वेध माझा ऑनलाइन - कोरोना विरोधी लसीकरणातील महत्वाचा टप्पा मानला जात असणाऱ्या बुस्टर डोसबाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १५ जुलैपासून सरकारी लसीकरण केंद्रांवर १८ ते ५९ वयोगटातील सर्व नागरिकांना बुस्टर डोस मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून यासाठी एक विशेष अभियान घेण्यात येणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर १५ जुलै २०२२ पासून पुढील ७५ दिवस १८ वर्षांच्यावरील नागरिकांना बुस्टर डोस सरकारी लसीकरण केद्रांवर मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोरोना विरोधी लसीकरणाचे दोन डोस घेतल्यानंतर बुस्टर डोस अधिक प्रभावी ठरत असल्याचं निष्कर्ष समोर आले आहेत. पण त्याबदल्यात बुस्टर डोस घेण्याचं प्रमाण काही वाढताना दिसत नाही. बुस्टर डोस घेण्याची जनजागृती आणि प्रमाण वाढण्यासाठी केंद्रानं महत्वाचा निर्णय घेत देशातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून नवं गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं आगळंवेगळं सेलिब्रेशन म्हणून १५ जुलैनंतर पुढचे ७५ दिवस देशातील १८ वर्षांवरील नागरिकांना सरकारी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस मोफत उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
कुठे मिळणार मोफत बुस्टर डोस?
१५ जुलैपासून देशातील सर्व सरकारी लसीकरण केंद्रावर १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत बुस्टर डोस घेता येणार आहे.
No comments:
Post a Comment