Wednesday, January 31, 2024

ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजा करता येणार; न्यायालयाचे निर्देश

वेध माझा ऑनलाइन। वाराणसी न्यायालयाने बुधवारी हिंदू भाविकांना ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात प्रार्थना – पूजा करण्याचा अधिकार बहाल केला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार हिंदू भाविक ‘व्यासाचे तळघर’ (व्यास का तेखाना) मध्ये पूजा करू शकतात. सध्या मशिदीतील हा भाग बंद ठेवला गेलेला आहे. जिल्हा प्रशासनाने पुढील सात दिवसांत हिंदूंना त्याठिकाणी पूजाअर्चा करण्याची व्यवस्था करून द्यावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

या निकालानंतर हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, व्यासाचे तळघर येथे हिंदूंना पूजाअर्चा करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. आता जिल्हा प्रशासनाने सात दिवसांच्या आत तिथे व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून तिथे प्रत्येकाला पूजा करण्याची संधी मिळेल. यानिर्णयानंतर हिंदू पक्षकारांनी न्यायालयाबाहेर आनंद व्यक्त केला

वाराणसी जिल्हा प्रशासनाने २४ जानेवारी रोजी ज्ञानवापी मशिदीच्या आवारातील दक्षिणेकडे असलेल्या तळघराचा ताबा घेतला होता. आचार्य वेद व्यास पीठ मंदिराचे मुख्य पुजारी शैलेंद्र कुमार पाठक यांनी यासंबंधी खटला दाखल केला होता. त्यानंतर वाराणसी जिल्हा न्यायालयाने मशिदीच्या दक्षिणेकडील तळघराचा ताबा वाराणसी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे दिला होता.

सांगलीत जयंत पाटील यांना धक्का; माजी महापौर, नगरसेवक अजित पवार गटात !

वेध माझा ऑनलाइन। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले काही नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे याआधी अजित पवार गटाने माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे, तसेच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचा पक्षप्रवेश करुन शरद पवार गटाला झटका दिला होता. त्यानंतर आता पुन्हा जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक नगरसेवक अजित पवार गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांनी सोमवारी कोल्हापुरात सांगलीतील माजी महापौर आणि नगरसेवकांनी भेट घेतली. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी महापौर सुरेश पाटील, माजी नगरसेवक हणमंत पवार, विष्णु माने, गजानन मगदुम यांचा समावेश आहे. त्यांच्यासमवेत अजित पवार गटाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे तसेच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी उपस्थित होते. या नेत्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने जयंत पाटील यांना अजित पवार गट दुसरा जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अजित पवार यांच्या 5 फेब्रुवारीच्या सांगली जिल्ह्यातील दौऱ्यात जयंत पाटील यांचे अनेक कट्टर समर्थक अजित पवार यांच्या गटात जाहीर प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरदार सुरू झाली आहे

अजित पवार यांच्या पक्षप्रवेशावेळी जयंत पाटील यांना धक्का बसणार?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी कोल्हापुरात भेट घेतली. मात्र ही भेट राजकीय नसल्याचे सर्वांनी सांगत सांगलीत राज्यस्तरीय खोखो स्पर्धेसाठी निमंत्रण देण्यासाठी आणि विकास कामासाठी भेटल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीमध्ये अजितदादांच्या 5 फेब्रुवारीच्या सांगली दौऱ्यात अनेकांचा प्रवेश होण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे.

मंडल आयोगाला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू, वकिलांची बैठक घेणार; मनोज जरांगे पाटील यांच्या विधानाने खळबळ ; मराठा, ओबीसी संघर्ष पेटणार!

वेध माझा ऑनलाईन। मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या वेशीपर्यंत लाखो मराठ्यांना आणल्यानंतर सरकारने माघार घेतली. राज्य सरकारने सगेसोयऱ्या कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यातील अडचणी दूर करणारा अध्यादेश काढला. परंतू या अध्यादेशावर ओबीसी नेते छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अध्यादेशावर हरकती उपस्थित करीत त्याला आव्हान देणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी अध्यादेशाबद्दल काही दगाफटका झाला तर मंडल आयोगालाच चॅलेंज कणार असून आपण वकीलांची लवकरच बैठक घेणार असल्याचे म्हटल्याने आता ओबीसी विरुद्ध मराठा राजकारण तापले आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. त्यांचा पुन्हा ऐकरी उल्लेख करीत त्याला माणस मोजायला पुलावर उभे रहायला मी सांगितले होते, पण तो थांबला नाही. त्यामुळे त्याला कोटी मराठे कसे दिसतील ? मराठ्यांची 64 किलोमीटर रांग होती आणि एकूण 27 टप्पे होते असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन काहीही काळजी न करण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठ्यांना केले आहे.

तर पुन्हा उपोषणाला बसु
आरक्षणाचा कायदा मोठा आहे. हे समाजाने लक्षात घेतले पाहिजे. ‘सरसकट’ या शब्दाला काहीही होणार नाही. कितीही जण एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असा ठाम विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाच हे प्रकरण कोर्टात गेलं तर काही होणार नाही. यात सरकारने 22 दिवस आणि आमच्या तज्ज्ञांनी कष्ट घेतले आहे. तरीही आम्ही सावध आहोत अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची आणि ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी आपण उपोषणाला बसणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.


तर शंभर टक्के मंडल आयोगाला चॅलेंज
माझं सर्वसामान्य ओबीसी बांधवांना सांगणं आहे की, त्याला (छगन भुजबळ) सांगा की कोर्टात आव्हान देऊन गोरगरीब ओबीसीचे नुकसान करू नको असे जरांगे पाटील भुजबळांना इशारा देताना म्हटले आहे. मंडल आयोग कोर्टाने स्वीकारलेला नाही. त्यामुळे छगन भुजबळने जर पुन्हा काड्या केल्या तर मी शंभर टक्के मंडल आयोग चॅलेंज करेन. मंडल आयोगाला चॅलेंज करण्याबाबत लवकरच मी वकिलांची बैठक घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने आमची कुठेही फसवणूक केलेली नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आमच्या पाठीमागे उभे राहतील असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.


Tuesday, January 30, 2024

आता मनोज जरांगे धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी लढा देणार ! ;

वेध माझा ऑनलाइन ; नुकत्याच राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळे या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा जयजयकार होत आहे. मनोज जरांगे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना, “मी जसा मराठा आरक्षणासाठी लढा दिला तसाच धनगर आणि मुस्लिम यांच्या आरक्षणासाठी देखील लढा देणार आहे” असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, “आरक्षण हा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे. आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला की, धनगर आणि मुस्लीम बांधवांना आरक्षण कसं देत नाहीत तेच बघतो. त्यांचाही प्रश्न सुटला पाहिजे असं माझं मत आहे. पण, त्यांनीही म्हटलं पाहिजे हा प्रश्न सुटला पाहिजे. धनगर बांधव आणि मुस्लीम बांधव म्हणाला तर मग, मी पाहतो सरकार कसं आरक्षण देत नाही”

आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांनंतर धनगर मुस्लिम बांधवांना देखील पाठिंबा देणार असल्याचे म्हटल्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी सरकारच्या नाकी नऊ आणले आहेत. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलन थेट मुंबईच्या दिशेने वळवले होते. यावेळी त्यांच्यासोबत कोट्यावधी मराठा समुदाय होता. परंतु हे आंदोलन मुंबईला धडकण्यापूर्वीच राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता मराठा समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन; रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

वेध माझा ऑनलाइन। शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर (वय ७४) यांचे निधन झाले आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनिल बाबर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार म्हणून ओळख होती. शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. 

सांगलीच्या खानापूर मतदारसंघाचे अनिल बाबर प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीने सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. २०१९च्या निवडणूकीत अनिल बाबर यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. अनिल बाबर यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा राजकीय प्रवास आहे. अनिल बाबर हे ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. १९९०, १९९९, २०१४, २०१९ ला आमदारकीला ते निवडून आले होते.

मुलाला आणि सुनेला घराबाहेर काढावं, ; घराचा ताबा आईकडे द्यावा ; 70 वर्षीय विधवा आईला घराबाहेर काढणाऱ्यांना हायकोर्टाचा दणका ;

वेध माझा ऑनलाइन। आपल्या वयोवृद्ध आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलाला हायकोर्टान चांगलाच झटका दिला. मुलगा आणि सुनेनं 15 दिवसांत त्यांचं राहतं घर रिकामं करावं अन्यथा त्यांना पोलिसांनी घराबाहेर काढून घराचा ताबा आईला द्यावा, तसेच भविष्यात मुलानं या घरावर दावाही करु नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना आजही आपल्या हक्कांसाठी वेळोवेळी न्यायालयाचं दार ठोठवावे लागतय, याचा अर्थ जग अजूनही आदर्शवादी झालेले नाही. स्वार्थाची मूळं आजही खोलवर रुजलेली आहेत असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं

वयाच्या 70 व्या वर्षीय विधवा आईला मुलानंच घराबाहेर काढल्याची तक्रार करत आईनं प्राधिकरणात धाव घेतली होती. प्राधिकरणानं मुलगा आणि सुनेलाच घरातून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात मुलानं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी घेत न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठीनं प्राधिकरणाच्या आदेशावर शिक्कामोर्तब करत मुलाला घराबाहेर काढण्याचा आदेश कायम ठेवला.

हायकोर्टाचं निरीक्षण
उतारवयात मुलांनी आईची काळजी घ्यायला हवी, तिला प्रेमानं वागवायला हवं. पण याप्रकरणात आईला आपल्याच घरासाठी झगडावे लागतंय. पोटच्या मुलानंच आईला त्रास देत तिला या वयात कायदेशीर लढाई लढण्यास भाग पाडलं ही अत्यंत वेदनदायी बाब आहे, असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय.

याप्रकरणात उतारवयात मुलाकडून आईला नाहक त्रास देण्यात आलाय. ही परिस्थिती टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायदा तयार करण्यात आला आहे. आईडवडिल जीवंत असताना त्यांच्या कोणत्याच संपत्तीवर मुलांना दावा करता येत नाही. त्यांच्या निधनानंतर भावंडांमध्ये वाद असेल तर त्यासाठी दिवाणी खटला दाखल करण्याची तरतूद आहे. आईवडिल जीवंत असेपर्यंत भावंड एकमेकांविरोधात असे खटले दाखल करु शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण?
मुलुंड येथील रहिवासी दिनेश चंदनशिवे यांनी ही याचिका हायकोर्टात केली होती. मला पक्षघाताचा एक झटका येऊन गेला आहे, मी कमवत नाही. पत्नीच्या उत्पन्नावर घर खर्च चालतो. त्यामुळे आम्हाला घराबाहेर काढू नये, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.

