Wednesday, July 13, 2022

राज्यभर अक्षरशः धो... धो... पाऊस...अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी...

वेध माझा ऑनलाइन - सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ? शाळेभोवती तळे साचून सुटटी मिळेल काय?' भरपूर पाऊस यावा अन् शाळेला सुट्टी मिळावी. बहुदा शाळेत असणाऱ्या प्रत्येक बालगोपाळांच्या मनातली ही भावना होय..  हे गाणं आपण सर्वांनीच लहानपणी वाचलंय... गायलंय... आणि ऐकलेयही... भोलानाथनं पुण्यासह चार ते पाच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं गाऱ्हाणं ऐकलेलं दिसतंय. कारण, मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी पुण्यासह चार जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही ठिकाणी परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. 

आठवडाभरापासून राज्यात राज्यात पावसाने थैमान घातले आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आले आहेत. तर काही ठिकाणी रस्तेही वाहून गेल्याची स्थिती आहे. काही गावांचा संपर्कही तुटला आहे. पुढील काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे.  त्यामुळे खबरदारी म्हणून पुणे, पिंपरी चिंचवड, रायगड, नांदेड आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. अतिमुसळधार पाऊस पडलेल्या ठिकाणी शाळा बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment