वेध माझा ऑनलाइन - मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले त्यानंतर एकनाथ शिंदे हेच आपले नेते आहेत. चंद्रकात पाटलांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असे म्हणत, फडणवीसांनी राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पनवेलमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. यावेळी फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन भाजप नेत्यांना सल्ला दिला आहे. अनेकजण अनुभवी, पण संधी काहींनाच मिळू शकेल असं विधान फडणवीसांनी केलंय यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे हे आपले नेते आहेत. आपल्या सर्वांचे नेते शिंदे आहेत. मगाशी चंद्रकांत दादा जे म्हणाले... त्यावर वेगळे अर्थ काढले... माध्यमांचे ते काम असते... हे सरकार अडीच वर्षे पूर्ण करेल आणि पुढे देखील येईल.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं 2019 च्या निवडणुकीआधीच ठरलं होतं तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचं अचानक नव्हे तर आधीच ठरलं होतं, असाही दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सरकार आल्यानंतर आपल्या अपेक्षा वाढतात मात्र आपल्याला त्यांना सोबत घेऊन सरकार चालवायचे आहे. पुढच्या अडीच वर्षात कमी अपेक्षा ठेवून एक भव्य सरकार आणू. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत पण सगळ्याच समाधान होऊ शकत नाही. सर्व नियमांचा विचार करावा लागेल. काही जागा शिवसेनेला द्याव्या लागतील. एकावेळी सर्वांना सर्व गोष्टी देता येत नाही. कुणी नाराज होण्याचे कारण नाही, नाराजी येईल पण आपण ती दूर केली पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
No comments:
Post a Comment