सातारा दि.5 (जिमाका):जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 55 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 565 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
दरम्यान राज्यात आज 10216 रुग्णांची वाढ झाल्याचे दिसते आहे...काल 42 जण कोरोनामुक्त झाले तर आज ती संख्या वाढून 55 इतकी झाली आहे...
565 जणांचे नमुने पाठविले तपासणीला...
जिल्हा रुग्णालय सातारा येथील 24, कराड येथील 36, फलटण येथील 8, कोरेगाव येथील 23, खंडाळा येथील 8, रायगाव येथील 81, पानमळेवाडी येथील 201, महाबळेश्वर येथील 10, दहिवडी 25, म्हसवड येथील 6 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 43 असे एकुण 565 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -351521*
*एकूण बाधित -59492*
*घरी सोडण्यात आलेले -56006*
*मृत्यू -1860*
*उपचारार्थ रुग्ण-1626*
राज्यात आज 10216 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ....
राज्यात आज 10216 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6467 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2055951 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 88838 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.52% झाले आहे.
No comments:
Post a Comment