वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे यांच्यासह 40 शिवसेना आणि 10 अपक्ष आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळताच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बंडखोर शिवसेना आमदारांना उद्धव ठाकरेंनी अनेकदा परत बोलावण्याचे प्रयत्न केले. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करणार नसल्याच्या निर्णयावर बंडखोर ठाम होते. शिवसेनेची भाजपसोबतच नैसर्गिक युती असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. अशात उद्धव ठाकरे खरंच पुन्हा भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडत आहे. यादरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्या एक ट्विटनंतर राज्यात मोठ्या नवीन राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, 'येत्या दोन दिवसात आदरणीय उद्धवसाहेब आणि आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार, हे ऐकून खूप बरं वाटलं. शिंदेसाहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धवसाहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली, हे स्पष्ट झालं. या मध्यस्थी करता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद. चर्चेत्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल.'
दरम्यान या सर्व प्रकाराबाबत संजय राऊत यांनी एका वहिनीशी बोलताना म्हटलं आहे की, दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. पक्षाचे काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले याची मला माहिती नाही. अशा प्रकारची वक्तव्यं खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. हे एकत्र होईल का हे येणारा काळ ठरवेल. ते आमचेच सहकारी, आमचेच मित्र आहेत. इतकी वर्ष आम्ही काम केलेलं आहे. तर एकत्र यावं असं का वाटणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment