Tuesday, March 2, 2021

नगरसेवक सौरभ पाटील आणि गुंड्याभाऊ वाटेगावकर यांच्या रुपात परराज्यातील भक्तांना भेटला जणू विठ्ठलच....

कराड
नगरसेवक सौरभ पाटील आणि गुंड्याभाऊ वाटेगावकर यांचे राजकारणापलीकडील असणारे रूप काल पहायला मिळाले.तेलंगणा हुन पंढरपूरला चाललेल्या विठ्ठल भक्तांची मिनी ट्रॅव्हल्स येथील स्टॅण्ड परिसरात आल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास बंद पडली सदर भक्तांना त्या गाडीच्या दुरुस्ती करण्यासह त्यांना पंढरपूरला रवाना करण्यापर्यंत या दोघानी जे काही प्रयत्न केले त्यामुळे सदर भाविकांना पुढे जाऊन पंढरपूरात विठ्ठल दर्शन झालेही... त्या अनोळखी आणि अचानक मदत मागायला आलेल्या भक्त भाविकांना मनापासून मदत करीत त्यांची तीर्थ यात्रा सुरळीत होण्यासाठी या दोन्ही मेहेरबानानी जी काही धडपड केली ती पाहून क्षणभर त्यांच्यात जणू विठ्ठलच दिसला...अशा प्रतिक्रिया तेथील उपस्थित भक्तानी दिल्या...

त्याचे झाले असे...काल सोमवारी मध्यरात्रीच्या   सुमारास नगरसेवक वाटेगावकर रस्त्याच्या दुभाजकांची चाललेली रंग रंगोटी चे काम पाहत व त्याठिकाणी काम करणाऱ्याना सूचना देत थांबले होते.नगरसेवक सौरभ पाटील वारुंजी गावाहून उशिरा त्यांच्या पाहुण्यांकडून जेवण करून त्या ठिकाणी वाटेगावकराना पाहून थांबले त्यानंतर मीही बाहेरून जेवण करून येत असताना या दोघांना पाहून आणि रस्त्याच्या दुभाजकांचे चाललेले काम पाहून बातमीकरिता काही नवीन माहिती मिळते का... म्हणुन तिथे जाऊन या दोघांशी गप्पा मारत थांबलो...त्याचवेळी पिवळी लुंगी व तुळतुळीत गोटा केलेले दोन इसम त्या ठिकाणी आले आणि त्यांनी हिंदी मध्ये गाडी रिपेअर करणारे आता अव्हेलेबल होऊ शकतील का असे त्यांनी विचारले...ते तेलंगणा येथून विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला मिनी ट्रॅव्हल्स ने चालले होते...स्त्री पुरुष असे एकूण 13 जण भाविक त्या गाडीत होते ती गाडी अचानक बंद पडल्याने ते लोक परेशान झाले होते....त्या भक्तांची अचानक झालेली अडचण ऐकून या दोन्ही नगरसेवकांनी लगेचच आपआपल्या संबंधित मिस्त्रींना फोन लावले...त्या ठिकाणी काही मिनिटात एवढ्या रात्रीही मिस्त्री तेथे आले...मात्र गाडी दुरुस्त होऊ शकत नाही,गाडी गॅरेज ला  न्यायची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले... त्यानंतर ते भाविक आणखीच चिंतेत पडले,त्यावेळी या दोघांनी त्यांना धीर देत येथे जवळ असणाऱ्या शिवाजी हायस्कुल,किंवा टाऊन हॉल येथे आपली मुक्कामाची सोय करता येईल,चिंता करू नका... सकाळी गाडी दुरुस्त करून तुम्ही जाऊ शकता असे सांगत त्या भाविकांना धीर दिला... आणि  त्या भाविकांची गाडी येथील एका गॅरेजला दुरुस्तीसाठी लावण्याची व्यवस्था करून दिली...
त्याचवेळी त्या भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी एका क्रूझरची व्यवस्थाही बोलता बोलता या दोघांनी करून दिली... त्यानंतर मात्र या भाविकांच्यात आपल्याला विठ्ठल दर्शन होणार असा विश्वास निर्माण झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाने कळले...ते भाविक त्या क्रूझरमधून पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी  
आनंदाने त्यानंतर रवाना झाले...
दरम्यान...हे सगळे मध्यरात्रीच्या वेळी घडत होते... नेहमी राजकारण समाजकारणात मग्न असणारे हे दोन्ही मेहेरबान त्यावेळी त्या भाविकांना ज्या तनमनतेने सहकार्य करत एवढ्या मध्यरात्रीही जी धडपड करत होते ते पाहून साक्षात या दोघांच्यात क्षणभर परमेशवरच दिसला...अशी भावना तेथील उपस्थित भक्तानी व्यक्त केली... कारण कोणीही अडचणीत असेल तर परमेशवरच मदत करतो हे ऐकल होत...मात्र आज प्रत्यक्ष अनुभवल,असे म्हणत या दोघांना मनोभावे धन्यवाद देत हे भाविक पंढरपूरला रवाना झाले...

3 comments: