Monday, July 18, 2022

...तर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करणार ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी निवेदनाद्वारे दिला कराड पालिका प्रशासनाला इशारा...


वेध माझा ऑनलाइन - 
 
कराड नगरपालिका प्रशासनाने शेतकऱ्यांना भाजीपाला विकण्यासाठी मंडई परिसरात शेतकरी झोन तयार करावे त्या झोन मध्ये फक्त शेतकरी बसतील व्यापार्यांंना बसण्यास मनाई करावी तसे न झाल्यास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या वतीने तीव्र आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे

निवेदनात सुतार म्हणतात.....
शेतकऱ्यांच्या व्यथा सांगाव्या तेवढ्या कमीच आहेत कधी निसर्ग निर्मित संकटामुळे तर कधी मानवनिर्मित संकटामुळे शेतकरी अडचणीत  आहे, शेतकरी शेतामध्ये भाजीपाला पिकवून आपला दैनंदिन खर्च भागवत असतो कराड टाऊन हॉल परिसरामध्ये आपला भाजीपाला विकण्यास बसलेल्या शेतकऱ्यांना बसलेल्या जागेवरून हाटकले जाते मुळात शेतकऱ्यांना आपला भाजीपाला शेतातून आणायला साधारण तीन ते चार वाजतात त्यानंतर शेतकऱ्यांना भाजी विकण्यास जागा उपलब्ध होत नाही, स्थानिक व्यापारी महत्वाच्या जागेवर बसतात त्यामुळे शेतकऱ्यांना जागा मिळेल तेथे रस्त्यावर बसावे लागते यासाठी कराड नगरपालिका प्रशासनाने शेतकऱ्यांना भाजीपाला विकण्यासाठी मंडई परिसरात शेतकरी झोन तयार करावे त्या झोन मध्ये फक्त शेतकरी बसतील व्यापार्यांंना बसण्यास मनाई करावी तसे न झाल्यास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
यावेळी समीरभाई कुडची, सुरज जाधव, शोयब संदे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment