Tuesday, July 26, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ; पक्षप्रमुख उल्लेख टाळला ; कशा भाषेत दिल्या शुभेच्छा...?

वेध माझा ऑनलाईन - शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहात झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या महामुलाखतीतून शिंदे गट, बंडखोर आमदार आणि भाजपवर टीका करत आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नसून तर माजी मुख्यमंत्री म्हणून दिल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून तसेच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना, अशी भावना व्यक्त करत एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे

No comments:

Post a Comment