Friday, March 5, 2021

"कृष्णा'तील विरोधक आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत... डॉ अतुल भोसले

कराड : कृष्णा कारखान्याच्या सत्तेसाठी जे विरोधक आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. असा आरोप कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केला. वारुंजी व पार्ले येथील कृष्णा कारखाना सभासद संपर्क बैठकीत ते बोलत होते. 

याप्रसंगी य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, धनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, माणिकराव पाटील, प्रफुल्ल पाटील, दादासाहेब मेजर, हरिभाऊ पाटील, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, राहुल पाटील, बाबासाहेब नलवडे प्रमुख उपस्थित होते. 

सभासदांशी संवाद साधताना डॉ. अतुल भोसले म्हणाले, कृष्णा कारखान्याने गेल्या ५ वर्षात ३ हजार रूपयांहून अधिक दर दिला आहे. गेल्या ५ वर्षात साखर उतारा सर्वाधिक राहिला आहे. शेतकऱ्यांच्या बिलातून कोणतीही कपात न करता कारखान्याचा विस्तार केला गेला. ज्यामुळे आज कृष्णा कारखाना ९ हजार मे. टनापर्यंत गाळप करते. भविष्यात १२ हजार मे. टन गाळप क्षमता करण्याचे नियोजन आहे. मागील संचालक मंडळाने कर्जाचा डोंगर उभा केला. त्यांच्या काळात तोडणी वाहतुकीची थकबाकी कोट्यवधी रूपयांची होती. पण डॉ. सुरेशबाबांच्या कार्यकाळात एक रुपयादेखील थकबाकी नाही. ज्यांना केवळ सत्तेसाठी कारखान्याची निवडणूक लढवायची आहे. अशा विरोधी प्रवृत्तींना सभासदांनी थारा देऊ नये, असे आवाहन डॉ. अतुल बाबा भोसले यांनी केले आहे.    

यावेळी प्रकाश पाटील, प्रमोद पाटील, तानाजी नलवडे, धोंडीराम निकम, तुकाराम जाधव, संभाजी नलवडे, आनंद नलवडे, भिकाजी पाटील, गोरख नलवडे, महेश पाटील, सयाजी पाटील यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment