Monday, July 18, 2022

आता होणार 4 दिवसाचा आठवडा...

वेध माझा ऑनलाईन - केंद्र सरकारचा नवीन वेज कोड म्हणजेच कामगार कायदा 1 जुलै 22 पासून लागू होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती; पण काही कारणास्तव तो लागू करण्यात आला नाही. या कायद्यामुळे नोकरदारांच्या पगार, सुट्ट्या, पीएफ, कामाचे तास या सर्व गोष्टींमध्ये बदल होतील. तसंच चार दिवसांचा आठवडा व तीन दिवस सुट्टी हा महत्त्वाचा बदल या कायद्यामुळे होणार आहे. हा कायदा कधी लागू होईल, याबद्दल कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

रामेश्वर तेली यांनी लोकसभेत लेखी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं की, नवीन कामगार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही डेडलाईन निश्चित केलेली नाही. रामेश्वर तेली म्हणाले की, बहुसंख्य राज्यांनी चार लेबर कोडवरील मसुदा केंद्राकडे पाठवला आहे. नवीन कामगार संहिता 1 जुलैपासून लागू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु काही राज्यांकडून कोडमधील ड्राफ्ट कमेंट्स येणे बाकी आहे. आतापर्यंत, एकूण 31 राज्यांनी नवीन वेज कोडवर ड्राफ्ट नियम पाठवले आहेत.नवीन लेबर कोड वेज सोशल सिक्युरिटी, इंडस्ट्रीयल रिलेशन्स आणि ऑक्युपेशनल सेफ्टी  यांच्याशी संबंधित आहेत. या लेबर कोडमुळे पगारदारांना आठवड्यातून चार दिवस काम करण्याचा आणि तीन दिवस सुट्टीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. नवीन कोड लागू झाल्यानंतर, साप्ताहिक सुट्ट्यांपासून ते हातात येणाऱ्या पगारातही बदल होईल.

No comments:

Post a Comment