Sunday, July 17, 2022
कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरेना झटका! ; शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा घेतला निर्णय...!!
वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षात ठाकरे गट व शिंदे गटात चुरस निर्माण झालीय. अनेक आमदारांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलंय. दुसरीकडे पक्ष संघटनेच्या पातळीवर बहुसंख्य पदाधिकारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं दिसत आहे. मात्र, आता कोल्हापूरमध्ये पक्ष संघटनेबाबत उद्धव ठाकरे यांना झटका बसला आहे. शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment