमिटी आणि मोमीन मोहल्ला बैतुलमाल कमिटी यांच्या वतीने चिपळूण येथिल पुरपीडित जनतेला मदतीचा हात नुकताच देण्यात आला मुस्लिम समाजाने अवघ्या काही तासात लाखोंची मदत चिपळूण कडे रवाना केली त्यांबद्दल शहरातून त्यांच मोठं कौतुक होतंय
मुस्लिम समाजाचे योगदान नेहमीच शहरातील कोणत्याहि अडचणींवेळी आवर्जून दिसून येते
मागील वर्षी ची पूरपरिस्थिती असो... कोविड चे संकट आसो...कुपोषित बालकांना मदतीचा विषय असो...आणि आता सध्याची पूरपरिस्थिती असो... येथील मुस्लिम समाज नेहमीच जनतेच्या मदतीसाठी धावून आला आहे
गेल्या आठवड्यात सर्वत्र पावसाचा अक्षरशः हाहाकार झाला त्यात विशेषतः चिपळूनमध्ये अनेकजण बेघर झाले,मृत्यू मुखी पडले तर अनेकजण बेपत्ता झाले त्याठिकाणी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांची वानवा झाली वृद्ध लोक लहान मुले महिला यांचे हाल महाराष्ट्राला पाहवेनात सम्पूर्ण राज्यातून चिपळूण मधील पीडितांसाठी मदतीचा ओघ येऊ लागला अनेक संवेदनशील लोक वाटेल त्या मार्गाने त्याठिकाणी सहायय करण्यासाठी पुढे येऊ लागले
येथील समस्त मुस्लिम समाज मोमीन मोहल्ला बैतुलमाल कमिटी यांच्यावतीने चिपळूण मध्ये मदत पोचवण्यासाठी धडपड सुरू केली आणि अवघ्या काही तासातच त्याठिकाणी लाखो रुपयांची मदत उभी राहिली अन्नधान्य अंथरून पांघरून औषधे कपडे अशा अनेक प्रकारची मदत घेबून मुस्लिम समाजातील युवक चिपळूणला रवाना झाले
येथील नगरसेवक फारुख पटवेकर बरकत पटवेकर याकूब वाईकर शेरु कुरेशी मुसद्दीक वाईकर अब्राहम मुल्ला यांच्यासह पटवेकर यांच्या अनेक सहकाऱ्यांनी पुढे येऊन ही मदत पोच करण्यासाठी प्रयत्न केले
कोविड संकटात देखिल मुस्लिम समाजाने कराडात मोठे काम केले आहे कोविड सेन्टरची उभारणी करून अनेकजणांना मोफत उपचार त्याठिकाणी देत अनेक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत व त्यानिमित्ताने रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्यदेखील या समाजाने फुलवले आहे नेहमीच येथील मुस्लिम समाज जनतेला संकटात सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी जनसेवेसाठी अग्रेसर राहिला आहे
No comments:
Post a Comment