वेध माझा ऑनलाइन - कराड शहराच्या विविध विकास योजनांवर चर्चा करणेसाठी पालिकेतील सत्तारुढ यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष व गटनेते नगरसेवक राजेंद्रसिह यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी कराड शहराच्या विकास कामात शासन खंबीरपणे पाठीशी राहील याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
सुधीर एकांडे,सचिन पाटील यांची यावेळी उपस्थिती होती...
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे कराडला लवकरच येणार आहेत त्यावेळी त्यांचा भव्य नागरी सत्कार करणार असल्याचे गटनेते राजेंद्रसिह यादव म्हणाले आहेत
राजेंद्रसिह यादव यांनी त्यांचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल यथोचित सत्कार करुन कराडला भेट देण्याची विनंती केली ती त्यांनी तत्काळ मान्य करुन मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यावर पुढील आठवड्यात मी प्रथमच सातारा जिल्हा दौर्यावर येत असुन या दौर्यातच मी कराडला येणार असे आश्वासन दिले.
यानिमित्ताने कराडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करणार असल्याचे गटनेते राजेंद्रसिह यादव म्हणाले
राजेंद्रसिह यादव यांनी आपल्या सत्तेच्या गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत झालेल्या विकास कामांची माहीती दिली विशेषत स्वच्छ सर्वेक्षण मधे सातत्याने देश पातळीवर झालेल्या गौरवाबाबत त्यांनी आनंद व्यक्त करुन कराड नगर परिषदेने योग्य नियोजनाने केलेल्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. तसेच कराड शहराच्या नियोजित विकास कामांची सविस्तर माहीती मुख्यमंत्र्यांना दिली त्यांनीही लक्षपुर्वक समजुन घेवुन काही उपयुक्त सुचना देवुन कराड शहराच्या विकास कामात शासन तुमच्या खंबीरपणे पाठीशी राहील याची ग्वाही दिली.
यावेळी राजेंद्रसिह यादव यांनी त्यांचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल यथोचित सत्कार करुन कराडला भेट देण्याची विनंती केली ती त्यांनी तत्काळ मान्य करुन मुख्यमंत्री पदाची जराबदारी स्विकारल्यावर पुढील आठवड्यात मी प्रथमच सातारा जिल्हा दौर्यावर येत असुन या दौर्यातच मी कराडला येणार असे अश्वासन दिले.
No comments:
Post a Comment