वेध माझा ऑनलाइन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांनी एक तुफानी भाषण केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीबाबत ही वक्तव्य केलं. मी ज्या दिवशी मुलाखत देईल, त्या दिवशी राज्यात राजकीय भूकंप होईल. असा थेट इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. तसेच आनंद दिघे यांच्याबाबत राजकारण झालं, त्याबाबतही मी लवकरच खुलासा करणार आहे, असेही विधान केले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी एक सणसणीत ट्विट केलं आहे आणि त्यात ट्विटमधून त्यांनी एकनाथ शिंदे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं आहे. आनंद दिघे यांच्याबाबत एवढं काही घडलं हे तुम्हाला माहीत होतं, तर तुम्ही आजपर्यंत गप्प का बसला? असा थेट सवाल केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलाय. त्यावरून आता राज्यातलं राजकारण पुन्हा पेटलं आहे.
केदार दिघे नेमकं काय म्हणाले?
याबाबत ट्विट करत केदार दिघे म्हणतात, मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार….मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे.सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल? असा थेट सवाल त्यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे
No comments:
Post a Comment