स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तिरंग्याचा आणि देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या शूर जवानांचा सन्मान करण्यासाठी कराडमध्ये आज गुरुवारी (ता. १३) भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. लवकरच या रॅलीला सुरुवात होतेय या यात्रेत सर्व राजकीय पक्ष, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, विविध संघटना, शासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व स्तरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले आहे.
३२५ फूट लांब झेंड्याचे आकर्षण
या तिरंगा रॅलीत १० हजार नागरिक सहभागी होणार असून, रॅलीसाठी विशेष ३२५ फूट लांब आणि १० फूट रुंदीचा तिरंगा झेंडा मागविण्यात आला आहे. हा भव्य तिरंगा झेंडा रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
No comments:
Post a Comment