Tuesday, May 31, 2022

सिलेंडर पुन्हा झाले स्वस्त...पहा किती रुपयांनी झाली दर कपात?

वेध माझा ऑनलाइन - महिगाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी काहीसा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलेंडरचे दर महिन्यांच्या पहिल्या तारखेला बदलले जातात. आजही एलपीजी सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार कमर्शियल सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने एलपीजी सिलेंडरच्या दरात ही कपात केली आहे. आता इंडेन गॅसचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त झाला आहे.मात्र 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती सिलिंडर सध्या 19 मे रोजी जारी केलेल्या दराने विकले जात आहे.

दिल्लीत कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत सर्वाधिक कपात करण्यात आली आहे. येथे 19 किलोचा एलपीजी सिलिंडर आज 136 रुपयांनी स्वस्त झाला आहे, तर कोलकाता येथे किमती 133 रुपयांनी कमी झाल्या आहेत. याशिवाय, मुंबईत 135.50 रुपयांनी प्रति सिलेंडरची किंमत कमी झाली आहे, तर चेन्नईमध्ये सिलेंडरची किंमत आज 135 रुपयांनी कमी झाली आहे.

राज ठाकरे यांच्या रिपोर्टमध्ये कोविडच्या डेड सेल्स सापडल्या, पण हा कोरोना नाही...त्यांची होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची उद्या होणारी शस्त्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या रिपोर्टमध्ये कोविड डेड सेल्स असल्याचं निदान झालं असून त्यामुळे त्यांना अॅनास्थेशिया देणं शक्य नाही. या वैद्यकीय कारणास्तव ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. 

कोविडच्या डेड सेल्स सापडल्या, पण हा कोरोना नाही
बुधवारी राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यासाठी ते मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांच्या विविध वैद्यकीच तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये त्यांच्या शरीरात कोविड डेड सेल्स असल्याचं आढळलं. या सेल्स डेड असल्याने त्यांना कोरोनाची लागण नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे त्यांना अॅनास्थेशिया म्हणजे भूलीचं इंजेक्शन देण्यात येऊ शकणार नाही. त्यामुळेच आता ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून राज ठाकरे आता त्यांच्या घरी परतले आहेत. 
राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. 

सातारा जिल्हा आज कोरोनामुक्त ; राज्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली... वाचा सविस्तर

वेध माझा ऑनलाइन -  महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मास्कची देखील सक्ती नाही.कोरोना संपलाय, अशी आशा बाळगत असाल तर आज राज्याची चिंता वाढवणारी  माहिती  समोर आली आहे.  राज्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मंगळवारी  राज्यात 711 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 366 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान सातार जिल्हा कोरोनामुक्त आहे


राज्यात 3475 सक्रिय रुग्णांची नोंद
राज्यात आज एकूण 3475 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 2526 रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल  ठाण्यामध्ये 413  इतके सक्रिय रुग्ण आहेत.
आज एका कोरोनाबाधिताचा मृत्यूची नोंद
राज्यात आज एका कोरोनाबाधिताचा मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,35, 751 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.08 टक्के इतके झाले आहे. 
भारतातील कोरोना विषाणू संसर्गाचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 338 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी 2706 कोरोना रुग्णांची नोंद आणि 25 रुग्णांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी आकडेवारी जारी करत ही माहिती दिली आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच सोमवारी दिवसभरात 2 हजार134 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून देशात आतापर्यंत 4 कोटी 26 लाख 15 हजार 574 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 19 कोरोना रुग्णांनी प्राण गमावला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 5 लाख 24 हजार 630 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.


प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी ; अविनाश भोसलेंना मुंबईबाहेर नेण्यास कोर्टाची मनाई....

वेध माझा ऑनलाइन - येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा भोसलेंचा दावा कोर्टाने फेटाळला आहे. तसेच सीबीआयला अविनाश भोसलेंना मुंबईबाहेर नेण्यास मनाई कोर्टाने केली आहे. 

सीबीआयने अविनाश भोसले यांना 26 मे रोजी पुण्यातून  अटक केली होती. त्यानंतर मुंबईतील सीबीआय कोर्टात त्यांना 27 मे रोजी हजर करण्यात आले होते. सीबीआयनं भोसलेंची 10 दिवसांकरता रिमांड मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रिमांडला विरोध केला होता. कोर्टाने हा दावा फेटाळला आहे.

कोण आहेत अविनाश भोसले?
अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रूपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे

Monday, May 30, 2022

31 मे रोजी पेट्रोल-डिझेल खरेदी बंद आंदोलनाची हाक ; महाराष्ट्रासह देशातील 19 राज्यांत होणार हे आंदोलन...

वेध माझा ऑनलाइन - ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनने विविध मागण्यांसाठी 31 मे रोजी पेट्रोल-डिझेल खरेदी बंद आंदोलनाची हाक दिली आहे. महाराष्ट्रासह देशातील 19 राज्यांत हे आंदोलन करण्यात येणार आहे.दरम्यान, ३१ मे रोजी एकही पेट्रोल पंप कंपन्यांकडून इंधन खरेदी करणार नाही. यामुळे १ जून रोजी पेट्रोल, डिझेलची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. यामागे फामपेडाने अन्यायकारक कर कपात केल्याचे कारण दिले आहे. पंपचालकांनी कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे.

 सध्या डिझेलमागे प्रति लीटर ३.५० रुपये आणि आणि पेट्रोलमागे प्रति लीटर ३.२५ रुपये कमिशन दिले जाते. हे कमिशन वाढलेल्या दरांच्या तुलनेत परवडत नाही, अशी ओरड पेट्रोल पंप मालकांची आहे. फेडरेशनच्या मते, ‘‘पेट्रोलियम डिलर्स वर्षांनुवर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी राबत आहेत. नोटाबंदीसारख्या आव्हानात्मक निर्णयात आम्ही शासनाला पूर्ण सहकार्य केले. त्यानंतर प्रशासकीय चौकशीला आम्हाला सामोरे जावे लागले. करोनाकाळातही आम्ही जोखीम पत्करून सेवा दिली. गेल्या पाच वर्षांत आमच्या भांडवली गुंतवणुकीत दुपटीने वाढ झाली. मात्र, उत्पन्न वाढले नाही.’’
दरबदलाच्या चुकीच्या धोरणांमुळे आम्हाला अनेकदा मोठय़ा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते, असे पंप चालकांचे म्हणणे आह़े  इंधन दरबदल करताना डिलर्सना कधीही विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे दर कमी झाल्यावर डिलर्सचे प्रचंड नुकसान होते. पेट्रोल पंप चालकांसाठी शासनाने एक धोरण तयार करण्याची गरज आहे. या मागणीसाठी ३१ मे २०२२ रोजी देशव्यापी खरेदी बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे, असे या संघटनेने म्हटले आह़े.पेट्रोलियम पदार्थांवरील कमिशन वाढविण्याबाबत केंद्र सरकार व तेल विपणन कंपन्या यांनी चालविलेल्या टोलवाटोलवीच्या निषेधार्त हे आंदोलन असले तरी सामान्य लोकांना त्रास होऊ नये म्हणून पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता म्हणाले, या दिवशी आमच्याकडील शिल्लक असलेले पेट्रोल व डिझेल विकले जाईल. साठा संपल्यावर ३१ मे रोजी एक दिवस कोणताही डिलर कंपनीकडून पेट्रोल-डिझेल खरेदी करणार नाही.

कृष्णा कारखान्याच्या मोफत घरपोच साखर वितरणास प्रारंभ ; कारखाना कार्यक्षेत्रातील गावांमध्ये नियोजनानुसार वितरण होणार; सभासदांना दिलासा...

वेध माझा ऑनलाइन -  यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सभासदांना देण्यात येणाऱ्या मोफत घरपोच साखर वितरणाचा प्रारंभ करण्यात आला. कारखाना कार्यस्थळावर मान्यवरांच्या हस्ते साखर पोत्यांच्या वाहनांचे पूजन करण्यात आले. 

जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने चेअरमन डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रत्येक सभासदास दिली जाणारी प्रतिशेअर ६० किलो मोफत साखर घरपोच देण्याचे अभिवचन दिले होते. या अभिवचनाची वचनपूर्ती गेल्या वर्षी केली होती. यंदाही या मोफत घरपोच साखर वितरणाचा प्रारंभ करण्यात आला आहे.  पहिल्या दिवशी कारखाना कार्यक्षेत्रातील कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक, वाळवा तालुक्यातील इस्लामपूर, तर कडेगाव तालुक्यातील  देवराष्ट्रे या गावात सभासदांना साखर वितरण करण्यात आले. कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावांमध्ये नियोजनानुसार मोफत घरपोच साखर वितरित केली जात आहे. 

प्रारंभी कारखाना कार्यस्थळावर संचालक बाजीराव निकम, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, वैभव जाखले, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील , सेक्रेटरी मुकेश पवार, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साखर पोत्यांच्या वाहनांचे पूजन करून वाहने रवाना करण्यात आली.  

कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावामध्ये सोसायटीचे अध्यक्ष व्ही.के. मोहिते, माजी प.स सदस्य संजय पवार यांच्या हस्ते सभासदांना साखर पोत्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी सोसायटी संचालक प्रकाश धर्मे, राजेंद्र पवार, दिनकर सपकाळ, कृष्णत कापुरकर, रामभाऊ सातपुते, गणेश कदम, दत्तात्रय चव्हाण, श्रीपती हिवरे, जगन्नाथ बनसोडे, शरीफ कालेकर, आनंदा कापुरकर आदी उपस्थित होते. 

वाळवा तालुक्यातील इस्लामपूरमध्ये संचालक संजय पाटील यांच्या हस्ते सभासदांना साखर पोत्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी सदाशिव पाटील, मारुती देसाई, प्रकाश शिंदे, बाळासाहेब जाधव ,गजेंद्र पाटील, प्रकाश पाटील,बबन पाटील, संजय पाटील,दिगंबर जाधव,नामदेव जाधव,रवी कुलकर्णी,संपतराव पाटील, कैलास पाटील व सभासद उपस्थित होते.

कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे गावांमध्ये संचालक बाबासो शिंदे यांच्या हस्ते सभासदांना साखर पोत्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी आत्माराम शिंदे, धोंडीराम कुरळे, दिनकर पाटील, निवास महिंद, पांडुरंग मोरे, राजेंद्र मोरे, वसंत शिरतोडे आदी उपस्थित होते.

पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाल्याची शक्यता ; हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्तीकडून राज्यकारभार सुरू असल्याचा ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 च्या प्रमुखांचा दावा...

वेध माझा ऑनलाइन - रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन महिन्यांहून जास्त काळ युद्ध सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुतीन यांची तब्बेत बिघडल्याचं सांगितलं जातंय. त्यातच पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला असू शकतो असा दावा हा ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा  MI6 च्या प्रमुखांनी केला आहे.

हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्तीकडून राज्यकारभार...

पुतीन यांचा मृत्यू झाल्याची बातमी बाहेर आली तर एकच खळबळ उडण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळेच त्यांच्यासारखाच दिसणारा, देहबोली असणाऱ्या व्यक्तीकडून राज्यकारभार चालवला जात असल्याचा दावा  MI6 च्या प्रमुखांनी केला आहे. याबाबत ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळाने 'द डेली स्टार'च्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कॅन्सर असल्याचं मध्यंतरी सांगितलं जात होतं. त्यावरील उपचारासाठी ऐन युद्धाच्या काळात पुतीन हे सुट्टीवर जाणार होते. पुतीन यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पुतीन त्यांच्या अनुपस्थितीत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख आणि एफएसबी या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख निको हे सांभाळणार असल्याचे वृत्त होते

Sunday, May 29, 2022

संभाजीराजे छत्रपती आणि शिवेंद्रसिंहराजे यांची साताऱ्यात भेट ; राज्यभर चर्चेला उधाण...

वेध माझा ऑनलाइन - राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडीवरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. श्रीमंत शाहू महाराजांनी छत्रपती संभाजीराजेंवर टीका करत शिवसेनेची बाजू घेतल्याने नवा वाद सुरु झाला आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेतली तर त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यादरम्यान आता आणखी एका भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. संभाजीराजे छत्रपती आणि आणि शिवेंद्रसिंहराजे यांची साताऱ्यात भेट झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी येथे ही धावती भेट झाली. यामुळे भविष्यात दोन्ही राजे एकत्र येऊन राज्याच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याची चर्चा रंगली आहे. दोन्ही राजेंच्या भेटीने चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंचा गेम केला असल्याचं वक्तव्य आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केलं होतं. यावर संजय राऊत आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवेंद्रसिंहराजेंना प्रत्युत्तर देत आगीत तेल ओतू नये अशी टीका केली होती.


कराडची पालिका निवडणूक दोन्ही काँग्रेस महाआघाडी म्हणून एकत्र लढणार!भाजप मात्र चिन्हावरच लढणार ; ,स्थानिक आघाड्यांची भूमिका काय ? कराडमध्ये चर्चा ;

वेध माझा ऑनलाइन - शहराची वॉर्ड रचना व आरक्षण प्रक्रिया पूर्ण होऊन आता तोंडावर येऊन ठेपलेली येथील पालिकेची निवडणूक पक्षीय विचारधारेशी बांधील असणे येथील जनतेला अपेक्षित आहे म्हणूनच ही निवडणुक पक्षचिन्हावर होण्याबाबत मागणी होत आहे. या निवडणुकीतून भाजपाने पक्षचिन्ह घेऊन लढणार असे जाहीर केले आहे तर काँग्रेस देखील पक्षचिन्ह घेऊन लढेल अशी चर्चा आहे शहरातील राष्ट्रवादी पार्टी म्हणून ओळख असणाऱ्या लोकशाही आघाडीने आपण आघाडी म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते शशिकांत शिंदे यांनी आम्ही महाआघाडी म्हणून एकत्र येऊन ही निवडणूक लढू असे काही दिवसांपूर्वी कराड येथे आले असता सांगून टाकले आहे
एकूणच शहरातील राजकारणाचा "ट्रेंड'  बदलेल अशी ही निवडणूक यावेळी होईल अशी अशा आहे... संधीसाधू राजकारण त्यामुळे थांबेल आणि ते थांबवण्यासाठी आवश्यक घडामोडी पडद्यामागे सुरू झाल्याचे समजते  म्हणूनच...इथले आमदार खासदार मंत्री अजूनही गप्प आहेत ? अशीही चर्चा आहे...

येथील पालिका निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे.राज्याच्या राजकारणाचा परिणाम नेहमीच स्थानीक राजकारणावर दिसून येतो. त्यानुसार त्या त्या ठिकाणी घडामोडी घडत असतात..त्याचेच प्रत्यंतर झालेल्या पदवीधर निवडणूकित दिसून आले. अपवाद वगळता झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकाही याच धर्तीवर पार पडल्या व  निकालदेखील त्याच प्रमाणात दिसून आले. येथील नगरपरिषदेची सद्य परिस्थीती पहिली तर, स्वच्छ सर्वेक्षणच्या नावाखाली इतर कामाना तितकेसे महत्व शहरात दिले गेले नाही असे गेल्या पंचवार्षिक मध्ये दिसून आले आहे. त्यामुळे अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबीतच आहेत. येथील काही लोकप्रतिनिधींनी आपल्या वॉर्डामधील कामे होण्यासाठीचे प्रयत्न  डोळ्यासमोर निवडणूक ठेवून सुरू ठेवले आहेत. त्यापैकी काहींच्या बाबतीत "वेळ निघून गेल्याचे" प्रत्यंतर येण्याची शक्यता आहे, तर काहीजण सातत्याने लोकांची कामे करत जनतेच्या मनातील आपली जागा "अभाधित" ठेवण्यात यशस्वी होतील अशीही शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे.भाजपाचे संख्याबळ अधिक असूनदेखील ते विरोधात आहेत. असे असताना महाविकास आघाडीची संकल्पना पदवीधर व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत लोकांना फारशी रुचनार नाही अशी अनेकांची धारणा होती मात्र ती सपशेल फोल ठरली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पदवीधर निवडणुकीत याच महाविकास आघाडीला सुशिक्षित मततदारांनी अक्षरशः डोक्यावर घेत भाजपला बाजूला केले व आपला कौल दिला. ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र भावकीचे गणित दिसून आले, तेथील राजकारणात पारंपरिक विरोध व जुळवाजुळवीचे राजकारण असे स्वरूप पहायला मिळाले मात्र शहरातून महाविकास आघाडी पसंतीस उतरल्याने दिसले, म्हणजेच ग्रामीण व शहरी भागात राजकारणाचे गणित वेगवेगळे घडत असल्याचे जाणवले.त्यामुळे शहरी राजकारणात पक्षीय राजकारणाचा फॉर्म्युला महाविकास आघाडी म्हणून यशस्वी झाला हे सिद्ध झाले.  

कराड शहरातील लोकांनादेखील यावेळची पालिका निवडणूक वेगळ्या धाटणीची हवी आहे.दरम्यान यापूर्वीच्या झालेल्या येथील काही निवडणुकीच्या माध्यमातून आपला केवळ वापरच झाला... अशी इथल्या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची भावना झाल्याचे समजते,... म्हणूनच एकमेकांच्या विरोधात उभे राहून दोघांचेही नुकसान करून घेण्याच्या मानसिकतेत काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आता दिसत नाहीत, त्यामुळे कदाचित दोन्ही काँग्रेस महाविकास आघाडीचा फॉर्म्युला घेऊन निवडणुकीत उतरतील असा अंदाज आहे... आता ताकही फुंकून पीत कराड पालिका निवडणुकीसाठी पुढची वाटचाल करताना दोन्ही काँग्रेसची भूमिका दिसेल हेही तितकेच खरे आहे... तर दुसरीकडे आमचाही शहराच्या राजकारणात सोयीपुरता वापर झाला अशी चर्चा भाजपाचे नेतेही शहरात करताना दिसत आहेत.

गेल्या पंचवार्षिक कालावधीत शहराच्या राजकारणात लोकशाही आघाडी,जनशक्ती आघाडी,आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानणारे नगरसेवक, व भाजपाचे नगरसेवक असे चार गट कार्यरत राहिले. मात्र होणाऱ्या यावर्षीच्या निवडणुकीत नव्याने काही पक्ष पार्ट्या किंवा युत्या पुढें येतात का?हे पाहणे महत्वाचे  आहे, दरम्यान गेल्या पंचवार्षिक मध्ये जनशक्ती आघाडीमध्ये उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांना मानणारे नगरसेवक,जाधव समर्थक नगरसेवक, आणि यादव समर्थक नगरसेवक असे मिळून सत्तारूढ म्हणून दिसले, तर नगराध्यक्षपद भाजपकडे होते. भाजपाने मागील निवडणूक पक्षचिन्हावरच लढली होती त्यावेळी नगराध्यक्षपदासाठी त्यांना पक्षचिन्हाचा फायदाच झाला.याहीवेळी पुन्हा भाजपा पक्षचिन्हावरच लढणार आहे.काँग्रेसची देखील पक्ष चिन्हावरच लढण्याची मानसिकता दिसत आहे तर, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आम्ही महाआघाडी म्हणून लढू असे  जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी कराडात येऊन स्पष्ट केले आहे मात्र येथील राष्ट्रवादीचा मानला जाणारा पालिकेतील गट लोकशाही आघाडी म्हणून लढेल असे आघाडीच्या नेत्यांकडून काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते... पण प्रत्यक्ष लढण्याची वेळ आल्यास त्यांची भूमिका काय असणार हेही पहावे लागणार आहे...ऐनवेळी दोन्ही काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून एकत्र येवून लढतील असा कयास आहे...शहरातील संधीसाधू राजकारणाला दूर ठेवण्यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र येणार असल्याचे समजते... त्याकरिता शिवसेनेला बरोबर घेत या निवडणुकीत  15 -15 - 1 किंवा 14 - 14 - 3 असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे...हे घडवून आणण्यासाठी पडद्यामागच्या हालचाली सुरूही झाल्या आहेत ? म्हणूनच इथले आमदार, खासदार, मंत्री अजूनही गप्प आहेत ? अशीही चर्चा आहे...

छत्रपती संभाजी महाराज स्मारक संवाद यात्रेस प्रारंभ - कराड तालुक्यात गावोगाव दिली जातेय स्मारकाची माहिती...

वेध माझा ऑनलाइन - येथील शंभूतीर्थावर उभारण्यात येणाऱया स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या उभारणीत लोकसहभाग वाढावा, या हेतुने शंभूतीर्थ संवाद यात्रेचा शुभारंभ झाला आहे. या माध्यमातून कराड तालुक्यातील गावोगाव या भव्य स्मारकाची माहिती देण्यात येत आहे. त्याचबरोबर स्मारक निधी संकलन सुरू करण्यात आले आहे.

येथील शंभूतीर्थावर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. हे स्मारक राज्यातील भव्य स्मारक ठरणार असून एकूण सात कोटी रूपयांचा हा प्रकल्प आहे. या स्मारकात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा, संग्रहालय, स्पर्धा परीक्षार्थींसाठी अभ्यासिका व ग्रंथालय असणार आहे. स्मारक उभारणीसह समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यासाठी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजा स्मारक समिती कार्यरत आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी कराड शहरासह संपूर्ण तालुक्यातील गावांचा सहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत नुकताच छत्रपती संभाजी महाराजा जयंती सोहळा थाटात साजरा करण्यात आला आहे.
कराड तालुक्यातील गावोगावच्या शिवशंभूप्रेमींना या स्मारकाची माहिती व्हावी, यासाठी समितीच्या वतीने शंभूतीर्थ संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक गावात जाऊन समितीतर्फे नियोजित स्मारकाची माहिती दिली जात आहे. तसेच हे स्मारक लोकसहभागातून उभारण्यात येणार असल्याने निधी संकलनासही हातभार लावावा, असे आवाहन करण्यात येत आहे. आतापर्यंत मालखेड, बेलवडे बुद्रुक, कासारशिरंबे, कालवडे, टेंभू, कोरेगाव, कार्वे आदी गावांमध्ये बैठका झाल्या आहेत. गावोगावाचे ग्रामस्थ आणि शिवशंभूप्रेमी तरूणांनी या स्मारकाच्या उभारणीत सक्रीय योगदान देण्याची ग्वाही दिली आहे. कराड शहरालगतच्या गावांमध्ये पहिल्या टप्प्यात बैठका घेण्यात येणार असून त्यानंतर संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये बैठका घेण्यात येणार आहेत.
स्मारक समितीच्या वतीने या कार्यात व्यापक लोकसहभाग वाढवण्यासाठी क्रियाशील सदस्य व मार्गदर्शक समितीची निवड करण्यात येणार आहे. या समित्यांत काम करण्यासाठी इच्छुक असणारांनी रणजितनाना पाटील (9922750444),  प्रताप इंगवले (8830208029), जॉन्टी थोरात ( 9822684533), सुनील शिंदे (7798691999), ओमकार पलंगे (9922637773)
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सावधान ; तुम्ही अनेक ठिकाणी आधारकार्डची झेरॉक्स देता ?...सरकारने काढला आदेश...वाचा काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन - विविध योजनांसाठी, कामांसाठी आधार कार्ड देखील अनिवार्य करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स जमा करून घेतली जाते. तुम्ही देखील आधार कार्डची झेरॉक्स जमा करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने आधार कार्ड बाबत महत्त्वाचे आदेश काढले आहेत. या नव्या सुचनेनुसार आधार कार्डची झेरॉक्स कुठेही जमा न करण्यास सरकारने म्हटले आहे. आधार कार्डचा होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी सरकारने हे आदेश काढले आहेत. एखाद्या ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स अत्यावश्यक असल्यास आधारकार्डचा Masked असलेली झेरॉक्स द्यावी, अशी सूचना सरकारने केली आहे. 

केंद्र सरकारने रविवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे. नागरिकांना आवाहन करताना केंद्र सरकारने म्हटले की, तुमच्या आधार कार्डची फोटोकॉपी  एखाद्या व्यक्तीला अथवा संस्थेला देऊ नये. ज्या संस्थांनी UIDAI कडून परवाना घेतला आहे, त्याच संस्था, आस्थापनाने एखाद्या व्यक्तिची माहिती घेण्यासाठी आधार कार्डचा वापर करू शकता. 

Masked Aadhar चा वापर करा
केंद्र सरकारने आधार कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी Masked Aadhar Card चा वापर करण्याचे आवाहन केले आहे.  Masked Aadhar Card मध्ये आधार क्रमांकाचे शेवटचे चार क्रमांक दिसतात. त्यामुळे तुमच्या आधार कार्डचा वापर करून होणारी शक्यता बरीच कमी होते.

अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्याचे सावट ; ड्रोनमध्ये सापडले बॉम्ब...

वेध माझा ऑनलाइन - कठुआ जिल्ह्यातील राजबाग परिसरात आज पहाटे पोलिसांनी पाडलेल्या ड्रोनमध्ये सात स्टिकी बॉम्ब सापडले आहेत दहशतवाद्यांकडून अमरनाथ यात्रेला लक्ष्य केलं जात आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा दहशतवादी हल्ला अयशस्वी झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की दहशतवादी यात्रेच्या बसेसवर हल्ला करण्यासाठी या बॉम्बचा वापर करण्याच्या प्रयत्नात आहेत. याशिवाय दुसऱ्या एका पॅकेटमध्ये सात (अंडर बॅरल ग्रेनेड) देखील आढळून आले आहेत.

अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये संकरित दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्था मजबूत करून दहशतवाद्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया अधिक तीव्र करण्यात आली आहे. या वर्षी सुमारे 87 दहशतवादी सुरक्षा दलांनी मारले आहेत.
13 मे रोजी काश्मिरी पंडित आणि सरकारी कर्मचारी राहुल भट्ट यांची हत्या आणि त्यानंतर काश्मिरी अभिनेत्री अमरीन भट्टची हत्या यावरून जम्मू-काश्मीरमध्ये वातावरण आधीच तणावाचं आहे. ते अधिक बिघडवण्यासाठी दहशतवादी टार्गेट किलिंगचा अवलंब करत असल्याचं स्पष्ट होत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. स्थानिक लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अधिकाऱ्यांच अस म्हणणं आहे की, पाकिस्तानी दहशतवाद्यांसोबतच देशांतर्गत तयार केलेले संकरित दहशतवादी हे एक मोठं आव्हान बनलं आहे. ते वेगवेगळ्या मार्गाने हल्ले करत आहेत.

बृजभूषण सिंह मुंबईत येतील तेव्हा त्यांना चपलांचा हार घालू, आत्तापर्यंत झोपले होते का? ; मुंबईतील उत्तर भारतीयांनी दिला इशारा

वेध माझा ऑनलाइन -  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून मोठं वादंग निर्माण झाले. उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करत जोपर्यंत राज ठाकरे माफी मागणार नाहीत तोवर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवून देणार नाही असा इशारा दिला होता. राज ठाकरेंविरोधात बृजभूषण सिंह यांनी ठिकठिकाणी मेळावे, रॅली काढून मनसेला चिथावणी देणारी विधानं केली होती. आता खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात मुंबईत उत्तर भारतीय संघटनेने आंदोलन करत गेली १४ वर्ष कुठे झोपले होते? असा सवाल केला आहे. याबाबत गोविंद पांडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या भूमीवर येऊन त्यांनी राज ठाकरेंना विरोध करायला हवा होता. परंतु २००८ पासून तुम्ही कुठे होता? स्वत:च्या घरात बसून कुणीही धमक्या देऊ शकते. शरद पवारांचा हात बृजभूषण सिंह यांच्या डोक्यावर आहे. शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे संबंध आहेत. राज ठाकरेंना अडवण्यासाठी बृजभूषण सिंह यांचा ट्रॅप शरद पवारांनीच आखला होता असं त्यांनी सांगितले. तसेच बृजभूषण सिंह हे जे काही उत्तर प्रदेशात करत आहेत त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले तर ते इथे येणार आहेत का? राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी भाजपाने मध्यस्थी करायला हवी होती. ज्यादिवशी राज ठाकरे अयोध्येत जातील तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत तिथे जाऊ. त्यांचे अयोध्येत स्वागत करू. आम्हाला १४९ नोटीस दिली होती. ज्यादिवशी बृजभूषण सिंह मुंबईत येतील तेव्हा सर्वात आधी चपलांचा हार आम्ही घालू असा इशारा जीवनधारा फाऊंडेशनचे गोविंद पांडे यांनी दिला.

Friday, May 27, 2022

हनुमानाचं जन्मस्थान अंजनेरी नव्हे तर किष्किंधा ; मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांचा दावा... आता हनुमानाच्या जन्मस्थानावरून वाद...

वेध माझा ऑनलाइन - हनुमाना तुझा जन्म कुठला? असा प्रश्न आता थेट हनुमानालाच विचारण्याची वेळ आलीय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण हनुमानाच्या जन्मस्थळावरुन महंत आणि साधूंमध्येच मतमतांतर पाहायला मिळत आहेत. हनुमानाचं जन्मस्थान अंजनेरी नव्हे किष्किंधा असल्याचा दावा किष्किंधाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी केला आहे. त्यासाठी ते त्र्यंबकेश्वरात आंदोलन करताहेत. तर नाशिकमधील काही साधू महंतांनी या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. 

राम जन्मभूमी, काशी मथुरा नंतर पुन्हा हनुमान जन्मस्थळाचा वाद उफाळला आहे.  किष्किंदा येथिल मठाधिपती त्रंबकेश्वरमध्ये ठाण मांडून बसले आहेत हनुमानचे जन्मस्थान अंजनेरी नाही तर किष्किंदा असल्याचा दावा ते करत आहेत. वाल्मिकी रामायणाचा दाखला देत किष्किंदा येथे भव्य हनुमान मंदिर उभारण्याची घोषणा त्यांनी केली आहे. नाशिकच्या साधू महंतांमध्ये मात्र विरोधाभास असल्याचं दिसत आहे. महंत सुधीरदास हनुमान जन्मस्थान अंजनेरी असल्याचे दावे करत आहेत तर अनिकेत शास्त्री किष्किंदा असल्याचा मान्य करत आहेत. 

काही दिवसांपूर्वी हनुमानाच्या जन्मस्थानावरुन आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये वाद समोर आला होता. हनुमानाचा जन्म अंजनाद्री पर्वतात झाला, असा दावा तिरुमला तिरुपती देवस्थाननं केला होता. पौराणिक आणि पुरातत्त्वीय पुराव्यांचे आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला, असं त्यांनी दिलेल्या अहवालात म्हटलं होतं.

कर्नाटक आणि आंध्रातील हा वाद जुना असताना आता नाशिक की किष्किंदा हा वाद समोर आला आहे. कर्नाटकचं म्हणणं आहे की हनुमानाचा जन्म हंपीजवळच्या किष्किंधामधल्या अंजनाद्री इथं झाला, तर आंध्र प्रदेशचं म्हणणं होतं, की तिरुमलाच्या सात टेकड्यांमधील अंजनाद्री हे हनुमानाचं खरं जन्मस्थान आहे.
  
हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी डोंगरावर झाला असं इथल्या लोकांचं मत आहे. अंजनेरी हे नाव हनुमानाची आई अंजनीमातेच्या नावावरून पडलं. इथे डोंगरावर अंजनी मातेचं आणि हनुमानाचं मंदिरही आहे. महाराष्ट्रातल्या लोकांची श्रद्धा आहे की, राम-सीता-लक्ष्मण नाशिकमधल्या पंचवटीत राहात होते. हनुमानाचा जन्म इथल्या अंजनेरी डोंगरावर झाला आहे, असा दावा नाशिकमधील लोकांचा आहे.

संभाजीराजे छत्रपतींची राज्यसभेच्या निवडणूकीतून माघार ; शिवसेनेच्या भूमिकेनंतर निवडणूक न लढवण्याचा घेतला निर्णय...

वेध माझा ऑनलाइन - राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढची वाटचाल कशी असणार अशी चर्चा होती. त्यावेळी मी दोन राजकीय निर्णय जाहीर केले होते. त्यावेळी मी बोललो होतो की राज्यसभा निवडणुक लढवणार आहे. खासदारकी असताना समाजाची भुमिका मांडण्याचा प्रयत्न मी करत होतो. त्यामुळेच माझी इच्छा होती की सर्व पक्षांनी मिळून मला राज्यसभेत पाठवावं अशी इच्छा संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली होती त्यानंतर
राज्यसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचा निर्णय देखील संभाजीराजे छत्रपतींनी जाहीर केला होता. मात्र, शिवसेनेच्या भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपतींनी ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

मुख्यमंत्र्यांचा फोन
मला दोन खासदार भेटायला आले आणि त्यांनी मला सांगितलं की शिवसेनेत तुम्ही प्रवेश करा. उद्या आपली उमेदवारी जाहीर करु. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचाही मला फोन आला. त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं असेही ते म्हणाले. त्यांनी आम्हाला सांगितले की, छत्रपती आमच्यासोबत हवे आहेत. शिवसेनेत प्रवेश करावा असे त्यांनी सांगितले, पण मी त्यांना सांगितल की मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे. त्यांना मी प्रस्ताव सांगितलं की, मला महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार घोषित करा. पण मुख्यमंत्री म्हणाले की, हे शक्य होणार नाही. परंतू ते म्हणाले की शिवसेना पुरस्कृत उमेदवार व्हा. त्यानंतर त्यांच्या एका मंत्र्यांचा फोन आला की आपण एक मध्यमार्ग काढू. त्यानंतर एक ड्राफ्ट तयार करण्यात आला. तो ड्राफ्ट माझ्याकडे आहे. त्यानंतर एक शिष्टमंडळ आलं. मुख्यमंत्र्यांचे एक स्नेही माझ्याकडे आले त्यांनी सांगितले की, शिवसेनेत तुम्ही प्रवेश करा. त्यानंतर त्यांनी एक ड्राफ्ट मला सांगितला, तो ड्राफ्ट फायनल केला. त्यानंतर मी कागदपत्रे तयार करण्यासाठी कोल्हापूरला गेल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.

कोल्हापूरला जाताना मी बातम्या पहिल्या की कोल्हापूरच्या एका व्यक्तीला उमेदवारी दिली. संभाजीराजे शिवबंधन बांधणार अशा बातम्या दिल्या गेल्या.यावेळी मी मुख्यमंत्र्यांना फोन केला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही. त्यांनी शब्द पाळला नाही. असेही संभाजीराजे म्हणाले. येमाऱ्या काळात विस्तापित मावळ्यांना एकत्र करण्याचे काम मी करणार आहे. मी स्वराज्यच्या माध्यमातून उभा रहाणार आहे. ज्या आमदारांनी सह्या केल्या त्यांच्या पाठीशी मी आयुष्यभर राहणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडूक लढवणार नाही
शिवसेनेनं ऑफर दिली ती स्वीकारली असती तर मी खासदार झालो असतो. मला सर्व आमदार म्हणत आहेत की, आपण निवडणुक लढावावी. परंतू मला माहिती आहे त्याठिकाणी घोडेबाजार होणारं आहे असेही संभाजीराजे म्हणाले. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडुकीला समोर जाणार नाही, ही माझी माघार नसून हा माझा स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

Thursday, May 26, 2022

मुंबईत तीन महिन्यांनंतर सर्वाधिक दैनंदिन रुग्णांची नोंद ; हादरवणारा आकडा आला समोर;चिंता वाढली!

वेध माझा ऑनलाइन - मुंबईकरांनो आता सावध राहा. कारण कोरोनाव्हायरस पुन्हा मुंबईला आपल्या विळख्यात घेतो आहे शहरात पुन्हा हादरवणारा आकडा समोर आला आहे. मुंबईत आज एकाच दिवसात कोरोाचे सर्वाधिक रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. गेल्या तीन महिन्यानंतर इतक्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत 

मुंबईत गुरुवारी 295 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभऱातील सर्वाधिक रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. 3 महिन्यांनंतर इतक्या संख्येने रुग्ण आढळून आले आहेत. याआधी 11 फेब्रुवारीला 350 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर एकाच दिवसात आज सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या सलग 10 दिवसात मुंबईत 150 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण दिसून येत आहेत.

देहविक्री हा व्यवसाय ; गुन्हा नाही ; सर्वोच्य न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल...

वेध माझा ऑनलाइन - सर्वोच्य न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलीस दलांना देहविक्री करणाऱ्यांसोबत आणि त्यांच्या मुलांशी आदराने वागण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार करू नये असे निर्देशही देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती एल नागेश्वर राव, न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने यासंदर्भातील निर्देश जारी केले. जे अधिकारी इमॉर्टल ट्रॅफिकिंग म्हणजेेेच प्रिव्हेन्शन अॅक्ट १९५६ अंतर्गत आपलं कर्तव्य बजावतात त्यांनी देशातील सर्वच व्यक्तींना संविधानाचं संरक्षण मिळालं आहे हे लक्षात ठेवावं, असंही न्यायालयानं म्हटलंय.

लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या कोणत्याही देहविक्री करणाऱ्या महिलेला कायद्यानुसार तत्काळ वैद्यकीय मदतीसह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असं खंडपीठानं सांगितलं “देहविक्री करणाऱ्यांबद्दल पोलिसांचा दृष्टिकोन अनेकदा क्रूर आणि हिंसक असतो, असे दिसून आले आहे. त्यांच्या अधिकारांना मान्यता नाही असं दिसून येतं. ज्यांना सर्व मूलभूत मानवी हक्क आणि घटनेनुसार दिलेले अधिकार आहेत त्यांच्याबद्दल पोलीस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अन्य संस्थांनी संवेदनशील राहायला हवं, असंही न्यायालयानं म्हटलंय.
जर देहविक्री करणारी व्यक्ती वयस्क आहे आणि आपल्या मर्जीनं ती काम करत आहे हे स्पष्ट झालं तर पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करू नये किंवा कोणतीही फौजदारी करावाई करू नये. संविधानाच्या कलम २१ नुसार प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयानं म्हटलं. शिवाय देहविक्री करणाऱ्यांना अटक किंवा त्रास दिला जाऊ नये. आपल्या इच्छेनं यात सामील होणं हे अवैध नाही. केवळ वेश्यालय चालवणं अवैध असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं.
पोलिसांनी देहविक्री करणाऱ्या कोणाहीसोबत सन्मानानं वागलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत गैरव्यवहार करू नये. याशिवाय त्यांच्यासोबतची वागणूक हिंसक असू नये किंवा त्यांना कोणत्याही शारीरिक क्रियांसाठी भाग पाडू नये असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. भारतीय प्रेस कौन्सिलने माध्यमांना योग्य मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे आवाहन केले पाहिजे, असंही न्यायालयानं म्हटलं. देहविक्री करणाऱ्यांची ओळख, मग ते पीडित असो किंवा आरोपी, अटक, छापे, बचाव कार्यादरम्यान त्यांची ओळख पटेल अशा कोणत्याही फोटोचा वापर न करण्यास न्यायालयानं सांगितलं.

केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढला ; कोर्टानं तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी तुरुंगात असलेल्या अभिनेत्री केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. कारण आजही कोर्टानं तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. केतकी चितळे हिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात केतकीच्या वकिलांकडून जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता. त्यावरील सुनावणीत न्यायाधीशांनी हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने जामीन देण्यात येऊ शकत नाही असे मत नोंदवले आहे. 

दुसरीकडे रबाळे पोलीस स्टेशनअंतर्गत अॅट्रोसिटी प्रकरणातील जामीनाबाबत अद्याप पोलिसांचा जबाब येणे आहे बाकी त्यामुळे केतकी हीचा तुरुंगातील मुक्काम आता आणखी वाढला आहे.

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना CBI कडून अटक...

वेध माझा ऑनलाइन - 
पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले  यांना CBI कडून अटक करण्यात आली आहे. DHFL प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातूनच त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. आता DHFL घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.
अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. अविनाथ भोसले यांच्या ओळखीतील लोक सांगतात की 80च्या दशकात ते रिक्षा चालवत असत. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे.

Tuesday, May 24, 2022

केतकी चितळेचा मेडिकल चेकअप ; बी. पी. झाला लो...

वेध माझा ऑनलाइन - एका फेसबुक पोस्टवरून गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राचा ‘बीपी’ वाढवणारी अभिनेत्री केतकी चितळेचा नुकताच मेडिकल चेकअप करण्यात आला. केतकीची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज (24 मे) तिला न्यायालयीन कोठडी  सुनावण्यात आली. न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यापूर्वी तिची मेडिकल चेकअप करण्यात आला. हा चेकअप करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. केतकी गेल्या दहा दिवसांपासून ती पोलीस कोठडीत आहे. डॉक्टरने तिचा रक्तदाब चेक केला असता त्यांना तो कमी असल्याचा आढळला. मात्र त्यावर ‘माझा बीपी लोच असतो’, असं ती म्हणाली. त्यादिवशी मात्र बरोबर होतं, असं डॉक्टर तिला पुढे म्हणतात. तेव्हा ती हसत त्यांना सांगते, “त्यादिवशी आम्ही धावत आलो होतो. तेव्हा सगळ्यांचा बीपी चेक केला असता तर 200 च्या वरच असता.”

केतकी प्रकरणावरून राज्यात वादंग उठलं होतं. राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातून तिच्याविरोधात प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी तिच्यावर सडकून टीका केली. इतकंच नव्हे तर जेव्हा तिला अटक करण्यात आली, तेव्हा तिच्यावर शाईफेकही करण्यात आली. या सर्व घटनांनंतरही केतकीची आजची देहबोली बरीच सकारात्मक होती. डॉक्टर आणि पोलिसांशी ती हसत बोलत होती.

केतकी चितळेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सात जूनपर्यंत केतकी न्यायालयीन कोठडीत असेल. केतकीविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त फेसबुक पोस्ट केल्याने केतकीला 14 मे रोजी रबाळे पोलिसांनी अटक केली होती. तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं. आज (24 मे) झालेल्या सुनावणीनंतर केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 
वेध माझा ऑनलाइन - नागपुरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरादेवी परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गुलशन उर्फ गबरू मडावीची हत्या त्याच्याच दारुड्या बापाने केल्याचे समोर आले आहे. 22 मे रोजी सुरादेवी परिसरात एका झोपडीत गुलशन उर्फ गबरू मडावी या 10 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला होता.  गुलशनच्या मृतदेहावर आणि गळ्याभोवती खुणा असल्याने पोलिसांना गुलशनचे मृत्यू संशयास्पद वाटले. पोलिसांनी एसीपी संतोष खांडेकर आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या नेतृत्वात सखोल तपास सुरु केले. अवघ्या काही तासातच गुलशनची हत्या त्याच्या वडिलानेच केल्याचे समोर आले. 

संतलाल मडावी असे निर्दयी बापाचे नाव असून संतलाल चाकू आणि कैचीला धार लावण्याचा व्यवसाय करतो. संतलालला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी चार वर्षांपूर्वी विभक्त झाली होती. तेव्हापासून संतलाल दारू पिऊन दोन्ही मुलांना रोज मारहाण करायचा. रविवारी दुपारी गुलशनला घरी पाणी न भरल्यामुळे आरोपी बापाने प्रचंड मारहाण केली. एवढ्यावर त्याचे समाधान न झाल्याने त्याने घरात नेऊन त्याचा गळा आवळून हत्या केली. घटनेच्या वेळी मृतकची बहीण घराबाहेर गेली होती. कुणालाही काहीही कळू नये यासाठी संतलालन घराचे दार बंद करून मुलीला घेऊन बाहेर पडला आणि काही किलोमीटर अंतरावर असलेल्या भाऊ महादूच्या  घरी गेला. काही तासाने तो, त्याचा भाऊ, भावाची पत्नी आणि मुलगी हे सर्व घरी परतले. तेव्हा गुलशन कुठेच दिसून न आल्यामुळे त्याचा शोध सुरू करण्यात आला. पण मुलाची हत्या केली असून त्याचे मृतदेह घरात पडून आहे हे माहित असून सुद्धा संतलालने मुलाला शोधण्याचा बनाव केला. थोड्यावेळाने मुलाचा मृतदेह घरात आढळल्यानंतर त्याने माझ्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा कांगावा सुरू केला घटनेची माहिती समजताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळी गाठले. घटनेबद्दल संशय असल्याने पोलिसांनी संतलालला ताब्यात घेत विचारपूस सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवताच संतलालने आपला गुन्हा कबूल केला आहे.

दुसरी घटना
हत्येची दुसरी घटना काल रात्री जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेझनबाग मध्ये घडली.बांधकाम सुरू असताना बांधकाम करणाऱ्या एका मिस्त्री आणि मजुराचा आईची शिवी देण्यावरून वाद झाला.  मिस्त्री असलेल्या महादेव सोनूलेने त्याचा सहकारी तिलक चव्हाणच्या डोक्यात लाकडी दांडूने वार करून हत्या केली. आरोपी महादेव सोनूले हे बांधकाम मिस्त्री म्हणून काम करतात तर तिलक चव्हाण हा त्यांचा हेल्पर म्हणून काम करायचा. पोलिसांनी तिलक चव्हाणांच्या हत्येप्रकरणी महादेव सोनवलेला अटक केली आहे.


वेध माझा ऑनलाइन - क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द, कष्ट आणि प्रतिभा या 3 गोष्टींची आवश्यकता असते. या गोष्टींच्या जोरावर सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशस्वी होता येतं. हे अनेक क्रिकेटपटूंनी दाखवून दिलंय. सर्फराज खान आणि  मुशीर खान ही भावंड देखील याचं ताजं उदाहरण आहे. मुशीरची वयाच्या 18 व्या वर्षी मुंबईच्या रणजी टीममध्ये निवड झाली आहे. त्यानं टीम निवडीत सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि मुंबई इंडियन्सचा सदस्य अर्जुन तेंडुलकरवर मात करण रणजी टीममध्ये जागा मिळवली आहे.

मुशीरचा मोठा भाऊ असलेल्या सर्फराजनं नाव हे भारतीय क्रिकेटला आता नवं नाही. 2016 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सर्फराजनं टीम इंडियाकडून सर्वात जास्त 355 रन केले. गेल्या काही वर्षांपासून तो रणजी क्रिकेटमध्ये भरपूर रन करत टीम इंडियाचं दार ठोठावत आहेत. तसंच या आयपीएल सिझनमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स  टीमचा सदस्य होता.

दाऊद कराचीमध्ये आहे ; दाऊदच्या बहिणीच्या मुलाने दिली माहिती...

 वेध माझा ऑनलाइन - एक मोठी बातमी समोर येतेय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा लागला आहे. संयुक्त राष्ट्रानं घोषित केलेला दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचं वास्तव्य कुठे आहे याचा खुलासा झाला आहे. दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरनं याबाबतचा खुलासा केला आहे. आलीशाह पारकरनं म्हटलं की, भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या कराचीमध्ये आहे आणि त्याचे कुटुंब सणासुदीच्या वेळी दाऊदच्या पत्नीच्या संपर्कात असते.

अंडरवर्ल्ड डॉनचा भाचा अलीशाह पारकरने अंमलबजावणी संचालनालयाला याबाबतचं जबाब दिला. त्यानं दिलेल्या जबाबात खुलासा केला की, दाऊद पाकिस्तानातील कराची येथे आहे आणि तो जन्माला येण्यापूर्वीच 1986 नंतर भारत सोडून गेला होता.
अलीशाह पारकरनं आपल्या जबाबात म्हटलं आहे की, दाऊद इब्राहिम हा माझा मामा आहे आणि तो 1986 पर्यंत डंबरवाला भवनच्या चौथ्या मजल्यावर राहत होता. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराची येथे असल्याचे मी विविध स्त्रोतांकडून आणि नातेवाईकांकडून ऐकले आहे. मला केवळ हे सांगायचे आहे की दाऊद इब्राहिम माझे मामा कराची, पाकिस्तान येथे आहेत.
त्यांनी भारत सोडला तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता आणि मी किंवा माझे कुटुंबीय त्यांच्या संपर्कात नाही. मला हे देखील नमूद करावेसे वाटते की कधीकधी ईद, दिवाळी आणि इतर सणांच्या निमित्ताने माझे मामा दाऊद इब्राहिमची पत्नी मेहजबीन दाऊद इब्राहिम माझी पत्नी आयशा आणि माझ्या बहिणींच्या संपर्कात असतात, असंही अलीशाहनं सांगितलं आहे.


पुढचे चार दिवस जोरदार पावसाचा इशारा...

 वेध माझा ऑनलाइन - मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने  हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता असल्याची हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत पुढील चार दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. राजस्थानच्या उत्तर पूर्व भागापासून ते उत्तर पूर्व अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच उत्तर पूर्व राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत उत्तर प्रदेश पार करून हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आहे. 
यामुळे उत्तर भारतातील बहुतांश राज्यांत पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील कोकण, विदर्भ आणि कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पुढील चार दिवस पाऊस पडणार आहे.
बंगालच्या उपसागरासह अंदमानला दाखल झालेला मान्सून गेल्या तीन दिवसांपासून अनुकूल स्थितीच्या अभावामुळे अजूनही पुढे सरकू शकलेला नाही. दरम्यान, कोल्हापूर, कोकणसह राज्यातील काही भागांत चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मंत्रीमंडळातून तडकाफडकी काढून टाकले...

वेध माझा ऑनलाइन - पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भ्रष्टाचाराबाबत कठोर वृत्ती दाखवत मोठी कारवाई केली आहे. भगवंत मान यांनी आपले आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मंत्रिमंडळातून काढून टाकलं आहे. वृत्तानुसार, विजय सिंगला यांनी कंत्राटे देताना टक्केवारी कमिशनची मागणी केली होती. विजय सिंगला यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर भगवंत मान यांनी विजय सिंगला यांना मंत्रीपदावरून हटवले  आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारविरोधी मॉडेल अंतर्गत, पंजाबच्या भगवंत मान सरकारने मंगळवारी मोठी कारवाई केली आणि त्यांच्या मंत्र्याची हकालपट्टी केली. पंजाबचे आरोग्यमंत्री डॉ. विजय सिंगला यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारात गुंतल्याचे भक्कम पुरावे सापडले आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री विजय सिंगला हे कंत्राटी अधिकाऱ्यांकडून एक टक्का कमिशनची मागणी करत होते. तक्रार आल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांना बडतर्फ केले. देशाच्या इतिहासात दुसऱ्यांदा एखाद्या मुख्यमंत्र्यांनी थेट आपल्या मंत्र्यावर कडक कारवाई केली आहे. भगवंत मान म्हणाले की, लोकांनी खूप अपेक्षा ठेवून आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन केले आहे, त्या अपेक्षा पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे. एक टक्काही भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही.

मान म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराची व्यवस्था उखडून टाकू, आम्ही सर्व त्यांचे सैनिक आहोत, अशी शपथ घेतली होती. 2015 मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या एका मंत्र्याची भ्रष्टाचाराच्या प्रकरणात हकालपट्टी केली होती. आज देशात दुसऱ्यांदा असे घडत आहे. विजय सिंगला यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्र्यांनी आपली चूक मान्य केली आहे.

सिंगला हे प्रसिद्ध डेंटल सर्जन डॉक्टर
डॉ. विजय सिंगला, जे सामान्य डॉक्टरपासून मंत्रीपदापर्यंत पोहोचले, त्यांनी बीडीएसचे शिक्षण राजिंद्र मेडिकल कॉलेज, पटियाला येथून पूर्ण केले. त्यांचे वडील केशोराम सिंगला भूपाल कलान गावात एक छोटेसे किराणा दुकान चालवत होते, ते नंतर मानसा येथे स्थलांतरित झाले. सुमारे 10 वर्षांपूर्वी सिंगला यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आणि यावेळी त्यांना 'आप'ने मानसा विधानसभेचे तिकीट दिले. डॉ. सिंगला यांनी काँग्रेसचे प्रसिद्ध गायक सिद्धू मूसवाला यांचा मानसातून 60 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

Monday, May 23, 2022

राज्यसरकारची पेट्रोल डिझेल दरकपातीची घोषणा कागदावरच; मे महिन्यात 'एप्रिल फूल' केल्याचा भाजपचा आरोप...

वेध माझा ऑनलाइन - पेट्रोल डिझेल दरकपातीसंदर्भात राज्यसरकारनं काल घोषणा केली खरी. मात्र अद्याप याबाबत कुठलेही आदेश काढलेले नाही. काल राज्यसरकारडून व्हॅट कमी केल्याची घोषणा केली आहे मात्र अध्यादेशाची प्रतीक्षा आहे. यावरुन भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.  पेट्रोल डिझेल दरकपातीसंदर्भात राज्यसरकारची घोषणा कागदावरच असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे.  महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय तर सरकार महागाईबाबत गंभीर नाही असा आरोप भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी केला आहे.  राज्याच्या अर्थमंत्रालयाकडून  करकपातीचा अध्यादेश अद्यापही जारी केलेला नाही. 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस 
फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, लज्जास्पद! महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे. इंधनाची मूळ किंमत,विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन,रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस तसेच अ‍ॅग्रीकल्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस अशा सर्व बाबींवर राज्य सरकार करआकारणी करते.  त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला तर राज्याचा कर आपोआप कमी होतो. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलवर 2.08 रुपये आणि डिझेलवर 1.44 रुपये जे कमी झाले, तो रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे. स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे. महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी पुन्हा मागणी आहे. कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला.


Sunday, May 22, 2022

आनंदाची बातमी...मान्सून अरबी समुद्रात दाखल, 5 जूनला कोकणात आणि 7 जूनला मुंबईत दाखल होणार...

वेध माझा ऑनलाइन -  उकाड्यांनं हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सून केरळात धडकणार आहे. तर 5 जूनला कोकणात आणि 7 जूनला मुंबईत दाखल होईल. 

दरवर्षी 10 जूनपर्यंत मुंबईत पावसाला सुरुवात होते. यंदा मात्र मान्सूनचं आगमन लवकर होणार आहे. मान्सूनचा प्रवास समाधानकारक असून 3 ते 9 जूनदरम्यान मान्सूनचं राज्यात आगमन होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. तर 10 ते 16 जूनदरम्यान मुसळधार पाऊस बरसेल असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात पूर्वमोसमी पावसाचा जोर कमी 
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रापर्यंत चांगली वाटचाल केलेल्या र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शनिवारी मात्र दोन्ही समुद्रात कोणतीही प्रगती न करता विश्रांती घेतली आहे. महाराष्ट्रातही पूर्वमोसमी पावसाचा जोर कमी झाला असला तर पुढील तीन-चार दिवस कोकण वगळता इतरत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात अनेक भागात गेली दोन-तीन दिवस पूर्वमोसमी पाऊस झाला.  कोकणात मात्र 25 मेपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात 25 मेनंतर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

2-3 दिवस जोरदार पावसाची शक्यता
तर दुसरीकडे देशात उत्तर आणि पूर्व भागातील राज्यांत पुढील दोन-तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिणेकडील केरळ आणि तमिळनाडूमध्ये काही भागांत जोरदार पाऊस सुरु आहे. मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही भागात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.  
देशातील उत्तरेकडील भागात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आदी भागात पाऊस होत असून, 23 मे रोजी या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, चंडीगड, दिल्ली, बिहार, झारखंड आदी राज्यांतही पाऊस आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पामुळे पश्चिम बंगाल, ओडिसा आदी राज्यांतही पाऊस आहे.

आजपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात झाली कपात ; राज्यातील जनतेला मोठा दिलासा...

वेध माझा ऑनलाइन - केंद्र सरकारने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. तर राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता ८० कोटी रुपये महिन्याला आणि १२५ कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. १६ जून २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ७ रुपये ६९ पैसे आणि १५ रुपये १४ पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे २०२० मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे १३आणि १६ रुपये अशी वाढ केली होती.

 केंद्रानं दिला मोठा दिलासा
इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने काल मोठा दिलासा दिला. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली. तसेच उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना घरगुती गॅसवर प्रति सिलिंडर २०० रुपये अनुदान देण्याचेही सरकारने जाहीर केले. याशिवाय किमती कमी करण्यासाठी काही उत्पादनांवरील आयात शुल्कातही कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Saturday, May 21, 2022

पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार ...

वेध माझा ऑनलाइन - महागाईत होरपळत असलेल्या सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारने अखेर दिलासा दिला आहे. माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, "आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. यामुळे सरकारच्या महसुलावर दरवर्षी सुमारे एक लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 200 रुपये अनुदान
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना आता प्रति सिलिंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी दिली जाईल, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. यामुळे आपल्या माता-भगिनींना मदत होईल, असे ते म्हणाले. यामुळे वार्षिक सुमारे 6100 कोटींच्या महसुलावर परिणाम होईल.
गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये देशातील किरकोळ महागाईचा दर 7.79 टक्क्यांच्या 8 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. किरकोळ महागाईच्या आकडेवारीत ही वाढ खाद्यपदार्थांव्यतिरिक्त इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे झाली आहे.

Friday, May 20, 2022

दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेल्या व्यक्तीमध्ये आढळला ओमायक्रॉन बीए. 4 व्हेरियंट ...

वेध माझा ऑनलाइन - मुंबई आणि दिल्लीसह भारतामधील प्रमुख शहरांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहाता चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दैनंदिन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे चिंतेत वाढ झाली असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. हैदराबादमध्ये बीए.4 या ओमायक्रॉनच्या उपप्रकाराचा रुग्ण आढळला आहे. ओमायक्रॉनच्या या उपप्रकाराचा भारतातील हा पहिला रुग्ण आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेल्या एका व्यक्तीमध्ये ओमायक्रॉन बीए. 4 हा व्हेरियंट आढळला आहे. हैदराबादमधील रुग्ण समोर आल्यानंतर तज्ज्ञांनी देशात इतर शहरांमध्येही बीए.4 या उपप्रकाराचे रुग्ण आढळण्याची शक्यता वर्तवली आहे.  

दक्षिण आफ्रिकामधून हैदराबादला आलेल्या व्यक्ती विमानतळावरील कोरोना चाचणीदरम्यान नमुणे घेण्यात आले होते. जीनोम सिक्वेंसिंगमध्ये त्या व्यक्तीला ओमायक्रॉनच्या बीए.4 या व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आले. 9 मे रोजी तो व्यक्ती दक्षिण आफ्रिकामधून हैदराबादला आला होता आणि 16 मे रोजी परत गेला.. बीए. 4 उपप्रकाराची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणताही लक्षणे आढळली नाहीत. 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉनचा बीए.4 उपप्रकार पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकामध्ये आढळला होता. जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर एक एक करत जवळपास डजनभर देशात पसरला.. त्यानंतर या उपप्रकाराचा पहिला रुग्ण भारतात आढळला आहे. तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉनचा बीए.4 हा व्हेरियंट वेगाने भारतात पसरण्याची शक्यता आहे. 

भारताला किती धोका?
ओमायक्रॉनचा बीए. 4 व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जातेय. हा व्हेरियंट रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो. दक्षिण आफ्रिकामधील कोरोना हाहा:कार झाला, त्यामागे बीए.4 या व्हेरियंटचाच हात होता. भारतीय शास्त्रज्ञांच्या मते, भारतामध्ये बहुसंख्य लोकांचे लसीकरण झालेय अन् त्यांच्या अँटीबॉडी तयार झाल्यात. भारतीय आता कोरोनाविरोधात लढण्यास सक्षम झाले आहेत. त्यामुळे या नव्या व्हेरियंटचा भारताला जास्त धोका नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले.

Thursday, May 19, 2022

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पुढच्या तीन तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; हवामान खात्याने केले अलर्ट ...

वेध माझा ऑनलाइन - कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, या जिल्ह्यात पुढच्या तीन तासांत विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार गोवा, कर्नाटकमार्गे पश्चिमदिशेने वारे वाहत आहे असल्याचे हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली आहे. दरम्यान हवामान खात्याकडून कोल्हापूर, सांगली  आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याचे अधिकारी होसाळीकर यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी 19 मे ते 21 मे दरम्यान विजांच्या कडकडाटा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अकोला, यवतमाळ, वाशीम आणि अमरावती जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान वर्धा शहरात काल सर्वाधिक उष्ण तापमान ४५ अंश सेल्सिअस होते.
दरम्यान IMD ने दिलेल्या माहितीनुसार , मान्सून येत्या दोन दिवसांत आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत दक्षिण बंगाल उपसागराच्या काही भागात तसेच अंदमान समुद्र आणि बंगाल उपसागराच्या पूर्वेकडील काही भागात मान्सूनची वाटचाल सुरू आहे आहे.
राज्यात मान्सून सक्रीय होण्यासाठी 12 ते 15 जून उजाडण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनाची अधिकृत तारीख 11 जून असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान राज्यातील काही भागात मान्सून पूर्व हवामान तयार होत असल्याने पावसाची शक्यता आहे.
मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो. दरम्यान यंदा चार दिवस आधीच पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार १३ ते १९ मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर केरळमध्ये २० ते २६ मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.


नवज्योत सिंह सिद्धू यांना तुरुंगवासाची शिक्षा ; 34 वर्षापूर्वी वृद्धाला केलेली मारहाण भोवली...

वेध माझा ऑनलाइन - नवज्योत सिंह सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाने  मोठा झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने 34 वर्ष जुन्या प्रकरणात सिद्धू यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सन 1988 मध्ये झालेल्या एका पार्किंगच्या वादातून सिद्धू यांनी एका वृद्धाला मारहाण केली होती. त्यानंतर उपचारा दरम्यान त्या वृद्धाचा मृत्यू झाला. याआधी नवज्योत सिंह सिद्धू यांना दिलासा मिळाला होता. मात्र, पीडित पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सिद्धू यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 

27 डिसेंबर 1988 च्या संध्याकाळी सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंग संधूसोबत पटियालाच्या शेरावले गेटच्या बाजारात पोहोचले होते. हे ठिकाण त्यांच्या घरापासून 1.5 किमी अंतरावर आहे. तेव्हा सिद्धू क्रिकेटपटू होता. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू होऊन फक्त एक वर्ष झाले होते. त्याच मार्केटमध्ये कार पार्किंगवरून 65 वर्षीय गुरनाम सिंग यांच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धू यांनी गुरनाम सिंगला पाडले. त्यानंतर गुरनाम सिंग यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते.
 त्याच दिवशी सिद्धू आणि त्यांचा मित्र रुपिंदर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सत्र न्यायालयात खटला चालला.  वर्ष 1999 मध्ये सत्र न्यायालयाने हा खटला फेटाळून लावला.
 वर्ष 2002 मध्ये पंजाब सरकारने सिद्धूविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. दरम्यान, सिद्धू यांनी राजकारणात प्रवेश केला. वर्ष 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर अमृतसर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते.उच्च न्यायालयाने डिसेंबर 2006 मध्ये निकाल सुनावला. यामध्ये उच्च न्यायालयाने सिद्धू आणि संधूला दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. सिद्धू यांनी त्यानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
 उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांनी त्यावेळी सिद्धूच्यावतीने खटला लढवला होता.

Wednesday, May 18, 2022

मध्यप्रदेश सरकारने ओबीसींना आरक्षण मिळवून दिले मग, महाराष्ट्र सरकार कुठे कमी पडले ?वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राप्रमाणेच मध्यप्रदेशला ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. 10 मे रोजी कोर्टाने हे आदेश दिले होते. कोर्टाने मध्यप्रदेशच्या निवडणूक आयोगाला 24 मेच्या आधी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्याचे आदेश दिले होते. ओबीसी आरक्षणाच्या अटींची पूर्तता केल्याशिवाय ओबीसींना आरक्षण दिलं जाणार नाही, असं कोर्टाने म्हटलं होतं.मध्यप्रदेशातील मागासवर्ग कल्याण आयोगाने मध्यप्रदेशात सर्वोच्च न्यायालयात एक अहवाल सादर केल होता. त्यात त्यांनी ओबीसींना 35 टक्के आरक्षण देण्याची मागणी केली होती. मध्यप्रदेशात त्रिस्तरीय (गाव, एका समाजाचे लोक आणि जिल्हा) पंचायत, नगर पालिका (नगर परिषद, नगर पालिका, महापालिका) मध्ये मागासवर्गांना आरक्षण देण्यासाठी अभ्यास करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.कोर्टाच्या या निर्णयानंतर मध्यप्रदेश सरकार कामाला लागले होते. त्यानंतर अवघ्या 14 दिवसातच मध्यप्रदेश सरकारने ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं आहे. महाराष्ट्र सरकार कुठे कमी पडले हे पाहणे महत्वाचे आहे

कोर्टाच्या आदेशानंतर शिवराज सिंह चौहान सरकारने मागासवर्ग कल्याण आयोग गठित केला होता. या आयोगाने मतदार यादीचं परीक्षण केल्यानंतर राज्यात 48 टक्के ओबीसी मतदार असल्याचा दावा केला. या रिपोर्टच्या आधारे ओबीसींना 35 टक्के आरक्षण देण्याची शिफारस करणारा रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आला. त्यावर कोर्टाने आज हा निर्णय दिला आहे. त्यामुळे शिवराज सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे

मध्यप्रदेश सरकारने मागासवर्ग आयोग गठीत केल्यानंतर या आयोगाने संपूर्ण राज्याचा दौरा केला. आयोगाने ओबीसींबाबतची सर्व तथ्य एकत्रित केली. व्यापक सर्व्हे केला. त्या तथ्यांच्या आधारे आपला रिपोर्ट तयार केला.

महाराष्ट्र सरकार कुठे कमी पडले?
राज्य सरकारने आधी केंद्र सरकारकडे ओबीसींच्या डेटाची मागणी करण्यात वेळ घालवला. त्यानंतर कोव्हिडचं कारण देऊन ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा होऊ शकत नसल्याचं सांगितलं. त्यात वेळ गेला. कोर्टाने अनेकदा इम्पिरिकल डेटा देण्याचे निर्देश देऊनही हा डेटा न मिळाल्याने अखेर कोर्टाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्य सरकार खडबडून जागे झाले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याआधीच महाराष्ट्र सरकारने ओबीसी आयोग स्थापन केला. मात्र, आयोगाला निधी आणि कर्मचारी वर्ग दिला नाही. त्यामुळे आयोगाचं प्रत्यक्ष काम सुरू होण्यास उशीर झाला. त्यावर विरोधकांनी टीका केल्यानंतर नंतर ओबीसी आयोगाला निधी आणि कर्मचारी वर्ग देण्यात आला. मध्यप्रदेशातील ओबीसी आयोगाने अवघ्या 14 दिवसात इम्पिरिकल डेटा गोळा केला. पण महाराष्ट्रातील आयोगाचं अजूनही डेटा गोळा करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न रेंगाळला आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरेंना जामीन मंजूर ; त्यांच्यावरील अटकेची कारवाई तूर्तास टळली...

वेध माझा ऑनलाइन - मायणी येथील मयत व्यक्तीच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करून संगनमताने जमीन हडपण्यासाठी फसवणूक केल्याप्रकरणी माण खटावचे आमदार जयकुमार गोरे व इतर चार जणांविरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणी अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी आमदार गोरेंचे प्रयत्न सुरू होते. आज अखेर उच्च न्यायालयाने आमदार गोरेंचा अर्ज मंजूर करत नऊ जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे.


मायणी येथील मयत व्यक्तीच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करून संगनमताने जमीन हडपण्यासाठी फसवणूक केल्याप्रकरणी माण खटावचे आमदार जयकुमार गोरे व इतर चार जणांविरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आमदार गोरे यांचे प्रयत्न सुरू होते. पण त्यांचा वडुज सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता, त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत जामीनासाठी अर्ज केला होता. सुरवातीला झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने आमदार गोरेंच्या जामीनाला जोरदार विरोध केला होता. त्यामुळे त्यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. तसेच याचिकाकर्त्याला कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी १७ मे पर्यंत तहकूब केली होती.
त्यावर काल सुनावणी झाली त्यावर निर्णय आज देणार असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. आज अखेर उच्च न्यायालयाने आमदार गोरेंचा जामीन अर्ज मंजूर करत नऊ जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. त्यानंतर पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अटकेची कारवाई सध्यातरी टळली आहे.

Tuesday, May 17, 2022

केतकी चितळेला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी...

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक करण्यात आली आहे. केतकी चितळेची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर तिला पुन्हा ठाणे सत्र न्यायालयात  हजर करण्यात आले. यावेळी ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ठाणे क्राईम ब्रांचने केतकीवर दाखल गुन्ह्यांत आणखी एक कलम वाढवले आहे. आयटी अॅक्ट कलम 66 नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे क्राईम ब्रांचने केतकी चितळे हिची वाढीव पोलीस कोठडी न मागितल्याने ठाणे सत्र न्यायालयाने तिला थेट न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर केतकी चितळेकडून जामीनासाठी अर्ज केला आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरोधात मुंबईतील गोरेगाव पोलिसांतही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे केतकी चितळे हिचा ताबा मिळावा यासाठी आज गोरेगाव पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला. गोरेगाव पोलिसांच्या या अर्जाला केतकीचे वकील घन:श्याम उपाध्याय यांनी विरोध केला. मात्र, न्यायालयाने केतकीचा ताबा गोरेगाव पोलिसांना दिला.


आता ओबीसी आरक्षणासह होणार निवडणुका; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश...

वेध माझा ऑनलाइन - सर्वोच्च न्यायालयात भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा मोठा विजय मिळाला आहे. ओबीसी आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. आता मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं तसे आदेश दिले आहेत.

मध्य प्रदेशातील पंचायत निवडणुकीत ओबीसींना आरक्षण देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेतन्यायालयाचे आदेश आहेत. हा आकडा 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, असे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
आठवड्याभरापूर्वी ओबीसी आरक्षणाशिवाय  निवडणुका घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. सरकारने 15 दिवसांत पंचायत आणि नगरपालिका निवडणुकांची अधिसूचना जारी करावी, असे ही आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते.
मध्य प्रदेशात ओबीसी अरक्षणाशिवय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. त्यावेळी शिवराज सिंग चौहान सरकारला सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका मानला जात होता. मध्यप्रदेश सरकारनं ट्रिपल टेस्टच्या निकषांसह रिपोर्ट पूर्ण करण्यासाठी अधिकचा वेळ कोर्टाकडे मागितला होता. पण सर्वोच्च न्यायालयानं यावर निकाल जाहीर करत आदेश जारी केले होते.




वेध माझा ऑनलाइन -  मनसेप्रमुखराज ठाकरे हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील भाजप नेते आणि खासदार बृजभूषणसिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आक्षेप घेत थेट विरोध केला आहे. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर प्रदेशची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे ते आपल्या विधानावर आजही ठाम आहेत. 'मी घुसू देणार नाही म्हटलंय, तर खरंच घुसू देणार नाही', असा सज्जड दमच त्यांनी दिला आहे. 

राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशात पाय देखील ठेऊ देणार नसल्याचं बृजभूषण सिंह यांनी ठामपणे सांगितलं आहे. त्यामुळे, मनसे विरुद्ध भाजप खासदार असा सामना दिसून येत आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी त्यांची पुण्यात सभा होत आहे. त्यामुळे, या सभेत बोलताना राज अयोध्येतील विरोधाबद्द काही बोलतील का, याचीही उत्सुकता अनेकांना लागली आहे. तसेच, राजदौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या ५ जून रोजी नेमकं अयोध्येत काय घडणार? याचीही चर्चा होत आहे. 

महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्यांनी खासदार बृजभूषण यांच्या विधानाशी असहमती दर्शवली आहे. मात्र, खासदार सिंह यांचा विरोध वाढतच असून ते मोठ्या प्रमाणात लोकांनाही एकत्र करत आहेत. मी जर एक आवाज दिला, तर राज ठाकरेच काय, त्यांच्या खानदानातील एकही माणूस उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये येऊ शकणार नाही. सध्या ते मुस्लिमांना भडकवत आहेत. त्यामुळेच, मोठ्या संख्येनं मला मुस्लीमांचं समर्थन मिळत आहे. मुस्लीम बांधव दररोज मला येऊन भेटत आहेत. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातीलही मुसलमान मला समर्थन करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

''मी म्हणतो राज ठाकरे उंदीर आहे. ते बिळात राहातात. त्या बिळातून बाहेर येत नाही. आत्तापर्यंत ते बाहेर आले नाही. पहिल्यांदा ते आले आहेत. त्यामुळे मी विरोध करत आहे. मी ठरवलं आहे की ५ तारखेला त्यांना उत्तर प्रदेशच्या धरतीवर घुसू देणार नाही. मी म्हटलंय म्हणजे घुसू देणारच नाही,'' अशा शब्दात त्यांनी इशाराही दिला. तसेच, हे योग्य आहे की अयोग्य ते येणारा काळच ठरवेल', असेही त्यांनी म्हटलंय.

शिवाजी महाराजांना आदर्श मानतो
देशातला कोणताही नागरिक महाराष्ट्रात जातो, तेव्हा तो दुय्यम दर्जाचा नागरिक बनून राहातो. तो घाबरून तिथे राहातो. मी महाराष्ट्राची भूमी, महाराष्ट्राच्या लोकांना प्रणाम करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आदर्श मानतो. माझं कुणाशीही वैर नाही, हा लढा सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्ता परिवर्तनासाठी नाही. माझी लढाई आमच्यावरील अन्यायाविरुद्ध आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 
 


राज्यात आज 1551 सक्रिय रुग्ण ;; देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट

वेध माझा ऑनलाइन -  राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत काहीसा चढ-उतार दिसून येत आहे. राज्यात आज  266 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 241 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासामध्ये राज्यात शून्य कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात आज शून्य कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 77,31,829 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे. 

राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येची संख्या ही 1551 इतकी आहे. सर्वाधिक म्हणजे 932 सक्रिय रुग्ण हे मुंबईत  असून त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागतोय. पुण्यामध्ये सध्या 299  इतके सक्रिय रुग्ण आहेत. तसेच राज्यात आतापर्यंत 8,05,93,724 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गात मोठी घट झाली आहे. देशात नवीन कोरोना रुग्णांची संख्या दोन हजारांच्या खाली पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 569 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभरात 2 हजार 467 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनावर मात केलेल्या नव्या रुग्णांमुळे आता देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 16 हजार 400 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 84 हजार 710 रुग्णांन कोरोनावर मात केली आहे. देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 191 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. कोरोना महामारीनं आतापर्यंत भारतात 5 लाख 24 हजार 260 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 16 हजार 400 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रायलाने ही माहिती दिली आहे.

पाकिस्तानमधील कराचीत गेल्या तीन दिवसात झाला दुसरा बॉम्बस्फोट...पाकिस्तान हादरले;

वेध माझा ऑनलाइन - पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सोमवारी पुन्हा एकदा कराचीत दहशतवाद्यांनी स्फोट घडवला. येथील खारदर भागातील न्यू मेमन मशिदीजवळ झालेल्या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. कराचीत या तीन दिवसामधील हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे

स्फोटासाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) वापरण्यात आल्याचे कराची पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात पोलीस पिकअप आणि इतर काही वाहनांचे नुकसान झाले. आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला आहे. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

पंतप्रधान म्हणाले- कठोर कारवाई केली जाईल
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेत सहभागी असलेल्यांना तात्काळ पकडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. सिंध सरकारला मदत करण्याबाबतही ते बोलले आहे. सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी सर्व जखमींना चांगले उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच सिंधचे आयजीपी मुश्ताक अहमद महार यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. कराची शहरात तीन दिवसामधील हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. याआधी गुरुवारी कराचीच्या या भागात झालेल्या स्फोटात १ नागरिक ठार झाला होता, तर १३ जण जखमी झाले होते. ही घटना घडवून आणण्यासाठी दुचाकीमध्ये आयईडी बसवून त्याचा स्फोट करण्यात आला.
पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांत दहशतवादी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अवघ्या १८ दिवसांपूर्वी कराची विद्यापीठावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. कन्फ्युशियस इन्स्टिट्यूटजवळ एका कारजवळ हा हल्ला झाला. मृत्युमुखी पडलेल्या पाचपैकी तीन महिला प्राध्यापक चीनमधील आहेत. चौथा  पाकिस्तानी ड्रायव्हर आणि पाचवा गार्ड होता.

अखेर, औरंगजेबची कबर पर्यटकांसाठी बंद ; आता कबरीवर पोलिसांचा बंदोबस्त...

वेध माझा ऑनलाइन - मशिदींवरील भोंग्यांवरुन वातावरण तापलेलं असतानाच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादेत औरंगजेबच्या कबरीवर गेले होते. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. आज औरंगजेबच्या कबरीजवळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे अखेरीस पर्यटकांसाठी कबर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबाद जवळील खुलताबाद येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही लोक औरंगजेबच्या कबरीवर चाल करून जाणार अशी अफवा पसरली होती. त्यामुळे लगेच कबरीचे मुख्य दार बंद करण्यात आले. अफवा नागरिकांच्या कानावर पडताच स्थानिक नागरिकही जमायला सुरुवात झाली होती.
याची माहिती मिळताच पोलिसांनीही तात्काळ औरंगजेबच्या कबरीकडे धाव घेतली. पोलिसांनी काही झाले नाही, काही होणार नाही, असे समजावत नागरिकांना तिथून बाहेर जाण्यास भाग पाडले आहे. आता कबरीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मध्यंतरी, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी औरंगजेबच्या कबरीवर गेले होते. ओवैसींच्या कबरीवर जाण्यामुळे राजकीय वाद पेटला होता. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी यावर आक्षेप घेतला होता. आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं, "या कारट्या ओवेसी ला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्यामध्ये "नामर्दांचे सरकार आहे" याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!!"
नितेश राणे यांनी आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हटलं, "मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर.. आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!" पोलिसांना बाजूला करा म्हणत नितेश राणे यांनी थेट आव्हानच दिलं होतं.


राज्यातील निवडणुकांबाबत कोर्टाचे राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश ; कधी होणार पालिका निवडणूका? वाचा महत्वाची बातमी...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका पावसाळा झाल्यावर घ्याव्यात या संदर्भातील विनंती अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात केला होता. या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

ज्या ठिकाणी फार पाऊस पडत नाही त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला हरकत काय आहे? असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे. जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम तयार करावा असंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग निवडणुकांबाबत कशाप्रकारे निवडणुका घेतं हे पहावं लागेल.

सुप्रीम कोर्टाने म्हटलं, ज्या ठिकाणी पाऊस कमी असतो अशा ठिकाणी निवडणुका थांबवण्याची काय गरज आहे? जिल्हानिहाय आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम तयार करावा. ज्या ठिकाणी जास्त पाऊस असतो उदाहरणार्थ कोकण, मुंबई सारख्या भागात आम्ही निवडणूक आयोगाची पावसामुळे होणारी अडचण आम्ही समजू शकतो. या ठिकाणी पावसाळ्यानंतर निवडणुका घेऊ शकतो. त्यानुसार निवडणुकांचा कार्यक्रम तयार करावा.सुप्रीम कोर्टाने पुढे म्हटलं, ज्या ठिकाणी पाऊस कमी असतो अशा ठिकाणी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत थांबण्याची गरज नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोग कशा प्रकारे निवडणुकांचा कार्यक्रम आखतं हे पहावं लागेल.

काय होतं निवडणूक आयोगाचं म्हणणं?
राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. याआधी प्रभाग रचना, मतदार यादी, पाऊस यामुळे निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या जाऊ शकत होत्या. आगामी पुढच्या महिन्यात पावसाळा आहे. त्यामुळे पावसाळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं कितपत शक्य आहे, असा प्रश्न आयोगाकडून या निमित्ताने उपस्थित करण्यात आला होता. निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आणि त्याकाळात मुसळधार पाऊस असला तर निवडणूक घेणं कठीण होईल, अनेक भागांत पूरस्थिती निर्माण होते, ईव्हीएमची वाहतूक करण्यासही अडथळा येऊ शकतो असं निवडणूक आयोगाने आपल्या अर्जात म्हटलं होतं.

Sunday, May 15, 2022

शंभू चरित्रात कराडच्या भूमीला अनन्यसाधारण महत्त्व - प्रा. अरुण घोडके यांचे प्रतिपादन; ओघवत्या वाणीत मांडला संभाजी राजांचा धगधगता इतिहास...

वेध माझा ऑनलाइन - छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यारोहणात कराडच्या भूमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे
 या भूमीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक उभारणीचा संकल्प करण्यात आला आहे. हे स्मारक नव्या पिढीला प्रेरणा देईल, असा विश्वास  व्याख्याते प्रा. अरुण घोडके यांनी व्यक्त केला.
येथील शंभू तीर्थावर शनिवारी छत्रपती संभाजी महाराज यांची 365 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. हजारो शिवप्रेमींनी या व्याख्यानास उपस्थिती लावली. संभाजीराजांचा धगधगता पराक्रम त्यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. दुर्गप्रेमी के. एन. देसाई, तहसीलदार विजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. घोडके म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनावेळी संभाजीराजे पन्हाळ्यावर होते. शिवरायांच्या पश्चात राजारामांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते हे कराड प्रांतात होते. राजाराम हा भाचा असतानाही त्यांनी संभाजीराजांची बाजू घेतली. पुढे संभाजीराजे छत्रपती झाले. संभाजीराजांना अनेक नाटके, चित्रपट व साहित्यात बदनाम करण्यात आले. मात्र ते व्यसनी होते, असा एकही पुरावा इतिहासात आढळत नाही.
स्वराज्याचे छत्रपती म्हणून त्यांना अवघी नऊ वर्षे लाभली. या छोट्या कालखंडात त्यांनी 128 लढाया केल्या. यातील एकही लढाई ते हारले नाहीत. बुधभूषण ग्रंथासह एकूण चार ग्रंथ लिहिणारे ते एकमेव छत्रपती होते. कर्तृत्ववान, शीलवान, कर्तबगार, राष्ट्रप्रेमी पिढी घडविण्यासाठी शिवचरित्र, शंभूचरित्र आणि मराठ्यांचा इतिहास अभ्यासला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. शिवरायांच्या आज्ञेनुसार अनेक किल्ले बांधणार्या हिरोजी इंदुलकर यांनी स्वतःच्या नावाची पायरी रायगडावर रचली. ती आपणाला निरपेक्ष सेवेची प्रेरणा देते, त्याचप्रमाणे कराडमध्ये तरुणांनी शंभू स्मारक उभारण्याचा संकल्प करून निरपेक्ष सेवेचा चिरा रोवला आहे. या कार्यास सर्व कराडकरांनी सक्रीय साथ द्यावी, असे आवाहन प्रा. घोडके यांनी केले.

व्याख्यानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद
शंभू तीर्थ (साईट व्ही) जागेत प्रथमच व्याख्यानासारखा कार्यक्रम स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने घेण्यात आला. कराडकर नागरिक, महिलांसह तरूण कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त शंभूराजांच्या पराक्रमाचा जागर करण्याच्या या संकल्पनेचे नागरिकांनी कौतुक केले.

लेझर शो प्रेक्षणीय
शंभू तीर्थावर आयोजित सोहळ्यात रात्री भव्य लेझर शोने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हजारोंच्या संख्येने तरुणाईने थिरकत लेझर शोचा आनंद घेतला.

काँग्रेसमध्ये पूर्णवेळ जबाबदारी घ्यायला कोणीतरी पुढे यायला पाहिजे. राहुल गांधी येणार नसतील तर अजून काहीतरी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे ; आ पृथ्वीराज चव्हाण यांचे स्पष्ट मत

वेध माझा ऑनलाइन - गेल्या 24 वर्षांपासून पक्षात निवडणुका होत नाहीत, ही लोकशाहीच्या दृष्टीने चांगली गोष्ट नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. नियुक्त केलेले लोक नेतृत्वाला गंभीर सल्ले देऊ शकत नाहीत, असे म्हणत चव्हाण यांनी राहुल गांधी आणि  प्रियंका गांधी यांच्याभोवती जमलेल्या कोंडाळीवर हल्लाबोल केला. पक्षात पूर्णवेळ जबाबदारी घ्यायला कोणी तरी पुढे यायला पाहिजे. राहुल गांधी येणार नसतील तर अजून काहीतरी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे हे आमचं म्हणणं असल्याचे चव्हाण म्हणाले. 
काँग्रेसच्या झालेल्या चिंतन शिबिरात ते बोलत होते

यावेळी चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराकडे देखील बोट केलं आहे.काँग्रेसचे चिंतन शिबिर हे मुळात जी-23 गटाने उपस्थित केलेल्या मुद्दयांमधून निर्माण झाले आहे. पक्षात पूर्णवेळ जबाबदारी घ्यायला कोणी तरी पुढे यायला पाहिजे. राहुल गांधी येणार नसतील तर अजून काहीतरी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे हे आमचं म्हणणं असल्याचे चव्हाण म्हणाले. गेली चोवीस वर्ष पक्षातल्या अनेक पदांवर निवडणुका झालेल्या नाहीत. नियुक्त्या केलेल्या लोकांकडून गंभीर सल्ले येण्याची शक्यता नसते. वर्किंग कमिटी 60-70  लोकांची झाली आहे. इतक्या मोठ्या कमिटीत नीट चर्चा होऊ शकत नसल्याचे चव्हाण म्हणाले. कॉंग्रेसने निवडणुका स्वतःच्या बळावर लढवाव्यात की मित्र पक्षांसोबत याबद्दल पक्षात दोन मतप्रवाह आहेत. सोनिया गांधींच्या नेतृत्वात ही सगळी पुढची प्रक्रिया आता नीट पार पाडली जावी अशी आमची आशा असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले भाजपचा उघड ध्रुवीकरण करण्याचा जो प्रयत्न चालला आहे, त्याला कसं उत्तर द्यायचं यावर चिंतन शिबिरात चर्चा झाल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले. भाजप स्वतः पुढे न येता कधी नट्यांना, तर कधी राज ठाकरेंना पुढे करते. भाजपकडून लोकांना चिथावण्याचे प्रयत्न चालू आहेत. ही भाजपची रणनिती असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले. कायद्याचा धाक दाखवून अशा लोकांना सरळ केले पाहिजे असेही ते म्हणाले.

