वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे आमदारांना फोडल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदारांनाही आपल्या गटात सामील करण्याच्या तयारीत आहे. मध्यरात्री एकनाथ शिंदे हे दिल्ली विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या वेळी पहिल्यांदाच एकनाथ शिंदे हे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना वगळून दिल्लीत दाखल झाले आहे.
राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दिल्ली दौऱ्यावर पोहोचले आहे. मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या दौऱ्यात शिंदे हे देशाचे महाधिवक्ता तुषार मेहता यांचीही भेट घेणार असल्याची माहिती मिळली आहे. त्याचबरोबर, सर्वोच्च न्यायालयात येत्या 20 जुलै रोजी शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये कोर्ट काय निर्णय देते, त्यानंतर काय भूमिका मांडली पाहिजे, याची चर्चा या भेटीदरम्यान करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांचा 15 दिवसांतला हा दुसरा दौरा आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच फडणवीस यांच्यासह न येता एकटेच आले आहे.
No comments:
Post a Comment