Tuesday, July 26, 2022

सोनिया गांधी यांची आज ईडी कडून सहा तास चौकशी ;

  वेध माझा ऑनलाइन - सोनिया गांधीं आज दुसऱ्यांदा अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाल्या. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी ईडीसमोर हजर होण्याची ही दुसरी वेळ आहे. सोनिया गांधी यांची आजची चौकशी संपली आहे. सहा तासांनंतर सोनिया ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या.

सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी आणि मुलगी प्रियंका गांधी सकाळी 11 वाजता दिल्लीतील अब्दुल कलाम रोडवरील ईडी कार्यालयात पोहचल्या. त्यानंतर अर्ध्या तासासाठी दुपारच्या जेवणाकरता घरी गेल्या आणि पुन्हा साडे तीन वाजता पुन्हा आल्या. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, . प्रियंका गांधी यांना ईडीच्या मुख्यालयात थांबण्यास परवानगी दिली. कारण सोनिया गांधी यांना वेळेवर औषधे देता येतील. प्रियंका गांधी यांना सोनिया गांधी यांच्या खोलीपासून दूर ठेवण्यात आले होते.
सोनिया गांधी यांची  पहिल्यांदा 21 जुलैला दोन तास ईडीने चौकशी केली. त्यावेळी त्यांना 28 प्रश्न विचारण्यात आले होते. नॅशनल हेराल्डप्रकरणी  ईडी चौकशी करत आहे. याच प्रकरणी राहुल गांधी यांची ईडीने 50 तास चौकशी केली.

No comments:

Post a Comment