वेध माझा ऑनलाइन - 2017 साली भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती, अशी वक्तव्यं भाजप नेत्यांकडून आल्यानंतर आता यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. दैनिक लोकसत्तातर्फे आयोजित 'दृष्टी आणि कोन' या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी 2017 साली युतीची चर्चेच्या छुप्या घडामोडींबाबत किमान माहितीही शिवसेनेला नव्हती. शिवसेना-भाजप युती 25 वर्षे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घट्ट होती. मात्र यांचे दाखवायचे दात कोणते आणि खायचे दात कोणते हे दिसलंय, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकाळचा शपथविधी होण्यापूर्वी दोन वर्षे आधीच, 2017 साली राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये युतीची चर्चा झाली होती असं आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं होतं. या वक्तव्याला सुधीर मुनगंटीवार यांनी दुजोरा दिला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 2017 साली युतीची चर्चा सुरु होती या छुप्या घडामोडींची माहिती किमान शिवसेनेला नव्हती. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना-भाजप युती 25 वर्षे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घट्ट होती. दाखवायचे दात कोणते आणि खायचे दात कोणते हे दिसलं. मात्र आतातरी 3 विरुद्ध 1 असंच आताचं चित्र आहे. तीन पक्षांच्या सरकारनं अर्धा काळ पूर्ण केला हा विरोधकांना धक्का आहे,असं ठाकरे म्हणाले. त्यांनी म्हटलं की, आता सरकार उत्तम चाललंय. पवारांचं मार्गदर्शन वडिलधाऱ्यांप्रमाणे आहे. आमच्या गप्पा होतात. तिघेही मिळून एकत्र काम करतोय, असंही ते म्हणाले. शिवसेनेचे आमदार नाराज असल्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, अर्थाचा अनर्थ लावला गेला. कामं रखडली, निधी आणायचा कुठून हा प्रश्न होता. सर्वपक्षीय तक्रार होती. लोक शेवटी लोकप्रतिनिधींना विचारतात. त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवायला हवेत,असं ते म्हणाले.
No comments:
Post a Comment