वेध माझा ऑनलाइन - राज्याचे माजी सहकार मंत्री तथा माजी. पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये विविध कार्यक्रम पार पडले. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून कराडमधील रेव्हीन्यू कॉलनीतील विक्रमसिंह देशमुख आणि देशमुख परिवाराच्या वतीने अनोखा उपक्रम राबण्यात आला. कराड ग्रामीणमधील बारा डबरे येथील अंगणवाडी क्र.118 तील २० मुलं आणि १८ मुली अशा एकून ३८ विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप कराडनगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील आणि लोकशाही आघाडीच्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना आख्तर आंबेकरी आणि बाळासाहेब पवार यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशमुख मित्र परिवाराने गरजू विद्यार्थ्याना शालेय गणवेश वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे सांगत या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाला कराडनगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, आदरणीय पी. डी. पाटील सहकारी बॅंकेचे जेष्ठ संचालक बाळासाहेब पवार, माजी नगरसेवक मोहसीन आंबेकरी , भाऊसाहेब पवार , राकेश शहा, भाऊसाहेब शिंदे, आख्तर आंबेकरी, विठठलराव देशमुख, जयंत बेडेकर , मुदस्सर आंबेकरी, निवास पवार, सागर माने, प्रशांत भोसले, रमेश पाटील, अमोल पवार, पत्रकार शुभम मोरे, पत्रकार अमोल टकले, पत्रकार सुहास कांबळे, पत्रकार अभयकुमार देशमुख, सागर पाटसुपे, अंगणवाडी शिक्षिका वंदना पाटसुपे मॅडम, मीना काटवटे मॅडम, कोमल लगाडे मॅडम सुरेखा जाधव मॅडम , सारीका देशमुख, मनीषा पवार , कोमल भिसे, सना मुल्ला, फातीमा मुल्ला, फातीमा मुल्ला, राजश्री येळवार, सावित्री कोळी, कोमल खिल्लारे, ख्वाजाबी रमाजान आदी पालक आणि परिसरातील रहिवासी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment