Tuesday, July 19, 2022

शिंदेंनी दिले निवडणुक आयोगाला पत्र ; आयोगाने मान्यता दिली तर शिवसेना शिंदेंची !

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे आमदार आणि खासदार फोडून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. पण, शिवसेना कुणाची हा प्रश्न उपस्थितीत झाला असून आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र, सुनावणीच्या आधीच शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह पत्र आयोगाला देण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनाच काबीज करण्याचा प्रयत्न आता शिंदे गटाकडून होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार आणि खासदार फोडून वेगळा गट स्थापन करून शिवसेनेला मोठा धक्का दिला. या प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. मात्र,सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी शिंदे यांच्या गटाची निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. एकनाथ शिंदेंच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेली कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी निवडल्याची माहितीच आयोगाला देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने जर मान्यता दिली तर शिवसेनाही शिंदेंच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने आता पक्ष ताब्यात घेण्याची शेवटची लढाई सुरू केली आहे.

No comments:

Post a Comment