मात्र मुलगा मला आजारपणात बघायला आला आणि घरीच राहिला. त्यानं व सुनेनं मला त्रास दिला व मलाच घराबाहेर काढलं. सध्या मी माझ्या मोठ्या मुलाकडे लहान घरात राहते. मला घराबाहेर काढणाऱ्या मुलाचं स्वतःचं घर आहे. ते घर घेण्यासाठी वडिलांनीच त्याला मदत केली होती. पण त्याला हे घर आता विकायचं आहे. तो माझी काळजी घेत नाही, औषधांना पैसे देत नाही. हे घर माझ्या पतीनं घेतलं होतं. त्यांच्या निधनानंतर 2015 पासून मी एकटीच या घरात राहते. त्यामुळे मुलगा व सुनेला घराबाहेर काढण्याचे आदेश योग्यच आहेत, असा दावा पीडीत आईच्यावतीनं अॅड. अजित सावगावे यांनी हायकोर्टात केला होता. जो ग्राह्य धरत हायकोर्टानं प्राधिकरणाचा आदेश कायम ठेवत मुलगा व सुनेला घराबाहेर काढण्याचे निर्देश दिले.

10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण: मनोज जरांगे पाटलांची घोषणा, सरकारला पुन्हा अल्टिमेटम

वेध माझा ऑनलाइन। सरकारने सगेसोयरे याबाबत अधिसूचना काढली त्याची तातडीने अंमलबजावणी करायला हवी. अद्याप प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झाला नाही. सगेसोयरेबाबत १५ दिवसाच्या वेळेत त्याचे विशेष अधिवेशन बोलावून कायद्यात रुपांतर करावे. तातडीने उद्यापासून अंमलबजावणी सुरू केली नाही तर १० फेब्रुवारीपासून मी पुन्हा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही. कायदा टिकवण्याची जबाबदारी सरकारने पार पाडली नाही तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको. नोंदी मिळत नाही, समिती कामही करत नाही अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, समिती काम करत नसल्याचे दिसते, नाईलाजास्तव सगेसोयरे या कायद्याची अंमलबजावणी करून ज्याची कुणबी नोंद मिळाली त्यांच्या सगेसोयऱ्यांना आणि कुटुंबाला प्रमाणपत्र वाटप होणे गरजेचे आहे. म्हणून या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि हा कायदा मराठ्यांसाठी कायमस्वरुपाचा असावा यासाठी आमरण उपोषणाची रायगडच्या पायथ्याहून घोषणा करतोय. त्याचसोबत अंतरवालीसह महाराष्ट्रातील गुन्हे मागे घेण्याचं सांगितले होते. त्याठिकाणी तातडीने सरकारनं शब्द वापरला होता. तात्काळ याचा अर्थ काय? सरकारची भूमिका कळत नाही त्यामुळे १० फेब्रुवारीच्या आत सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली.

पाकिस्तानातून मोठी बातमी ; माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा ; पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ

वेध माझा ऑनलाइन। पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिफर प्रकरणात इमरान खान यांना आणि त्यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते शाह महमूद कुरेशी यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रावळपिंडी येथील विशेष न्यायालयात न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांनी अडियाला तुरुंगात ही घोषणा केली. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता आहे

गोपनीय राजनैतिक कागदपत्रं उघड केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आल होत. मात्र आपल्यावर करण्यात आलेले आरोप राजकीय सूडबुद्धीने करण्यात येत आहेत असा दावा इम्रान खान यांनी केला होता. गेल्या वर्षभरापासून अडियाला कारागृहात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. अखेर आज कोर्टाने इम्रान खान याना दोषी ठरवत १० वर्षाची शिक्षा ठोठावली. महत्वाचे म्हणजे पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मात्र तत्पूर्वीच त्यांना १० वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आल्याने त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका मानला जात आहे. मात्र अजूनही त्यांना या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याचा पर्याय आहे मात्र सध्या त्यांचे आणि पाकिस्तानी लष्कराचे वाद सुरु आहेत ते पाहता त्यांना फारसा दिलासा मिळेल याची शक्यता नाही.

Saturday, January 27, 2024

मोठी बातमी! मराठा समाजाकडे जमीन किती? मागासवर्ग आयोगाने मागविली माहिती ;

वेध माझा ऑनलाइन। राज्य सरकारने १३ नोव्हेंबर २०२३ रोजी पाठविलेल्या पत्रानुसार राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे सामाजिक मागासले पण तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.राज्य सरकारने १३ नोव्हेंबर २०२३ रोजी पाठविलेल्या पत्रानुसार राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे सामाजिक मागासले पण तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील मराठा समाज, खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण घरोघरी जाऊन सुरू करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समांतर पातळीवर राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य शासनाला पत्र पाठवून मराठा समाजातील नागरिकांच्या जमिनींची माहिती मागविली आहे. मराठा समाजातील नागरिकांकडे किती जमीन आहे याबाबतची १९६० ते २०२० या कालावधीतील माहिती मागविण्यात आली आहे. त्याकरिता आयोगाने एक नमुना तयार केला आहे एकूण क्षेत्र हेक्टरमध्ये, शेतकरी संख्या आणि मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या यांचा समावेश असलेली माहिती मागविली आहे. त्या नमुन्यानुसार ही माहिती महसूल विभागाकडून प्राप्त करून देण्याची विनंती राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य शासनाकडे केलेली आहे.

मराठ्यांना का ? सर्वांनाच मोफत शिक्षण द्या, छगन भुजबळ यांची मागणी

वेध माझा ऑनलाइन।  मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीतून पदयात्रा काढली होती. या आंदोलकांनी मुंबईत येण्याचा निर्धार व्यक्त केला होता. काल सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या. सगेसोयऱ्याबाबत अध्यादेश काढण्याची मागणी जरांगे यांनी केली होती अन्यथा आम्ही आझाद मैदान गाठू असे म्हटले होते. काल रात्री सगेसोयरेबाबत अध्यादेश सरकारने काढला आहे. त्यानंतर मराठा आंदोलकांनी जल्लोष केला. जरांगे यांनी उपोषण आंदोलन मागे घेतले. आता ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी हा अध्यादेश नसून नोटीफिकेशचा मसूदा आहे. यावर 16 तारखेपर्यंत हरकती मागविल्या आहेत. जरांगे यांनी मराठ्यांना 100 टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना शंभर टक्के मोफत शिक्षण द्यावे अशी मागणी आहे. त्यावर मराठ्यांना मोफत शिक्षण का ? सर्वांनाच मोफत शिक्षण देण्यात यावे असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. यावर पुढील निर्णय घेण्यासाठी उद्या सायंकाळी पाच वाजता त्यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे.

छगन भुजबळ म्हणाले...मराठ्यांनो राजपत्र काढलंय, अध्यादेश नव्हे ; वाचा बातमी सविस्तर...


वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षणासाठी  मनोज जरांगे यांनी ज्या काही मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्या मान्य कऱण्यात आल्या असून त्याबाबतचा नवा जीआर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर मराठा बांधवानी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला आणि मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सुद्धा मागे गेले. मात्र या सर्व घडामोडीनंतर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. मराठ्यांनो राजपत्र काढलंय, अध्यादेश नव्हे. या मसुद्यावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेता येणार आहेत. आपण समुद्रात पोहत होतो, आता विहिरीत पोहावं लागेल, असं म्हणत भुजबळांनी मराठा समाजाला
 धोक्याची घंटा सांगितली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला वाटतंय की तुम्ही जिंकलाय, पण ओबीसीच्या १७ टक्क्यांमध्ये ८०-८५ टक्के लोक येतील, EWS खाली तुम्हाला जे १० टक्के आरक्षण मिळत होतं, ज्यामध्ये ८५ टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत होतं, ते यापुढे मिळणार नाही, ओपनमध्ये जे उरलेले ४० टक्के होते, त्यात तुम्हाला आरक्षण मिळत होतं, तेही यापुढे मिळणार नाही, एकूण ५० टक्के तुम्हाला मिळत होतं, ती संधी गमावली, या सगळ्यावर आता पाणी सोडावं लागेल. म्हणजेच आपण समुद्रात पोहत होतो, आता विहिरीत पोहावं लागेल असं भुजबळ म्हणाले.

ओबीसींवर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसविले जातेय, याचा अभ्यास आपल्य़ाला करावा लागेल अशी सावध प्रतिक्रिया सुद्धा छगन भुजबळ यांनी दिली. राज्य सरकारने सध्या काढलेला जीआर ही एक प्रकारची नोटीस आहे, त्यावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेता येणार आहेत. आता ओबीसी समाजातील वकिल व तज्ज्ञांनी लाखोंच्या संख्येने हरकती पाठवून द्याव्या. त्यामुळे सरकारला दुसरी बाजू लक्षात येईल असं आवाहन भुजबळांनी केलं. रविवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील सरकारी बंगल्यावर सर्वपक्षीय ओबीसी व दलित, आदिवासी समाजाच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे अशी माहितीही भुजबळांनी सांगितली. झुंडशाहीने नियम – कायदे बदलता येत नाही. उद्या लाखो लोक घेऊन अजून कोणी आले तर आपण कायदा बदलणार आहोत का? असा सवाल सुद्धा त्यांनी सरकारला केला.


Friday, January 26, 2024

सरकारकडून मनोज जरांगेंच्या कोण-कोणत्या मागण्या झाल्या मान्य? वाचा , संपूर्ण यादी...

वेध माझा ऑनलाइन।  मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठे यश मिळाले आहे. 

सरकारचा अध्यादेश स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मनोज जरांगे पाटील यांच्या हाती देणार आहेत. दरम्यान, आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या नेमक्या काय होत्या? त्यातील कोण-कोणत्या मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर त्या मागण्यांबद्दल जाणून घ्या...

मनोज जरांगेंच्या कोण-कोणत्या मागण्या मान्य? पाहा...

- नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. ती मान्य करण्यात आली आहे.

- राज्यभरात ५४ लाख नाही तर ५७ लाख नोंदी मिळाल्या आहेत. आतापर्यंत ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे. याचा डेटा आम्हाला द्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली.

- शिंदे समिती रद्द करायची नाही, ही मनोज जरांगे यांची मागणी मान्य झाली. सरकारने दोन महिने मुदत वाढवली. तसेच समितीची मुदत आणखी टप्प्याने वाढवणार असल्याचे सरकारने मान्य केले आहे.

- सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, त्याशिवाय सोयऱ्यांचा फायदा होणार नाही, अशी मनोज जरांगेंची मागणी होती, ती सरकारने मान्य केली.

- ज्या महाराष्ट्राच्या मराठ्यांकडे कुणबीची नोंद नाही, त्या बांधवांनी शपथपत्र करुन द्यायचे आहे. त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचे आहे. हे शपथपत्र १०० रुपयांना आहे. परंतु ते मोफत देण्याचे मान्य केले.

- अंतरवाली सराटीसह मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या, त्यासाठी गृहविभागाने पत्र द्यावे, अशी मनोज जरांगेंची मागणी होती. ती देखील मान्य करण्यात आली.

- मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायची नाही. जर भरती केलीच, तर आमच्या जागा राखीव ठेवा, अशी मागणी मनोज जरांगेंनी यांनी केली होती. ही मागणी सुद्धा सरकारने मान्य केली आहे.

- क्युरेटिव पिटीशनचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. ते आरक्षण मिळेपर्यंत आणि मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे ही मागणी मान्य झाली.

Thursday, January 25, 2024

लोणावळा सोडलं... जरांगे पाटील चालले मुंबईला... म्हणाले...आता आरक्षण घेऊनच मागे येणार ; वाचा सविस्तर

वेध माझा ऑनलाइन
मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या आंदोलकांना परवानगी नाकारली आहे. असे असले तरी मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळ्यातून मुंबईला जाण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर त्यांनी वाटेत शिष्टमंडळ भेटण्यासाठी येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

काहीवेळापूर्वी जरांगे यांची काही अधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. या बैठकीत त्यांना मोठे शिष्टमंडळ येत असल्याचे सांगितले होते. परंतु जरांगेंनी मुख्यमंत्र्यांनी, दोन उपमुख्यमंत्र्यांनी यावे असे आवाहन करत आपण दुपारपर्यंत लोणावळ्यात थांबल्याचे स्पष्ट केले होते. मला मुंबईला यायची हौस नाहीय. इथेच आरक्षण मिळाले तर तिकडे येऊन काय करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 
याचबरोबर मोर्चात सहभागी झालेल्या मराठा समाजालाही जरांगे यांनी सावध केले आहे. मोर्चात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला थेट पोलिसांच्या ताब्यात द्या असे त्यांनी म्हटले आहे. हे लोक काहीही करू शकतात, मोर्चात घुसू शकतात, यामुळे मी समाजाला सावध केल्याचे जरांगे म्हणाले. 
 मी आता मुंबईला निघालो आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले. मी सरकारला मदत करणारा आहे. मार्ग बदलला असेल तर मी अडवणूक करणार नाही. आम्ही त्या मार्गाने जाऊ, असेही जरांगे म्हणाले. मंत्री आणि सचिव यांचे शिष्टमंडळ येणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर, भगवी लाट कधीही येणार… अन् मुख्यमंत्री काय म्हणतात पहा...

वेध माझा ऑनलाइन ।
मराठा आरक्षण सरकार देणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका काल आज आणि उद्याही तीच राहणार आहे. ओबीसी आणि इतर कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सरकार आरक्षण देणार आहे, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला तर मागास वर्ग आयोग त्यासंदर्भात कामाला लागले आहे. १ लाख ४० हजार लोकांचं काम मराठा आरक्षणासंदर्भात तीन शिफ्टमध्ये सुरू आहे. तर कुणबी नोंदी जिथे सापडताय त्यांना कुणबी आरक्षण देण्याचे काम सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विनंती करत एकनाथ शिंदे पुढे असेही म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात सरकार अजूनही सकारात्मक आहे. सरकार मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मनस्थितीत आहे. ओबीसी समाजाला ज्याप्रमाणे सुविधा आहे, त्याप्रमाणे मराठ्यांना देखील सुविधा देण्याचे काम सरकार करत असल्याचे शिंदेंनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.



आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक ; या बैठकीतील दोघेजण अगोदरच भाजपशी बोलणी करून बसलेत, त्या दोघांचा भाजपमध्ये लवकरच होणार प्रवेश ; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन।  महाविकास आघाडीची आज अंतिम टप्प्यातील बैठक पार पडत आहे. या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यासंदर्भात भाजप नेते डॅा. आशिष देशमुख यांना सवाल केला असता त्यांनी खळबळजनक दावा केला आहे. 

महाविकास आघाडीच्या विविध पक्षांकडून वाटाघाटी करणारे जे नेते आहेत त्यापैकी किमान दोन नेत्यांची भाजप सोबत बोलणी झाली आहेत आणि ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. इंडिया आघाडीतून ममता बॅनर्जी असतील किंवा आप हा पक्ष वेगळा झाला आहे. त्याप्रमाणे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रातही फूट नक्कीच दिसणार आहे, असा खळबळजनक दावाही भाजप नेते डॅा. आशिष देशमुख यांनी केला आहे. तर महाविकास आघाडीतील मोठे दोन नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बघायला मिळतील, असा दावाही डॅा. आशिष देशमुख यांनी केला आहे.

जरांगे पाटील यांच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं,...कुणी व्यक्त केली ही शंका?

वेध माझा ऑनलाइन। मनोज जरांगे पाटील हजारो मराठ्यांसह मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर धडकले.... बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण जाण्यास भाजप आणि अजित पवार जबाबदार असल्याचे म्हणत भाजप आणि अजित पवार यांच्यावर मोठा हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे पाटील हजारो मराठ्यांसह मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर धडकले आहे.  तर मराठा समाजाला सरकार चॉकेलट देत आहे. मनोज जरांगे पाटील यांनाही हे माहीत आहे. यामुळे सरकारने फसवा, फसवी करायला नको. यामुळे हा आरक्षणाचा प्रश्न चिघळेल, असेही म्हटले आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी शंका व्यक्त करत म्हटले की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात तोडगा निघेल असे वाटत नाही. मनोज जरांगे पाटलांच्या जेवणात जुलाबाचे औषध टाकलं जाऊ शकतं, त्यामुळे त्यांनी चार जणांमध्ये जेवण करण्याचे नाकारून पंगतीत जेवण करावे, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे.
वेध माझा ऑनलाइन। सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले तयारीला लागले आहेत त्यांनी नुकतेच कराडच्या एस टी स्टॅण्ड समोरच आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्या त्याठिकाणी असलेल्या कार्यालयाजवळच आपले जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. 

राजे कराडकडे दुर्लक्ष करतात हा नेहमी आरोप त्यांच्यावर झालेला आहे त्याचा परिणाम देखील प्रत्येक निवडणुकीत कराडकरांनी दाखवून दिल्याने आता या होणाऱ्या निवडणुकीदरम्यान  स्वतः कराडात लक्ष घालुन येथील लोकांशी थेट संपर्क साधण्यासाठी  राजे पुढे सरसावले आहेत 

उदयनराजेंना गेल्या 2019 च्या पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीत कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघानी मताधिक्य कमी दिले होते. या तीन मतदारसंघांतील मतदारांची नाराजी महाराजांचा पराभव करण्यास कारणीभूत ठरली होती. आता याच मतदारसंघातील प्रमुख ठिकाणी असलेल्या कराड शहरातील एस टी स्टॅण्ड समोरच उदयनराजे भोसले यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे.कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघाशी थेट संपर्क साधून तेथील मताधिक्य बॅलन्स करण्यासाठी राजेंचा यातून प्रयत्न असणार असे समजते त्यामुळे हे संपर्क कार्यालय आतापासूनच सुरू करण्यात आले आहे आणि विशेष म्हणजे हे कार्यालय खासदार श्रीनिवास पाटील यांच्या कार्यालयापासून अगदीच जवळ आहे 

दरम्यान महायुती'त तिन्ही पक्षात उमेदवारीवरून दावे-प्रतिदावे सुरू असताना उदयनराजे भोसले यांनी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर सातारा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील प्रश्नांवर तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कामावर त्यांच्याकडून लक्ष दिले जात आहे.

आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचा यावर्षीचा 'कराड - गौरव पुरस्कार' ज्येष्ठ निवृत्त शिक्षिका सौ पुष्पा दिलीप कुलकर्णी यांना जाहीर ;

वेध माझा ऑनलाइन। आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठान चा सन 2024 चा 'कराड - गौरव पुरस्कार' शालेय, चित्रकला, स्काऊट गाईड संघटना, विकलांग विद्यार्थ्यांसाठी तसेच नाट्यक्षेत्र, आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य व राज्याच्याबाहेर दिल्लीपर्यंत,आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा ठसा उमटवीत या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या, ज्येष्ठ निवृत्त शिक्षिका सौ पुष्पा दिलीप कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे.

या पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष,राज्याचे माजी सहकार व प्रधानमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्तांच्या सभेमध्ये करण्यात आल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. यावेळी, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, एडवोकेट मानसिंगराव पाटील, राजेंद्र वसंतराव माने, दिलीपभाऊ चव्हाण, डॉ. विजयकुमार साळुंखे, सौ. रेश्मा कोरे,सौ. शोभा पाटील संयोजन समिती सदस्य प्रा. रामभाऊ कणसे, ए. एन. मुल्ला, मुकुंदराव कुलकर्णी, संभाजी पाटील, प्रकाश पवार, अबूबकर सुतार व सुहेल बारस्कर यांची उपस्थिती होती.

प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून (सन 1995 पासून), विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या जवळपास 80 मान्यवरांचा 'कराड - गौरव' पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.सन 2024 चा पुरस्कार सौ. पुष्पा कुलकर्णी यांना  पुढील महिन्यात (फेब्रुवारी) समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे...

जरांगें पाटलांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली, मुंबई पोलिसांनी दिलं हे कारण? वाचा सविस्तर...

वेध माझा ऑनलाइन। 
मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणासाठी आझाद मैदानात परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर येऊन थांबले आहेत, अवघ्या काही तासांत ते मुंबईत दाखल होणार होते. पण त्याआधीच मुंबई पोलिसांनी पत्र लिहून आझाद मैदानावरील उपोषण करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं. आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगेंना उपोषणासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 29 मधील  इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे. मनोज जरांगेंची परावानगी नाकारताना पोलिसांनी मनोज जरांगेंना काय उत्तर दिलं? ते जाणून घेऊयात...

आझाद मैदान पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांनी मनोज जरांगे यांना पत्र लिहून आझाद मैदान उपलब्ध नसल्याचं सांगितलं. त्यामध्ये त्यांनी कारणेही दिली आहेत. 

मुंबई पोलिसांच्या पत्रात काय म्हटलेय?
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई येथे विविध वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय वकालती व इतर वित्तीय केंद्रे कार्यरत असून मुंबईत अंदाजे दररोज 60 ते 65 लाख नागरिक हे नोकरी निमित्ताने ट्रेन व इतर वाहतूकीच्या माध्यमाने प्रवास करीत असतात. सकल मराठा समाज आंदोलक हे प्रचंड मोठया वाहन संख्येसह मुंबईत आल्यास त्याचा विपरीत परिणाम होवून मुंबईची दैनंदिन वाहतुक व्यवस्था कोलमडणार आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे 7000 स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. त्याची क्षमता 5000 ते 6000 आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे, परंतु तेथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही व त्याप्रमाणात सोयी सुविधा देखील तेथे नाहीत. तसेच उर्वरित मैदान क्रीडा विभागाच्या अख्यत्यारित असून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक मैदान ३०२४/प्र.क. १२/२०२४/कीयुसे-१, दि. २४.०१.२०२४ अन्वये तेथे आंदोलनासाठी परवान देण्यात आलेली नाही.

आपण लाखोच्या संख्येने आंदोलक व वाहनांसह मुंबईत येणार असल्याचे घोषित केले आहे, त्यामुळे मुंबईतील दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 

मुंबईची भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, उपलब्ध नसलेले पर्यायी रस्ते, खोळंबणारी वैद्यकीय सोयीसुविधा, त्यामुळे होणारी रुग्णांची हेळसांड व इतर अत्यावश्यक सेवांवर होणारा प्रभाव पाहता मुंबईतील एकूण सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे आपण वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे हे आंदोलन प्रचंड संख्येचे असून मुंबईमधील कोणत्याही मैदानामध्ये एवढ्या प्रचंड मोठया संख्येच्या आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता नाही. सदरचे आंदोलन हे अनिश्चित कालीन असल्याने त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा दीर्घकाळासाठी मुंबईमध्ये पुरविणे शक्य होणार नाही व त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्य व इतर नागरी सुविधांवर होणार आहे.

उच्च न्यायालय, मुंबई यांनी आम्हास आंदोलनासाठी योग्य जागा आपणांस कळविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत, त्याअर्थी आपणास शांततामय मार्गाने आंदोलन करण्यासाठी इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान, सेंटर पार्क जवळ, सेक्टर 29, खारघर, नवी मुंबई हेच मैदान संयुक्तिक राहील. तरी सदर ठिकाणी आंदोलन करण्याकरिता आपण संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करुन रितसर परवानगी घ्यावी.

सर्वोच्च न्यायालय व विविध उच्च न्यायालये यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या इतर न्याय निर्णयामध्ये आंदोलनकर्त्यासाठी दिलेले निर्देश यांचे तंतोतंत अनुपालन आपण रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणांवर करणे अनिवार्य आहे. त्याचे अनुपालन न केल्यास सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांची अवमानना होईल याची आपण नोंद घ्यावी.

कोयना वसाहत व नांदगावसाठी एकूण ४० लाखांचा विकासनिधी मंजूर ;डॉ अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश;

वेध माझा ऑनलाइन।  कराड दक्षिण मतदारसंघातील कोयना वसाहत आणि नांदगाव (ता. कराड) या गावांमधील विविध विकासकामांसाठी भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे एकूण ४० लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला आहे. या विकासनिधीसाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

कराड दक्षिण मतदारसंघातील कोयना वसाहत आणि नांदगाव येथे रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी निधी मिळावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडे केली होती. त्यानुसार डॉ. भोसले यांनी याकामी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे केली. ना. महाजन यांनी या मागणीची दखल घेत, कोयना वसाहत आणि नांदगावसाठी एकूण ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या माध्यमातून कोयना वसाहतमध्ये युरेका टॉवर्स ते मातोश्री अपार्टमेंट रस्ता काँक्रिटीकरण (१० लाख) आणि सेन्च्युरी टॉवर्स ते रोहित अपार्टमेंट रस्ता काँक्रिटीकरण (१० लाख) केले जाणार आहे. तसेच नांदगाव येथे दोन ठिकाणी प्रत्येकी १० लाख रुपयांप्रमाणे एकूण २० लाखांच्या निधीतून रस्ता काँक्रिटीकरण केले जाणार आहे. याबाबतचा आदेश नुकताच ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे. या विकासकामांना लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे. या निधीबद्दल ग्रामस्थांमधून ना. गिरीश महाजन आणि डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.


“एकदा मराठा आरक्षण मिळू द्या, आपल्याला विरोध करणाऱ्या एक एक नेत्याला…”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा


वेध माझा ऑनलाइन। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत यायला निघाले आहेत. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सरकारकडून सुरु झाले आहेत. अशात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला जे विरोध करणारे आहेत, ज्यांनी अपमान केला त्यांचा हिशेब चुकता करणार असं म्हटलं आहे. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईतून उठणार नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.



आत्तापर्यंत आपण शांततेत आंदोलन केलं आहे. एकाही पोराने गडबड केली नाही, होऊ पण दिलेली नाही. मराठे शांत आहेत, दिलेला शब्द पाळणारे आहोत हे माझ्या मायबाप समाजाने राज्याला सिद्ध करुन दाखवलं. मुंबईतही आम्ही शांततेत जाणार, शांततेच बसणार, गडबड करणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही. आम्ही या भूमिकेवर कालही ठाम होतो, आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम राहणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Wednesday, January 24, 2024

मोठी बातमी, मनोज जरांगे मुंबईकडे, पोलिसांनी मार्ग बदलला, मुंबईत मोठा फौजफाटा

वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते पुणे शहराकडून मुंबई शहराकडे निघाले आहेत. पुणे जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता लोणावळ्यात मनोज जरांगे पाटील दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्च्याला ठरलेल्या कार्यक्रमानुसार १२ ते १४ तास उशीर झाला आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करत असताना नवीन मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. एक्स्प्रेस महामार्गावर सीआरपीएफ जवानांचा कडेकोट बंदोबस्त लावला आहे. मराठा आंदोलक एक्स्प्रेस हायवेवर चढू नये बंदोबस्त लावला आहे. मनोज जरांगे यांचा आज वाशीमध्ये मुक्काम असणार आहे.

मुंबईकडे येतानाचा मार्ग बदलला
मनोज जरांगे यांचा लोणावळ्यातून पनवेलकडे येतानाचा मार्ग पोलिसांनी बदलला आहे. आंदोलकांना पुणे मुंबई मार्गावर जुन्या घाटातून जाण्याच्या पोलिसांनी सूचना केल्या आहेत. परंतु आंदोलक नवीन मार्गावरुन जाण्याचा भूमिकेवर ठाम आहे.

आझाद मैदानासंदर्भात नोटीस
आझादा मैदानावर मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना नोटीस देण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. आझाद मैदानाची क्षमता पाच हजार आहे. परंतु लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यामुळे आझाद मैदानाच्या क्षमतेची मनोज जरांगे यांना जाणीव करुन द्या, असे आदेश न्यायालयाने दिले आहे.

कडाक्याच्या थंडीतही मनोज जरांगेंचा रात्रभर प्रवास, पहाटे 4 वाजता लोकांकडून सत्कार, मुंबईच्या दिशेने कूच...

वेध माझा ऑनलाइन। : पुण्यामध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे,  10 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान घसरलेले आहे. इतक्या कडाक्याच्या थंडीतही मनोज जरांगे नावाचं वादळ थांबलेलं नाही. बुधवारी मध्यरात्री जरांगेची पायी दिंडी पुण्यात धडकली होती. त्यानंतर ठिकठिकाणी त्यांचं स्वागत झालं. मनोज जरांगे रात्रीही थांबले नाहीत. 26 जानेवारी रोजी मुंबईत पोहचण्याचा त्यांचा निर्धार आहे. मराठा आरक्षणासाठी  मनोज जरांगे नावाचं तुफान निघालं आहे. त्यांचं प्रत्येक ठिकाणी जंगी स्वागत होत आहे. पुण्यात आज पहाटेही लोक त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते. महिला, पुरुष आणि तरुण मंडळीचं प्रमाण मोठ्या प्रमणात होतं. काही ठिकाणी पहाटे जेसीबीच्या मदतीने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली होती. सध्या मनोज जरांगे यांचं हे वादळ लोणावळ्यात आलेय. येथे विश्रांती घेतल्यानंतर सभा होणार आहे. उपस्थितीतांना संबोधित केल्यानंतर हे वादळ मुंबईच्या दिशेने कूच करेल. 

पहाटे चार वाजता जरांगेच्या स्वागतासाठी गर्दी - 
मनोज जरांगे पाटील यांची आरक्षणाच्या मागणीसाठीची पायी दिंडी पुण्यातील वाघोली परिसरातून बुधवारी सकाळी नऊ वाजता सुरू झाली. चंदननगर, येरवडा, शिवाजीनगर, औंध असा प्रवास करत जरांगेंचा मोर्चा  रात्रीचे पावणेचार वाजलेले असताना डांगे चौकात पोहोचला. पुढे बिर्ला हाँस्पीटल, चाफेकर चौक, भक्ती शक्ती चौक असा प्रवास केला. जागोजागी चौकाचौकात समर्थक स्वागतासाठी उभे होते. गर्दी प्रचंड झालेली. रात्रीच्या कडाक्याच्या थंडीतही लहान मुले, तरुण, वयोवृद्ध सर्व वयोगटातील लोक जरांगेंच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उभे आहेत.

लोकांनी तासंतास वाट पाहिली -
पुण्यात सध्या कडाक्याची थंडी आहे. जागोजागी मनोज जरांगे यांचं स्वागत होत असल्यामुळे नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ त्यांना लागत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांना तासंतास वाट पाहावी लागत आहे. थंडी जास्त असल्यामुळे जागोजागी शेकोटी पेटवण्यात आलेली. मराठा बांधव, लहान मुलं, महिला रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. भल्या पहाटेही लोकांनी मोठी गर्दी केली होती.  थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकांनी जागोजागी शेकोटी पेटवली. मराठा बांधव जरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर तासंतास  बसून होते.

अजितदादांवर कारवाई सुरू असताना ‘काळजीवाहू ताई’ रस्त्यावर का उतरल्या नाहीत? रुपाली चाकणकरांचा सवाल

वेध माझा ऑनलाइन। रोहित पवारांच्या ईडी चौकशीविरोधात काळजीवाहू ताई रस्त्यावर उतरलेल्या पाहायला मिळाल्या. मला प्रश्न पडतो की, जेव्हा अजितदादांवर इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई आणि चौकशा सुरू होत्या, त्यावेळेस अशा प्रकारचे मोर्चे का नाही काढले? किंवा अशा प्रकारे काळजीवाहू ताई रस्त्यावर का उतरल्या नाही? तुम्हाला दादांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे वाटले नाही का? असा सवाल अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांना ईडीने काल चौकशीसाठी बोलावले असताना राष्ट्रवादीने राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन केली. यामध्ये सुळे देखील सहभागी झाल्या होत्या. त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकाही केली. यावरून रुपाली चाकणकर यांनी एक्सवर पोस्ट करून सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.

रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, केवळ अजितदादाच नाहीत तर जयंत पाटील, अनिल देशमुख, छगन भुजबळ, नवाब मलिक, प्राजक्त तनपुरे यांच्या वेळेसदेखील कधीही मोर्चे काढले नाहीत. पक्षासाठी नेहमी झटणाऱ्या या नेत्यांना अडचणीच्या काळात आधार द्यावा, असे तुम्हाला वाटले नाही का?
या पोस्टमध्ये रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतल्याची १०० खोटी कारणे तुम्ही
देत असाल, परंतु तुम्ही तुमच्या स्वार्थापलीकडे पक्षातील कुणालाही कुटुंब म्हणून मानत नाही हे देखील तितकेच विदारक सत्य आहे असेही त्या म्हणाल्या.

Monday, January 22, 2024

श्रीरामासाठी 11 दिवस कडक उपवास; मोदींनी हजारो नागरिकांच्या साक्षीने सोडला उपवास ; राममंदिर ट्रस्टचे खजिनदार म्हणाले...असा राम भक्त होणार नाही...

वेध माझा ऑनलाइन। अयोध्यातील राम मंदिर प्राणप्रतिष्ठान सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा दिवसांचा उपवास केला होता. परंतु त्यांना राम मंदिर ट्रस्टकडून फक्त तीन दिवसांचा उपवास करण्याचे सांगितले होते. महाभारतात सर्वात कठोर तप उपवास म्हटले गेले आहे. मोदी यांनी ते तप पूर्ण केले. असा राजकर्त्या मिळणे हे आपले भाग्य आहे. नरेंद्र मोदी यांनी हे तप कसे केले? याची माहिती गिता परिवाराचे संस्थापक आणि राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार गोविंदगिरी महाराज यांनी दिली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक करत चरणामृत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उपवास सोडला. असा रामभक्त होणे नाही…असे गोविंदगिरीजी महाराज यांनी सांगितले.

कसे केले मोदी यांनी तप
देशभरातील महापुरुषांशी चर्चा करुन आम्ही नरेंद्र मोदी यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी तीन दिवसांचे उपवास करण्याचे सांगितले होते. परंतु त्यांनी अकरा दिवसांचे कठोर उपवास केले. त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला. महाभारतानुसार उपवास हे सर्वात मोठे तप आहे. हे तप करणारा नरेंद्र मोदी यांच्यासारखा तपस्वी राष्ट्रीय नेता मिळणे सोपे नाही. आम्ही त्यांना या दिवसांत विदेश प्रवास करण्याचे नाही म्हटले होते. त्यामुळे त्यांनी विदेश प्रवासही टाळला. परंतु देशाचा तिर्थस्थळांचा प्रवास केला. हा प्रवास नाशिकपासून सुरु केला. त्यानंतर रामेश्वरम गेले. देशातील तिर्थस्थळांवर असणाऱ्या दिव्य आत्मांना बोलवून अयोध्यात या सोहळ्यासाठी आणले. आम्ही मोदी यांना तीन दिवस भूमी शयन करण्याचे सांगितले. परंतु त्यांनी अकरा दिवस भूमीशयन केले.

शिवाजी महाराजांनी केले होते तप
गोविंदगिरी महाराज यांनी शिवाजी महाराज यांच्या तपाची आठवण करुन दिली. शिवाजी महाराज यांनी सर्व धार्मिक परंपरा पूर्ण केल्या होत्या. शिवाजी महाराज एकदा श्रीशैलम येथे गेले होते. तेव्हा त्यांनी तीन दिवस उपवास केला होता. त्यावेळी शिवाजी महाराज संन्यास घेण्याचे म्हणत होते. परंतु त्यांच्या सर्व मंत्र्यांनी त्यांना परत आणले. तसेच नरेंद्र मोदी यांना भगवती देवीने हिमालयातून पाठवले. त्यांना देशसेवेचे कार्य दिले. आपणास असा श्रीमंत योगी मिळाला आहे, असे गोविंदगिरी महाराज यांनी सांगितले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चरणाअमृत देऊन हजारो जणांसमोर त्यांचा उपवास सोडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामलल्लांची प्रतिष्ठापना ; संपूर्ण जगाने पहिला अभूतपूर्व सोहळा ;

वेध माझा ऑनलाइन। गेली कित्येक शतके ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली गेली, संघर्ष केला, तो क्षण अखेर अवघ्या जगाने अनुभवला. अयोध्येत राम मंदिराचा संकल्प पूर्ण झाला. २२ जानेवारी २०२४ रोजी अत्यंत शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने भारतासह अवघे जग राममय झाले. रामनामाचा जयघोष मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रामलला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राम मंदिरात आगमन होताच शंखनाद करण्यात आला. सनई चौघडे वाजवण्यात आले. पाच मंडपातून पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या गाभाऱ्यात आले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा पूजेची सुरुवात करण्यात केली. प्राणप्रतिष्ठा पूजेचा संकल्प करण्यात आला. गणपती पूजन करून रामललाचे पूजन, प्राणप्रतिष्ठा, अभिषेक करण्यात आला. यानंतर पंतप्रधान मोदी यांंनी चांदीचा एक मुकूट श्रीरामचरणी अर्पण केला. प्रभू रामचंद्रांची आरती करण्यात आली. राजस सुकुमार असेच रामललाचे स्वरुप भावले. रामललांना विविध प्रकारची फुले, हार, रत्नजडीत अलंकार अर्पण करण्यात आले. हेलिकॉप्टरमधून राम मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. 

दिग्गज, मान्यवरांची लाभली उपस्थिती
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सर्व मान्यवर उपस्थित होते. या विशेष सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील सुमारे ७१४० हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. अमिताभ बच्चन, रजनीकांत, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, कंगना रणौत, अरुण गोविल, नितीश भारद्वाज, मधुर भांडारकर, कतरिना-विकी कौशल यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित होते. तसेच सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले. उद्योगपती मुकेश अंबानी, मुकेश अंबानी यांच्यासह उद्योगजगतातील मान्यवर उपस्थित होते. बागेश्वर बाबा यांच्यासह साधू-संत, महंत यांची विशेष उपस्थिती होती. 



Sunday, January 21, 2024

पवारांच्या वयाच्या मुद्द्यावरून अजित दादांचे भाष्य ; शरद पवार म्हणाले .. तुम्हाला संधी कोणी दिली?


 वेध माझा ऑनलाइन। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी वयाच्या मुद्द्यावरून वारंवार शरद पवार यांना कधी थेट तर कधी अप्रत्यक्षरित्या घेरल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांनी नुकतीच नाव न घेता शरद पवार यांच्यावर भाष्य करताना वयावरून टीका केली महिला सशक्तीकरण आणि वयाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात जुंपली आहे. अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवार गटाने अजित पवार यांच्या जुन्या विधानांचा दाखला दिला आणि त्यांनाच सवाल केला.

 गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी वयाच्या मुद्द्यावरून वारंवार शरद पवार यांना कधी थेट तर कधी अप्रत्यक्षरित्या घेरल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांनी नुकतीच नाव न घेता शरद पवार यांच्यावर भाष्य करताना वयावरून टीका केली. तरूणांना संधी दिली पाहिजे, असं विधान अजित पवार यांनी करत शरद पवार यांच्यावर खोचक अप्रत्यक्षरित्या टीका केली. यावर प्रत्युत्तर देत शरद पवार म्हणाले, अजित पवार यांच्यासारखे तरूण नेते राजकारणात कुणी आणले? असा सवालच शरद पवार यांनी केला. तर भाजपमध्ये ७५ वर्षानंतर निवृत्त होतात. हे उदाहरण देत अजित पवार यांनी फुटीनंतर वयाचा मुद्दा उपस्थित केला होता.मात्र सत्तेत जाण्यापूर्वी अजित पवार यांनी काय वक्तव्य केले होते, त्याचा व्हिडीओच शऱद पवार गटाने शेअर केलाय.



Wednesday, January 17, 2024

संजय राऊत अडकले पाकिस्तानी सोशल मीडियाच्या जाळ्यात! ;

वेध माझा ऑनलाइन। अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु झाला आहे. भारतातच नव्हे तर जगभरात या उत्सवाचा उत्सव दिसत आहे. यावेळी पाकिस्तानकडून अयोध्येतील राम मंदिराबाबत कट रचण्यास सुरुवात झाली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानने राम मंदिराविरोधात खोटा प्रचार सुरू केला आहे. यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. पाकिस्तानच्या या जाळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत अडकले. त्यांनी रामाचे मंदिर अयोध्येत वादग्रस्त जागेवर बांधण्यात आले नसून तिथून पुढे असलेल्या तीन किमी अंतरावर बांधण्यात आल्याचा दावा केला होता. हा दावा पाकिस्तानी सोशल मीडियाचा प्रचार असल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानी सोशल मीडिया सक्रीय
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राम मंदिरासंदर्भात दावा केला जात आहे. त्यानुसार वादग्रस्त जागेपासून तीन किलोमीटर लांब अंतरावर मंदिर बांधले जात आहे. ही दिशाभूल करणारी माहिती पसरवण्याच्या कटात पाकिस्तान असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे यासंदर्भातील एक टूलकिट समोर आले आहे. त्यात ही बातमी पसरवण्यास सांगितले आहे.

पाकिस्तान सोशल मीडियावर राम मंदिराविरोधात नकारात्मक अफवा पसरवल्या जात आहे. तसेच पाकिस्तान सोशल मीडियात अनेक वेगवेगळे हॅशटॅग चालले जात आहेत. त्यात बाबरी मशिदीला पाठिंबा दर्शवला जात आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख जाहीर झाल्यानंतर अनेक पाकिस्तानी युजर सोशल मीडियावर सक्रिय झाले. त्यांनीच बाबरी मशिदीच्या जागेपासून 3 किलोमीटर अंतरावर राम मंदिर बांधले आहे, असा प्रचारही चालवला आहे.

उद्धव ठाकरे पक्ष वाचवणार की आमदार...? ठाकरेंच्या आणखी एका आमदाराच्या घरावर धाड

वेध माझा ऑनलाइन। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची अमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने काही दिवसांपूर्वी चौकशी केली. यानंतर आता ठाकरे गटाचा दुसरा आमदार रडारवर आलाय. शिवसेना उपनेते आणि आमदार डॉ. राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरी आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी (एसीबी) धाड टाकत त्यांची चौकशी सुरू केली आहे. 

रत्नागिरीतील राजन साळवी यांच्या राहत असलेल्या घरी,  एसीबीचे अधिकारी सकाळी दहा वाजता दाखल झाले. १८ ते २० एसीबीचे अधिकारी मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश मिळाल्यानंतर दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी ही चौकशी सुरु केली. ‘आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्यामुळे आमची चौकशी सुरु झाली आहे. आम्ही कसे आहोत, हे जनतेला माहीत आहे’, असे राजन साळवी म्हणाले.



कराडात भरवस्तीत मोठा स्फोट; 6 ते 7 जण जखमी,; जखमींना रुग्णालयात केले दाखल ;

वेध माझा ऑनलाइन।  
कराड शहरातील बुधवार पेठेत असलेल्या भरवस्तीत बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा आवाज होऊन आगीचा भडका उडाला. या आगीत सहा ते सातजण भाजून गंभीररीत्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  जखमींना रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती

मिळालेली माहिती अशी की, कराडातील प्रभात थिएटरसमोरील वस्तीत बुधवारी रात्री अचानक  एका घरात मोठा आवाज होऊन आगीचा भडका झाला मोठा आवाज झाल्यामुळे नेमके काय झाले, हे नागरिकांना समजले नाही. मात्र घटना निदर्शनास येताच नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेत बचावकार्य सुरू केले. घटनास्थळावरून सहा ते सात गंभीर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलासह पोलीस अधिकारी व कर्मचारीही तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांच्याकडून आग विझवण्यासह जखमींना रुग्णालयात हलविण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. हा आगीचा भडका नेमका कशामुळे उडाला, याबाबत घटनास्थळावरून कसलीच माहिती समोर आली नाही. काही प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार आगीवेळी मोठा आवाज झाला. त्यानंतर आगीच्या ज्वाला बाहेर पडल्या. कुणाला काही समजण्यापूर्वीच ही घटना घडल्यामुळे सहा ते सातजण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती

अमोल मिटकरी यांचे मुख्य प्रवक्तेपद सहाच महिन्यात काढून घेतलं, उमेश पाटील अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते

वेध माझा ऑनलाइन। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना त्यांच्या पक्षानं दणका दिला आहे. त्यांचं मुख्य प्रवक्तेपद सहा महिन्यांच्या आत काढून घेण्यात आलं आहे. त्यांच्या जागी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमोल मिटकरी यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करत असल्याची घोषणा केली होती. मात्र त्याला सहा महिने पूर्ण होण्याच्या आधीच हे पद काढून घेण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांची साथ दिली. त्यावेळी त्या गटाच्या पहिल्या बैठकीत आमदार अमोल मिटकरी यांची पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. अजित पवार गटाचे एकूण सात प्रवक्ते आहेत. आता अमोल मिटकरींना मुख्य प्रवक्तेपदावरून दूर करून त्या ठिकाणी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

काय म्हणाले अमोल मिटकरी? 
पक्षाच्या या निर्णयानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी एका वाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मला पक्षाने दणका वगैरे काही दिला नाही. मागच्या वेळी प्रवक्ता म्हणून माझ्या नावाची घोषणा करण्यात आली होती. पक्षाचे एकूण सात प्रवक्ते असून उमेश पाटील हे आता मुख्य प्रवक्ते आहेत. मुख्य प्रवक्ता हा मुंबईत राहणारा असावा, मी आकोल्यात राहतो. त्यामुळे पक्षाची योग्य तो समन्वय साधता येत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल उमेश पाटील यांचे अभिनंदन. 

मुख्य प्रवक्तेपदि उमेश पाटील ; त्यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्यानंतर उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी या आधी कुणाचीच नियुक्ती नव्हती. हे पद स्वतंत्र पद आहे. या आधी नवाब मलिक हे पक्षाचे मुख्य प्रवक्ते होते. आता त्यांच्या आरोग्याच्या कारणामुळे ही जबाबदारी मला देण्यात आली आहे. मी 2012 पासून पक्षाच्या प्रवक्तेपदी काम करतोय. सात प्रवक्त्यांचा मुख्य प्रवक्ता म्हणून अजित पवार आणि सुनील तटकरेंनी ही जबाबदारी मला दिली आहे.

' कृष्णा 'ने घेतलेल्या कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, शेतकरी समृद्ध होतील ; ना देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

वेध माझा ऑनलाइन। कृष्णा ने घेतलेल्या कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटून शेतकरी समृद्ध होण्यास मदत होणार आहे शेतकऱ्यांसाठी कृष्णा  व भोसले कुटुंबाचे योगदान नेहमीच मोठे असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी काढले 

आजपासून कराड येथील शिवाजी स्टेडियम येथे  कृष्णा शेती व औद्योगिक महोत्सव सुरू झाला आहे या महोत्सवाचे उदघाटन ना फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते

यावेळी जिल्ह्यातील भाजप व शिंदे गटाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी युवक महिला मोठ्या  संख्येने आवर्जून उपस्थित होत्या

ते पुढे म्हणाले भोसले कुटुंबाने या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे की कृषी आणि उद्योग हे दोन्ही घटक हातात हात घालून एकत्र काम करू शकतात त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकरी यशस्वी होतो स्व जयवंतराव भोसले यांनी सहकाराचा जो वृक्ष लावला तो आता वटवृक्ष झाला आहे यासाठी डॉ सुरेश भोसले व डॉ अतुल भोसले यांनी दिलेले त्यासाठीचे आयाम   कारणीभूत आहेत

शेतकरी हा खऱ्या अर्थाने वैज्ञानिक आहे तो मातीतून वेगवगळे प्रयोग करून त्यातून समृद्धी साधण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करताना पाणी आणि  खताचा योग्य वापर करून शेती करणे गरजेचे आहे शेतीला आवश्यक असणारे नवनवीन बदल आत्मसात करणे देखिल शेतकऱ्यांना गरजेचे आहे

ते म्हणाले आमच्या सरकारने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या शेती विषयक योजना व त्यासंदर्भातले लाभही देण्याचे काम केले सध्या राज्यभरातील सिचन प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे कृष्णा कोयना परिसरातील प्रकल्प पूर्ण करून या जिल्ह्यात असणाऱ्या माण खटाव चा दुष्काळाचा डाग पुसून टाकणार असल्याचेही फडणवीस म्हणाले जे साखर कारखानदारी नीट चालवू शकले नाहीत त्यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय कारखानदारी व शेतकऱ्यांना मोलाचे ठरले आहे अशी खोचक टिपणीही त्यांनी केली

उदयनराजे म्हणाले फडणवीसांनी राज्यातील कृषी उद्योगाला बळकटी देण्याचे काम यशस्वी केले आहे भविश्यात फडणविसांनी राज्याचा गाडा हाकण्यासाठी कासरा हातात धरून मित्र पक्षांची मोट बांधल्यास राज्यात 48 खासदार निवडून येतील यात शंका नाही डॉ अतुल भोसले यांनी आज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून कृषी आणि उद्योग यांचा संगम घडवून आणला आहे सातारा जिल्हा एका पक्षाचा बालेकिल्ला समजला जायचा मात्र आता तशी परिस्थिती राहिली नाही सातारा जिल्हा भविष्यात महायुतीला नक्कीच साथ देईल असेही ते म्हणाले

डॉ सुरेश भोसले म्हणाले स्व जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने हा महोत्सव घेण्याचा मानस खूप अगोदर पासून होता आज शासनाच्या सहकार्याने हे प्रदर्शन घेणे शक्य झाले आहे  सध्या जैविक खताची शेतीला गरज आहे शेतीमध्ये संधी फायदा व मार्केट याचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी उतरले पाहिजे भाजप च्या काळात शेतीविषयक चांगले निर्णय व शेती उपयुक्त कामे झाल्याचे त्यांनी नमूद केले याच सरकारच्या धोरणांनी साखर कारखानदारी वाचली असेही ते म्हणाले

डॉ अतुल भोसले यांनी, कराड हि शेतकऱ्यांची राजधानी आहे असे सांगून शेतकरी वर्गाच्या उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केल्याचे सांगितले तसेच कराडात असलेल्या  स्टेडियम ला उर्जितावस्था आणण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून याठिकाणी रणजी किंवा इतर मोठे सामने होतील अशी मागणीही त्यांनी यावेळी केली त्याचवेळी फडणवीसांनी अतुल भोसलेंच्या या मागणीला मान्य केल्याचे सांगून टाकले


संजय राऊत यांच्यावर टीका!

यावेळी फडणवीस म्हणाले
अस ऐकलय की या प्रदर्शनात मोठा रेडा आणला आहे म्हणून...आमच्याकडे पण असे काही रेडे आहेत जे रोज सकाळी tv वर येऊन काहीतरी बडबड करत असतात त्यांचा जर बंदोबस्त करता आला तर बरे होईल असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांचा नामोलेख टाळत टीका केली त्यावेळी त्याठिकाणी एकच हशा पिकला

उदयनराजे म्हणाले... मला टीम मध्ये घ्या...

यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले कराडचे स्टेडियम झाल्यानंतर जे सामने होतील त्यावेळी टिममध्ये मला पण घ्या, रिझर्व्ह ठेवू नका...
यावर फडणवीस म्हणाले महाराज इथे रणजी नाही तर  20- 20 सामने होणार आहेत त्याचे सगळे नियोजन तुम्हीच बघणार आहात त्यामुळे तुम्हीच आम्हाला टिम मध्ये घ्या म्हणजे झालं... असं म्हणताच त्याठिकाणी पुन्हा हशा पिकला

Tuesday, January 16, 2024

सर्वात मोठा ट्विस्ट; शिवसेनेच्या " त्या ' सभेला स्वतः नार्वेकर होते उपस्थित : "त्या' सभेच्या व्हिडीओत नेमकं काय दिसलं?

 वेध माझा ऑनलाइन। शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. कारण ठाकरे गटाने आज पत्रकार परिषद आयोजित करत माध्यमांसमोर सर्व पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाकरे गटाने स्क्रिनवर 2013 ची प्रतिनिधी सभाच दाखवली. विशेष म्हणजे या प्रतिनिधी सभेत स्वत: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते हे स्पष्टपणे स्क्रिनवर दिसलं आहे. तसेच या बैठकीत सुभाष देसाई यांनी ठराव मांडला. त्याला मनोहर जोशी यांनी अनुमोद दिलं. लिलाधर डाके यांनीही अनुमोदन दिलं. रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख पद निर्माण करण्याचा ठराव मांडला होता.

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या आधारावर आमदार अपात्रतेचा निकाल दिला त्या आधारांच्या मुद्द्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली. या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला वकील असीम सरोदे यांनी कायदेशीर बाजू मांडली. सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि राहुल नार्वेकर यांच्या निकालात काय फरक आहे, राहुल नार्वेकर यांच्या निकालात काय चुकलं, याबाबत असीम सरोदे यांनी विश्लेषण केलं. असीम सरोदे यांच्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी कायदेशीर कागपत्रांचे पुरावे प्रेजेन्टेशनच्या माध्यमातून दाखवले. यावेळी अनिल परब यांनी शिवसेनेची 2013च्या प्रतिनिधी सभेचा व्हिडीओच दाखवला. या प्रतिनिधी सभेत स्वत: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उपस्थित होते. यावरुन विधानसभा अध्यक्ष स्वत: त्या बैठकीत होते. बैठकीला असूनही ते कागदपत्र आमच्याकडे आले नाहीत असं ते म्हणाले, असं अनिल परब म्हणाले. त्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे.

“दीड वर्ष सुनावणी सुरू होती. सर्वोच्च न्यायालयाने चौकट तयार करून दिली होती. विधानसभा अध्यक्षांना निर्णय देण्यास सांगितलं होतं. दोन मुद्दे महत्त्वाचे होते. अपात्रतेचा मुद्दा होता. परिशिष्ट दहाचा होता. त्याचे निकष दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिला आणि नार्वेकरांनी आपण सर्वोच्च न्यायालयापेक्षा कसे वरचढ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाच्या निकालाचंच वाचन त्यांनी केलं”, असं अनिल परब म्हणाल

“एक निर्णय महत्त्वाचा आहे. त्या आधारे ओरिजिनल शिवसेनेच्या सर्व लोकांना अपात्र न करण्याचा निर्णय आणि शिंदे गटाला अपात्र न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि शिवसेनेच्या कोणत्या कोणत्या घटना आहेत हे विचारलं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की राजकीय पक्ष ठरवताना विधीमंडळ पक्ष ठरवता येणार नाही, तर घटना आणि संघटनात्मक रचना पाहायला सांगितलं होतं. पाच वर्षाने निवडणुका होतात का, पक्षप्रमुखांना काय अधिकार आहेत हे तपासण्याचे अधिकार होते. पण १९९९ नंतर रेकॉर्डवर काही नाही, असं निवडणूक आयोगाने सांगितलं. त्यामुळे ही घटनाच आधार मानून त्यांनी निर्णय दिला. फक्त बाळासाहेब ठाकरे यांना अधिकार होते. त्यानंतर कुणालाच अधिकार नाही. म्हणून विधीमंडळ पक्ष हाच पक्ष मूळ मानून आयोगाने चिन्ह आणि पक्ष काढून घेतला. त्याच निकालाची पुनरावृत्ती नार्वेकरांनी केली”, असा दावा अनिल परब यांनी केला.

प्रतिनिधी सभेच्या व्हिडीओत नेमकं काय दिसलं?
ठाकरे गटाने प्रतिनिधी सभेचा व्हिडीओ दाखवला. या बैठकीला नार्वेकरही उपस्थित होते. बैठकीत सुभाष देसाई यांनी ठराव मांडला. त्याला मनोहर जोशी यांनी अनुमोद दिलं. लिलाधर डाके यांनीही अनुमोदन दिलं. रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख पद निर्माण करण्याचा ठराव मांडला होता. शिवसेना पक्षप्रमुखपद निर्माण करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील. त्यांना सर्व अधिकार असतील, राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षप्रमुखांची निवड करेल. पाच वर्ष त्यांचा कार्यकाळ असेल, असं रामदास कदम म्हणाले. गजानन कार्तिकर यांनी रामदास कदम यांनी मांडलेल्या ठरावाला अनुमोदन दिलं. हात उंचावून ठराव मंजूर करण्यात आला, असं अनिल परब यांनी सांगितलं.


नार्वेकरांनी खोटा निकाल दिला असा आरोप का होतोय? ; काय होते शिवसेनेचे सहा ठराव?, ठाकरे गटाकडून थेट घटना दुरुस्तीच सादर ;

वेध माझा ऑनलाईन। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भव्य पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत आधी वकील असीम सरोदे यांनी भूमिका मांडली. विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालात नेमकं काय-काय चुकलं याबाबतचं विश्लेषण त्यांनी केलं. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भूमिका मांडली. अनिल परब यांनी यावेळी शिवसेनेच्या 2013चा प्रतिनिधी सभेचा व्हिडीओच दाखवला. या व्हिडीओत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून सर्वानुमते निवड केली जात असल्याचं दिसत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधन नंतरची ही पहिली प्रतिनिधी सभा होती. या प्रतिनिधी सभेत सहा महत्त्वाचे ठराव मांडण्यात आले होते. हे ठराव सर्वानुमते मान्य करत शिवसेनेच्या घटनेत बदल करण्यात आले होते. या सहा ठरावांबाबत अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली.

“२०१३ आणि २०१८ला निवडणूक आयोगाला घटनादुरुस्तीची कागदपत्रे दिली होती. २०१३ ला बाळासाहेब ठाकरे यांच्या निधानानंतर आपण पक्ष आणि घटना दुरुस्तीचे ठराव मांडले होते. हे ठराव शिवसेना भवन येथे केले. ही राष्ट्रीय कार्यकारिणी शिवसेनाप्रमुख ही दैवी संज्ञा केवळ बाळासाहेब ठाकरे यांना शोभून दिसते. म्हणून ही संज्ञा गोठवण्यात येत आहे, असा पहिला ठराव या प्रतिनिधी सभेत मांडण्यात आला होता”, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

शिवसेना पक्षप्रमुख कोणतीही नेमणूक रद्द करु शकतता, असा ठराव मंजूर’
“दुसरा ठराव होता ही राष्ट्रीय कार्यकारिणी शिवसेना पक्षप्रमुख पद करण्यात येत आहे. याची निवड राष्ट्रीय कार्यकारिणी करेल. तिसरा ठराव होता की कार्यकारी अध्यक्षपद रद्द करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडील सर्व अधिकार हे शिवसेना पक्षप्रमुखांना देण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख कोणतीही नेमणूक रद्द करू शकेल. पक्षाचे सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुखांकडे असेल, असा चौथा ठराव करण्यात आला होता”, असं अनिल परब यांनी सांगितलं.

“पाचवा ठराव हा शिवसेना उपनेत्यांची संख्या ३१ आहे. त्यातील २१ जागा प्रतिनिधी सभेतून निवडले जातील. १० जागा पक्षप्रमुख निवडेल. सहावा ठराव – युवा सेनाही शिवसेनेची अंगिकृत संघटना म्हणून मान्यता दिली जात आहे. ही २०१३ची कार्यकारिणी झाली त्यातील घटना दुरुस्ती झाली ती आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे”, अशी माहिती अनिल परब यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली.

सहा ठरावांना कुणी-कुणी अनुमोदन दिलं?
“रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख पद निर्माण करण्याचा ठराव मांडला होता. शिवसेना पक्षप्रमुखपद निर्माण करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील. त्यांना सर्व अधिकार असतील, राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षप्रमुखांची निवड करेल. पाच वर्ष त्यांचा कार्यकाळ असेल, असं रामदास कदम म्हणाले. गजानन कार्तिकर यांनी रामदास कदम यांनी मांडलेल्या ठरावाला अनुमोदन दिलं. हात उंचावून ठराव मंजूर करण्यात आला. सुधीर जोशी यांनी कार्यकारी अध्यक्षपद रद्द करण्याचा ठराव मांडला. त्याला संजय राऊत यांनी अनुमोदन दिलं”, असं अनिल परब म्हणाले.

“१९९९च्या घटनेप्रमाणे अधिकार बाळासाहेबांना होते. ते आता कुणाला नाहीत असं सांगितलं गेलं. पण ते अधिकार २३जानेवारी २०१३च्या बैठकीत आपण हे अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले होते. पण हा पुरावा ते नाकारत होते आणि त्यामुळेच त्यांनी खोटा निकाल दिला”, असं अनिल परब म्हणाले.


राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या बाबतीत दिलेल्या निर्णयाची प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांच्याकडून चिरफाड : शिंदे गटाला धडकी भरणारी उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद ; वाचा सविस्तर;

वेध माझा ऑनलाइन। राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करता त्याचा विश्वासघात केला, नार्वेकरांनी अन्यायाचं नाव हे न्याय ठेवलं आणि निकाल दिला असा घणाघाती आरोप अॅड. असिम सरोदे यांनी केला. विधीमंडळ पक्ष हा पाच वर्षांसाठी असतो, त्यामुळे मूळ पक्ष हाच महत्त्वाचा आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही नार्वेकरांनी त्याचे पालन केलं नाही आणि बहुमताच्या आधारे निर्णय दिल्याचं सांगितलं. त्यामुळे  नार्वेकरांचा निकाल हा लोकशाहीला मारक असल्याचंही अॅड सरोदे म्हणाले. 

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणात  दिलेला निकाल कसा चुकीचा होता याबाबतचे दावे केले. त्यावेळी कायदेतज्ज्ञ असिम सरोदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील रोहित शर्मा हे उपस्थित होते.

काय म्हणाले प्रसिद्ध वकील असिम सरोदे?
राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाची चिरफाड करताना अॅड. असिम सरोदे म्हणाले की, आपण अपात्रतेबद्दलचा सुनावणीचा कायदा, त्याबद्दल झालेल्या न्याय आणि अन्याय याचे विश्लेषण करण्याचा अधिकार आपल्याला आहे. त्याबद्दल कोणत्याही न्यायालयाचा अवमान होत नाही. सध्या जी कायदेविरोधी प्रवृत्ती ही तयार होत आहे. 10 जानेवारी 2024 चा निर्णय हा लक्षात घेणे याचा विश्लेषण करणे आणि आणखी आपल्याला सायंटिफिक भाषेत बोलायचं असेल तर या निर्णयाची चिरफाड करणे हे खूप जास्त आवश्यक आहे. कारण की याच्यातून आपल्याला लोकशाही कशी मारली जाते हे सुद्धा दिसू शकतो.

अशा प्रकरणांमध्ये म्हणजे दहा व परिशिष्ट किंवा भारतीय संविधानासंदर्भातले जेव्हा प्रकरण असतात तेव्हा लोक माझ्यासारख्या वकिलांना अनेकदा म्हणतात की तुम्ही वकील आहेत मी राजकारणाबद्दल बोलू नका. तुम्हाला बोलायचं असेल तर बोला आणि म्हणून त्याचे उत्तर आधी आपल्या सगळ्यांना दिलं पाहिजे. 

विधीमंडळ पक्ष पाच वर्षासाठी, मूळ पक्षच महत्त्वाचा
लोकप्रतिनिधींनी पक्षांतर करून जनतेचा विश्वासघात करू नये यासाठी 1985 साली पक्षांतर बंदी कायदा आणला. मूळ राजकीय पक्ष हा पक्ष चालवणार आणि विधीमंडळातील कारकाजावरही त्याचं नियंत्रण असेल अशी आपल्याकडे व्यवस्था आहे. जर कुणाला राजकीय पक्ष सोडायचा असेल तर ते पक्ष सोडू शकतात, पण त्या आधारे ते अपात्र ठरतात. राजकीय पक्षाने नेमलेल्या व्हिपचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे, त्याचं जर पालन कुणी केलं नाही तर ते आमदार, खासदार अपात्र ठरू शकतो. कायद्यामध्ये विधीमंडळा पक्षाला महत्व नाही, कारण तो पाच वर्षांसाठी असतो. त्यामुळे राजकीय पक्ष हा महत्त्वाचा असतो. 

एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरूवातीली फक्त 16 आमदार 
कायद्याने दोन तृतियांश आमदार फुटले तर त्यांना पक्षांतर बंदी लागू होत नाही. पण एकनाथ शिंदे गेले त्यावेळी त्यांच्यासोबत फक्त 16 आमदार होते. नंतर त्यांनी तिथे अनेकांना आमंत्रित केलं अमिषा दाखवले दबाव टाकला, त्यांची फाईल तयार होती, त्यांना भीती दाखवली आणि काहीजण सुरतला जाऊन त्यांना मिळाले काहीजण गुवाहाटीला जाऊन मिळाले. नंतर ते मुंबईला आले आणि मुंबईत पण काही जण त्यांना मिळाले. अशा प्रकारे ते 38 ते 40 जण झाले
 राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा विश्वासघात केला. जेव्हा एखाद्याचे विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक होते तेव्हा त्यांनी तटस्थ वागलं पाहिजे, पक्षनिरपेक्ष वागलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे अशी अट आहे. पण त्यांनी याचं पालन केलं नाही. 

शिंदे यांची नियुक्ती बेकायदेशीर, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती. विधीमंडळ पक्ष हा व्हिप नियुक्त करू शकत नाही, मूळ राजकीय पक्षच व्हिप नियुक्त करू शकतो असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंनी नेमलेला व्हिप, त्या आधारेच निर्णय झाला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. 

राहुल नार्वेकर यांना पुढे करून जे राजकारण करत आहेत ते सगळे लोकशाहीविरोधात आहेत. विधानसभेच्या संदर्भात कार्यक्रम ठरू शकतात का किंवा अपात्र ठरवले गेले पाहिजे का या संदर्भातला मुद्दा जेव्हा तयार होईल तेव्हा त्याची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोरच झाली पाहिजे.सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन करून निर्णय द्यायचा असताना राहुल नार्वेकरांनी आपला एक लवादच सुरू केला आणि साक्ष तपासण्या सुरू केल्या. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडून शिवसेनेची घटना मागवली. 
केवळ बहुमत महत्त्वाचं नाही, त्याला कायद्याची जोड नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं होतं. पण नार्वेकरांनी बहुमतालाच महत्व देऊन निर्णय दिला आणि सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला. 

राज्यपाल फालतू माणूस
या निर्णयामध्ये एक आणखी घटक महत्त्वाचा आहे किंवा तसं पाहिलं तर फालतू माणूस आहे पण महत्त्वाचा. म्हणजे महत्त्वाच्या पदावर बसलेला. ते म्हणजे आपले राज्यपाल. न्यायालयाने दुःख व्यक्त केले आणि सांगितलं की घटनात्मक पद असलेल्या राज्यपाल पदावर बसलेल्या एखाद्या माणसाने लोकशाही मार्गाने स्थापन झालेल्या सरकार उलटवून टाकण्यामध्ये सहभाग घेणे अत्यंत दुःखद आहे अशी तारीफ या राज्यपालांची आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे वकील रोहित शर्मा काय म्हणाले? 
1. राजकीय पक्षाची स्थापना ही लोकांमध्ये होते आणि त्याची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यांचं काम हे कार्यकर्ते करतात. त्यामधून निवडून आलेले लोक हे विधीमंडळात जातात. 

2. विधीमंडळात जाणारे लोक हे कायमस्वरूपी नसतात, तर ते केवळ विधीमंडळांच्या कार्यकाळापर्यंत असतात. राहुल नार्वेकर म्हणतात की, विधीमंडळातील बहुमत हे पक्षाचं बहुमत असतं. पण ते कसं असू शकेल. 

3. जर एखाद्या आमदाराने पक्ष सोडला तर त्याने पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केलं असं समजलं जातं आणि त्याला अपात्र ठरवलं जातं. असं असताना राहुल नार्वेकरांनी विधीमंडळाच्या बहुमताला महत्व दिलं. ते पक्षांतरबंदी कायद्याच्या विरोधी आहे.

4. आयाराम गयाराम यांच्यावर नियंत्रण घालण्यासाठी पक्षांतरबंदी कायद्याची निर्मिती झाली. एखाद्याने जर पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जिंकली तर त्याने त्या पक्षाच्या विचारधारेशी आणि निर्णयाशी एकनिष्ठ राहावं अशी अट आहे. 

5. राहुल नार्वेकर म्हणतात की विधीमंडळ आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये काही फरक नाही. हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या विरोधात आहे. राजकीय पक्षाची नोंद ही निवडणूक आयोगात असते, त्यांचा आवाज हा कार्यकर्ते असतात. विधीमंडळ गट हा वेगळा असतो.

6. विधीमंडळात असाल तर तुम्हाला तुमच्या राजकीय पक्षाचे निर्देश आणि आदेश पाळावेच लागतील असं दहाव्या सूचीत नमूद आहे. 

7. जे विधीमंडळ आहे त्याची मुदत ही पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असते. नव्या निवडणुकीच्यावेळी राजकीय पक्षच त्यांचे नवीन उमेदवार निवडतात, त्यांची निवड ही बरखास्त झालेले विधीमंडळ पक्ष ठरवत नसतो.

8. जर एखाद्या पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही, तर त्यांचा विधीमंडळ पक्ष नाही. नार्वेकरांनी दिलेल्या निकालानुसार मग असा पक्षच अस्तित्वात राहणार नाही. 

या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय आता योग्य तो निर्णय घेईल.


कृष्णा कृषी महोत्सवांत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ;; नामांकित कलाकारांची राहणार उपस्थिती ;

वेध माझा ऑनलाइन।  कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित कृष्णा कृषी महोत्सवात कराडच्या रसिकांना सांस्कृतिक पर्वणी लाभणार आहे. कृषी महोत्सवांतर्गत १७ ते २० जानेवारी दरम्यान कृष्णा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने नामांकित कलाकार उपस्थित राहणार आहेत.

कृष्णाकाठाचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जयंतीनिमित्त य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत कृष्णा कृषी परिषदेच्या माध्यमातून आणि कृष्णा विश्व विद्यापीठ व कृष्णा सहकारी बँकेच्या सहकार्यातून कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर १७ ते २१ जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात १७ ते २० जानेवारी दरम्यान कृष्णा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारी (ता. १७) सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्राची लोकधारा दाखविणारा ‘जय जय महाराष्ट्र माझा!’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भूपाळी ते भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा दाखविणारा हा कार्यक्रम आपल्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या संस्कृतीची नृत्य संगीतमय गाथा सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निर्मिती – दिग्दर्शन ई टीव्ही आरोही व झी टीव्ही 'सारेगम' अंतिम विजेता फेम महेश हिरेमठ यांनी केले आहे. 

गुरुवारी (ता. १८) सायंकाळी ५ वाजता ‘सूर बहार..’ ही सदाबहार हिंदी - मराठी गाण्यांची बहारदार मैफल आयोजित करण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी ५ वाजता ‘स्वरसांगाती’ प्रस्तुत महाकवी ग. दि. माडगूळकर व महान संगीतकार - गायक सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेला ‘गीत रामायण’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी (ता. २०) दुपारी २ वाजता सौ. तेजस्विनी शहा यांचा खास महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी ५ वाजता भारताची देदीप्यमान वाटचाल गायन व नृत्यातून उलगडून दाखविणारा हा ‘ये जो देस हे मेरा’ सांगितिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. मिलिंद ओक दिग्दर्शित या कार्यक्रमात 'झी मराठी सारेगमप' फेम गायक – गायिका सहभागी होणार आहेत. या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून, रसिकांनी या अनोख्या सांस्कृतिक पर्वणीचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

उद्यापासून आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी महोत्सवाचा होणार प्रारंभ ; ...राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस करणार महोत्सवाचे उद्घाटन ; अनेक मान्यवर राहणार उपस्थित ;

वेध माझा ऑनलाइन। कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर उद्यापासून (ता. १७) आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी महोत्सवाला प्रारंभ होत आहे. कराडमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा कृषी महोत्सव होत असून, विविध प्रकारचे कृषी तंत्रज्ञान एकाच छताखाली पाहायला मिळणार आहे. एकूणच कराडमध्ये उद्यापासून कृषी पंढरीच जणू अवतरणार आहे.
कृष्णाकाठाचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जयंतीनिमित्त य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत कृष्णा कृषी परिषदेच्या माध्यमातून आणि कृष्णा विश्व विद्यापीठ व कृष्णा सहकारी बँकेच्या सहकार्यातून कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर १७ ते २१ जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या महोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. 

या कृषी महोत्सवाचे उद्घाटन उद्या बुधवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी राज्यसभेचे खासदार श्री. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष सर्वत्र साजरे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे प्रवेशद्वार शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या संकल्पनेवर उभारण्यात आले आहे. त्याचसोबत अयोध्या येथे प्रभू श्री रामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेच्या सोहळ्यानिमित्ताने प्रभू श्री रामाची भव्य प्रतिमा प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आली आहे. कराडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन होत असून, यासाठी ११ देशातील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहे.

तसेच याठिकाणी शासकीय दालन, यंत्रे व औजारे दालन, गृहपयोगी वस्तूंचे दालन, महिला बचत गटांचे स्वतंत्र  स्टॉल, तृणधान्य महोत्सव, आंतरराष्ट्रीय संमेलन व खाद्यजत्रा असणार आहे. याचबरोबर महोत्सवात जातिवंत जनावरांसह अनेक वैशिष्टपूर्ण गोष्टींचे व शेतीविषयक उपकरणांचे आकर्षण राहणार आहे. या महोत्सवात देशातील सर्वांत उंच आणि देखणा असा सोन्या बैल, देशातील सर्वांत उंच बैलासोबतच भारतातील सर्वांत लहान पुंगनूर जातीची अडीच फूट उंचीची गाय, २ टन वजनाचा रेडा, १ फूट लांबीची मिरची, दीड फुटाची लोंबी, इलेक्ट्रिक बैल हीदेखील खास आकर्षणे ठरणार आहेत. याठिकाणी ३६ देशातील पिकांचे नमुनेदेखील पाहण्यास मिळणार असल्याने, कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. 

विविध स्पर्धा व चर्चासत्रांचे आयोजन 

या महोत्सवात बुधवारी (ता. १७) दुपारी ३ वाजता सतीश खाडे यांचे ‘पाणी व्यवस्थापन’ या विषयावर, ४ वाजता अरविंद पाटील यांचे दुग्ध व्यवसाय : भविष्यातील एक नवी दिशा, गुरुवारी (ता. १८) सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान ऊस पीक, केळी व घड प्रदर्शन व स्पर्धा, दुपारी ३ वाजता डॉ. रामचंद्र साबळे यांचे हवामान बदल व शेती व्यवस्थापन, ४ वाजता डॉ. दशरथ तांबाळे यांचे सेंद्रीय शेती या विषयावर, शुक्रवारी (ता. १९) सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान फुले प्रदर्शन व स्पर्धा तसेच म्हैस, गाय, जातिवंत खोंड, कालवड प्रदर्शन व स्पर्धा, दुपारी ३ वाजता डॉ. एस. डी. गोरंटीवार यांचे भविष्यातील शेती व डिजीटल तंत्रज्ञानाची आवश्यकता, दुपारी ४ वाजता श्री. शैलेश जयवंत यांचे पॅकेजिंग इंडस्ट्री या विषयावर, शनिवारी (ता. २०) सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान फळे प्रदर्शन व स्पर्धा तसेच श्वान प्रदर्शन व स्पर्धा, दुपारी १ वाजता डॉ. शांताराम गायकवाड यांचे दुग्ध व्यवसायातील नवीन संधी, दुपारी २ वाजता सौ. उमा मांगले यांचे तृणधान्य प्रक्रिया उद्योग या विषयावर, रविवारी (ता. २१) सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान भाजीपाला पीक प्रदर्शन व स्पर्धा, दुपारी ३ वाजता सुरेश कबाडे यांचे ऊस शेती तंत्रज्ञान, दुपारी ४ वाजता पाशा पटेल (अध्यक्ष, कृषी मूल्य आयोग) यांचे बांबू लागवड व प्रक्रिया उद्योग या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.