Saturday, August 22, 2026

केस गावातील अतिक्रमणावर कारवाई कधी होणार? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ;

वेध माझा ऑनलाइन।
कराड तालुक्यातील कैसे गावातील अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अतिक्रमण हटविण्याबाबत संबंधित प्रशासनाकडे निवेदने व पत्रव्यवहार करण्यात आला असून, कारवाईसाठी आवश्यक साहित्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात कारवाईला अद्याप सुरुवात झालेली नाही.

अतिक्रमणामुळे सार्वजनिक जागा, रस्ते व नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही केवळ आश्वासने मिळत असल्याने “अतिक्रमणावर कारवाई नेमकी कधी होणार?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून, अतिक्रमण हटविण्यासाठी तातडीने प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन विलंब न करता कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कारवाई रखडली असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने अतिक्रमण हटवावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

No comments:

Post a Comment