वेध माझा ऑनलाइन - कोरोना पुन्हा थैमान घालतो आहे. दिवसेंदिवस प्रकरणं वाढत आहेत. त्यात भारतात मंकीपॉक्सनेही शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. अशात महाराष्ट्रावर आणखी एक संकट ओढावलं आहे. कोरोनासह राज्यात आणखी एका व्हायरसचा प्रकोप झाला आहे. हा व्हायरस म्हणजे H1N1 अर्थात स्वाईन फ्लू.
या वर्षात स्वाईन फ्लूच्या प्रकरणात झपाट्याने वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 142 प्रकरणांची नोंद झाली. त्यापैकी 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.10 जुलैला पालघरमध्ये स्वाईन फ्लूचा या वर्षातील पहिला बळी गेल्याचं वृत्त आलं होतं. त्यानंतर आता एकूण 7 मृत्यूंची नोंद झाली आहे.
स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण मुंबई, पुण्यात आहेत. त्यानंतर पालघर, नाशिक, कोल्हापूर, ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि नागपूर महापालिकेतही रुग्ण आढळले आहेत.
No comments:
Post a Comment