लोकशाही आघाडीचे शहर संघटक, उदय कला गणेश व नवरात्र उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष अजय भास्कर सुर्यवंशी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा...


वेध माझा ऑनलाइन - 
लोकशाही आघाडी कराड शहरचे संघटक, उदय कला गणेश व नवरात्र उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष अजय भास्कर सुर्यवंशी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त स्व.सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथे रोटरी क्लब ऑफ कराड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित रोटरी अन्नछत्र सेवेच्या सहकार्याने रुग्ण व नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले.
        
अजय सुर्यवंशी हे लोकशाही आघाडीचे संघटक असून उदय कला गणेश व नवरात्र उत्सव मंडळाचे सक्रिय सदस्य आहेत. शनिवार पेठ येथील प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
      यावेळी नगरसेवक वैभव हिंगमिरे, नगरसेवक मोहसीन आंबेकरी, शिवाजी पवार (तात्या), रवींद्र मुंढेकर, अँड. प्रताप पाटील, महेश कदम, मंगेश वास्के, राकेश शहा, रोटरी क्लब कराडचे  प्रबोध पुरोहित, प्रताप भोसले,शशिकांत सुर्यवंशी, राजेंद्र रैनाक, किरण यादव, सुनील घोरपडे(नाना),  शशिकांत शिंदे, महेश सुर्यवंशी, चंद्रहार नलवडे,  दादा पवार, महेश पाटील,अक्षय रैनाक, ओंकार देसाई,  ऋषी देसाई, विशाल देसाई, अशोक चव्हाण, सागर पाटील, पापा शेख, सुरज पाटील, सौरभ पाटील, संभाजी शेडगे, दिगंबर शेडगे, सनी आलेकरी, गणेश पाटील, किशोर सुर्यवंशी, निखिल मोहिते, सुहास मुळीक, संजय मुळीक, गणेश गवळी, विश्वजीत देसाई आदी उपस्थित होते.



Saturday, May 14, 2022

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार जाहीर...


वेध माझा ऑनलाइन - मिरज येथील यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार समितीच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा यावर्षीचा यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना जाहीर झाला आहे. रविवार 15 रोजी दुपारी 1.30 वाजता मिरजच्या बालगंधर्व नाट्यगृहात या पुरस्काराचे वितरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. समितीचे सचिव विठ्ठलराव पाटील यांनी ही माहिती दिली.
या समितीच्या वतीने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान यासह विविध पदांवर काम करून स्वच्छ चारित्र्याचा वस्तूपाठ देशासमोर ठेवणारे धुरंदर नेते यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा मिरज येथे महाराष्ट्र - कर्नाटक राज्याच्या सीमेवर उभारण्यात आला आहे. या माध्यमातून यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे कार्य, वैचारिक वारसा पुढे नेणार्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात येते. आतापर्यंत माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,  दिवंगत आर.आर. पाटील, वाशिमचे चंद्रकांत ठाकरे, दिवंगत विष्णूअण्णा पाटील, कृषी तज्ज्ञ आप्पासाहेब पवार आदींना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
रविवारी होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार श्रीमती सुमनताई पाटील, आमदार मानसिंग नाईक, आमदार विक्रम सावंत यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या अध्यक्षा श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र मेथे, सचिव विठ्ठल पाटील यांनी केले आहे.

सध्या एक मुन्नाभाई भगवी शाल पांघरून फिरतोय ; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

 वेध माझा ऑनलाइन - आम्हाला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे, असं शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. आता फडणवीस म्हणतात आम्हाला गधाधारी म्हणतात. आमचं हिंदुत्व गदाधारी आहे. गध्यांना आम्ही अडीच वर्षांपूर्वीच सोडलं आहे, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सणसणीत टोला लगावला. यावेळी त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंवर नाव न घेता हल्ला चढवला.दरम्यान सध्या एक मुन्नाभाई भगवी शाल पांघरून फिरतोय असाही टोला उद्धव यांनी राज याना लगावला

काही दिवसांपूर्वी मला एका शिवसैनिकाचा फोन आला. तो मला विचारत होता, साहेब तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का? मी त्याला विचारलं, त्याचा काय संबंध? तर तो म्हणाला, त्या चित्रपटात संजय दत्तला सगळीकडे गांधीजी दिसत होते. आपणच गांधीजी झाल्यासारखं त्याला वाटत होतं. तसं सध्या एकाला वाटू लागलंय. हल्ली एक मुन्नाभाई फिरतोय, असा टोला ठाकरेंनी लगावला.

सध्या एकजण भगवी शाल पांघरून फिरतोय. आपणच बाळासाहेब असं त्याला वाटू लागलंय. पण मुन्नाभाई चित्रपटाच्या शेवटी संजय दत्तला कळतं की आपल्या डोक्यात केमिकल लोचा झाला आहे. तसंच यांचंही झालंय. त्यामुळे यांना फिरू द्या. कधी ते मराठीचा मुद्दा घेऊन फिरतील. कधी हिंदूंचा मुद्दा घेऊन येतील. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा चिमटा उद्धव ठाकरेंनी काढला.

शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक

वेध माझा ऑनलाइन - शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांकडून  केतकी चितळेला अटक करण्यात आली  आहे. कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. 

केतकी चितळेनं तिच्या फेसबुक आकाऊंटवर ही आक्षेपार्ह पोस्ट शेअर केलीय. अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीनं शरद पवार यांना उद्देशून लिहिलेली ही पोस्ट आहे. शरद पवारांनी जवाहर राठोड यांच्या कवितेवरून केलेल्या वक्तव्यानंतर पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टिपण्णी असलेली ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
केतकी चितळे हिला नवी मुंबई पोलिसांनी कळंबोली येथून ताब्यात घेतले आहे. तिचा शोध ठाणे गुन्हे शाखा करत होती. आता ठाणे गुन्हे शाखेची टीम रवाना झाले असून तिला नवी मुंबई पोलिसांकडून ठाणे गुन्हे शाखा ताब्यात घेणार आहे. सध्या कळंबोली इथे असलेल्या तिच्या मावशीच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नवी मुंबई पोलिसांकडून ताबा मिळाल्यानंतर केतकी हिला ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले जाणार आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 
केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे सायबर विभागाकडे तक्रारी दाखल केली.

Friday, May 13, 2022

शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल

वेध माझा ऑनलाइन - मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिनं तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर ती ट्रोल होत असून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. केतकी विरोधात कळव्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केतकीला अटक होण्याची देखील शक्यता आहे. 

केतकी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे केतकी अनेकदा अडचणीत सापडली आहे. त्यामुळे नेटकरी तिला ट्रोलदेखील करत असतात. केतकीने आता तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. नेटके यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, केतकी चितळेनं ही पोस्ट केल्यामुळं पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. केतकीनं ही पोस्ट करुन दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं आहे. शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनं केली असल्याची तक्रार नेटके यांनी कळवा पोलिस ठाण्यात केली आहे. 

संभाजी महाराज जयंतीची जय्यत तयारी शंभूतीर्थावर आकर्षक सजावट ; उद्या विविध कार्यक्रम...

वेध माझा ऑनलाइन - येथील भेदा चौकात (शंभूतीर्थ) स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची 365 वी जयंती शनिवार 14 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त शिवतीर्थ परिसरात पताका, कमानी, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

उद्या शनिवारी 14 रोजी सकाळी 8.30 वाजता शिवतीर्थावर गुढी उभारण्यात येणार आहे. तर 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यावेळी किल्ले पुरंदरवरून आणलेल्या ज्योतचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी 5 वाजता 365 माता-भगिनींची पारंपरिक वेशात रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली शंभूतीर्थावर आल्यानंतर शंभूजन्माचा पाळणा होणार आहे. त्यानंतर व्याख्याते प्रा. अरूण घोडके (इस्लामपूर) यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज' या विषयावर व्याख्यान होणार आहे.    
जयंतीसाठी शिवतीर्थावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. साईट व्ही या जागेला पताका, झालर व रोषणाई करण्यात आली आहे. या परिसरातील सर्व रस्त्यांवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. शिवतीर्थावर आकर्षक सजावट करण्यात आली असून तेथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळय़ाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तर सायंकाळी व्याख्यानाचा कार्यक्रम याचठिकाणी होणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाई हे या सोहळय़ाचे वैशिष्टय़ असणार आहे.  
शिव-शंभूप्रेमींनी शहरात प्रथमच भव्य स्वरूपात होणाऱया या जयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.  

पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था
जयंतीनिमित्त शहर व तालुक्यातील शिव-शंभूप्रेमी मोठय़ा संख्येने येणार असल्याने चार चाकी व दुचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था रत्नागिरी गोडावून, बैलबाजार रस्ता, छत्रपती संभाजी भाजी मार्केट या ठिकाणी करण्यात आली आहे. साईट व्ही लगतच्या रस्त्यांवर कोणीही वाहने लावू नयेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

उष्णतेनं हैराण झालेल्यांसाठी आनंदाची बातमी ; या वर्षी मान्सूनचं आगमन वेळे आधीच होणार ; 27 मे ला केरळमध्ये होणार मान्सूनचे आगमन ;

वेध माझा ऑनलाइन -  उष्णतेनं हैराण झालेल्या देशवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या वर्षी मान्सूनचं आगमन वेळे आधीच होणार आहे. येत्या 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. पोषक वातावरण राहिल्यास त्या पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकणार आहे. 
केरळमध्ये मान्सून हा साधारणपणे 31 मे रोजी दाखल होतो. गेल्या वर्षी जूनमध्ये मान्सून दाखल झाला होता. आता या वर्षी आलेल्या चक्रीवादळाचा काही प्रमाणात मान्सूनवर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तब्बल पाच दिवस आधी मान्सून केरळमध्ये धडकणार आहे असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. 


|

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ ; धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर केली वाढ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांची सुरक्षा व्यवस्था तीच आहे पण त्यातील पोलिसांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. राज ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. 

राज ठाकरे यांना देण्यात आलेल्या सुरक्षेचा दर्जा  ( Y +) आहे. मात्र पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस अंमलदार वाढवला. भोंगा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना  जीवे मारण्याचा धमकीचे पत्र पत्र आले आहे. या प्रकरणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंची पोलीस सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य पाहाता राज्य सरकारच्या वतीनं राज ठाकरे यांच्या सुरक्षेतील पोलीस कर्मचारी संख्येत करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांना जीवे मारण्याचं पत्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. राज ठाकरेंनी भोंग्याविरोधात भूमिका घेतली, तसेच भोंग्यबाबत सुरू असलेलं आंदोलन थांबवण्यासाठी या धमक्या मिळत आहेत अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. या पत्रात उर्दू शब्दांचा वापर केल्याचा दावा नांदगावकरांनी केला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत राज्य, केंद्र सरकारनं दखल घ्यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. आता राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आला आहे. 

उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा..
राज ठाकरेंनी 5 जूनला अयोध्येत जाण्याचं जाहीर केलंय. मनसेनं या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु केलीय. तर उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असं भाजपचे उत्तर प्रदेशमधील खासदार  बृजभूषण सिंह म्हटलं होतं. खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅली काढली होती