वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रीय आय काँग्रेस च्या वतीने दि.26 रोजी युवक मोर्चाचे जे आंदोलन झालं त्या आंदोलनांमध्ये त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केले पंतप्रधान पद हे घटनात्मक व संविधानिक आहे याची जाणीव नसल्याने अशा अवैचारिक आंदोलकांनी पंतप्रधान मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केले आहे या आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी कराड शहर च्या वतीने कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस वरिष्ठ निरीक्षक बी आर पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रदेश सचिव विक्रमजी पावसकर, कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी, माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर , प्रशांत कुलकर्णी,विवेक भासले , प्रमोद शिंदे, धनंजय खोत, अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष नितीन शहा, अल्पसंख्यांक युवा मोर्चा प्रदेश चे उपाध्यक्ष, कामगार आघाडीचे अध्यक्ष विश्वनाथ फुटाणे, नितीन वास्के , धनंजय खोत, रुपेंद्र कदम, कृष्णा चौगुले, शैलेंद्र गोंदकर, शंकर पाटील,विवेक भोसले, कराड उत्तर महिला आघाडी नम्रता कुलकर्णी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment