Tuesday, March 2, 2021

ज्येष्ठ नागरिक आणि दुर्धर आजार असणाऱ्यांना कोविड लस देण्यास सुरुवात...

सातारा दि. 2 (जिमाका): 45 वर्षावरील ते 59 वर्षे वयोगटातील कोमोर्बीड (ह्दयरोग, मधुमेह, दुर्धर आजार ) असणाऱ्या व्यक्तींना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीसाठी नागरिकांनी  https://selfregistration.cowin.gov.in  या लिंकचा वापर करुन आपल्या नावाची नोंदणी करावी. ज्या व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी करता येणार नाही त्यांनी आपले आधार कार्ड घेऊन लसीकरण सत्राच्या ठिकाणी भेट देऊन नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आह
केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार सातारा जिल्ह्यातील कोविड-19 लसीकरण कार्यक्रमांत अंतर्गत 46 हजार 110 जणांनी नोंदणी केली होती त्यापैकी 37 हजार 533 जणांनी पहिला लस  घेतला असून  7 हजार 806 जणांनी दुसरी  लसीचा डोस घेतली आहे. यामध्ये दुर्धर आजार अणाऱ्या  29 जणांना तर 60 वर्षावरील 159 नागरिकांनाही लस देण्यात आली आहे. 
  सद्यस्थितीमध्ये 18 शासकीय व 5 खासगी आरोग्य संस्थेत लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा, उपजिल्हा रुग्णालय, फलटण, कराड, ग्रामीण रुग्णालय, पाटण, ढेबेवाडी, कोरेगाव, दहिवडी, खंडाळा, वडूज, महाबळेश्वर, प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचणेर वं., मल्हार पेठ, म्हसवड, पुसेगाव, नागरी आरोग्य केंद्र फलटण, गोडोली-सातारा, पुज्य कस्तुरबा आरोग्य केंद्र, सातारा या ठिकाणी कोविड लस मोफत देण्यात येणार आहे.
  तसेच नोंदणीकृत खासगी आरोग्य संस्था ओंन्को लाईफ क्लिनिक तामाजाईनगर सातारा, कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय, कराड, सह्याद्री हॉस्पीटल कराड, शारदा क्लिनिक एरम हॉस्पीटल कराड, मिशन हॉस्पीटल वाई या ठिकाणी 250 प्रती डोस या प्रमाणे शुल्क घेऊन लस देण्यात येणार आहे. भविष्यामध्ये लसीकरण सत्राची संख्या व ठिकाण मार्गदर्शक सूचनांनुसार वाढविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले आहे.
00000

No comments:

Post a Comment