वेध माझा ऑनलाइन - राज्यातील सध्याचे दोन जणांचे सरकार हे कायद्याने असंवैधानिक आहे किमान 12 जणांचा मंत्री म्हणून शपथ होणे गरजेचे असताना तसे अद्यापतरी झालेले नाही मंत्रीमंडळ तयार करताना शिंदेंचा चेहरा पुढे करून भाजपचा अधिक मंत्रीपदे मिळण्यासाठी प्रयत्न होताना दिसतो आहे... मात्र त्यामुळे होणाऱ्या नाराजीच्या पेचामुळे पुन्हा राज्यात मध्यावती निवडणुका होतील...असे भाकीत माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले...
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या होणाऱ्या नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या इडी चौकशीचा निषेध नोंदवण्यासाठी आज काँग्रेसच्या वतीने कराड येथे मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आ पृथ्वीराज चव्हाण बोलत होते
आ चव्हाण पुढे म्हणाले, राज्यातील सध्याच्या चालू राजकिय घडामोडीतुन शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवण्यासाठी भाजप कडून प्रयत्न होताना दिसत आहे... की ज्यामुळे हिंदू मतांचे शिवसेना-आणि भाजप असे होणारे विभाजन थांबून फक्त भाजपलाच एकगठ्ठा ते मतदान होईल... हा त्यामागे हेतू असल्याचे दिसते... दरम्यान,उद्धव ठाकरे यांनी फ्लोरिंग टेस्ट द्यावी असे माझे व्यक्तिगत मत होते...कारण त्यामुळे सर्व बाबी सगळ्यांसमोर आल्या असत्या...आणि त्याचे सम्पूर्ण रेकॉर्ड सभागृहात नोंद झाले असते असेही ते म्हणाले...
ईडी चा गैरवापर व भीती दाखवून हे सरकार काँग्रेससह इतर विरोधक आमदारांना धाक दाखवत आहे असे सांगत काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादीतून यापुढेही भाजपमध्ये आमदारांचे आऊट गोइंग चालू राहील की काय... अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली...
आमच्या काळात आम्ही 10 वर्षात एकूण 28 ईडी च्या कारवाया केल्या... तर भाजपने 8 वर्षात 2900 कारवाया करत या यंत्रणेचा हुकूमशहा पद्धतीने गैरवापर केला... मोदींना रशिया व चीन या देशात जशी एकपक्षीय लोकशाही आहे तशी भारत देशात हवी आहे आणि मोदींची त्याच दिशेने पावले पडत आहेत... असेही ते म्हणाले.
विधान परिषदेला काँग्रेसची जी 7 मते फुटली त्याबद्दल पक्षीय स्तरावर निर्णय होईलच आपण त्याबाबतच्या सर्व बाबी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत...
काँग्रेसचे आमदार हंडोरे हे एकनाथ शिंदें यांच्या संपर्कात असल्याबद्दल त्यांना विचारले असता... या बातम्या केवळ वर्तमानपत्रातील आहेत... असे उत्तर देत त्यांनी पत्रकार परिषद संपवली...
दरम्यान आ चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करत या सरकारने देशाला मोठया प्रमाणात कर्जबाजारी केल्याचे सांगितले... देशातील शासकीय प्रोजेक्ट खासगीकरण करण्याकडे या सरकारचा असणारा कल भविष्यात धोकादायक असल्याचेही ते म्हणाले... त्यासाठी देशातील रेल्वेचे खासगीकरण करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी उदाहरण दिले... देशातील महागाई बेरोजगारी, आर्थिक मागासलेपणा अशा अनेक बाबींचा उहापोह करत आ चव्हाण यांनी मोदी सरकारवर अक्षरशः टीकेची चौफेर झोड उठवली...
No comments:
Post a Comment