Monday, February 28, 2022

यावर्षीचे कराड पालिकेचे अंदाजपत्रक प्रशासक तथा मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले मंजूर ; अंदाजपत्रक 184 कोटी 41 लाखांचे ; यात कोणतीही करवाढ केली नाही ; नागरिकांना दिलासा...


वेध माझा ऑनलाइन -कराड 
नगरपालिकेचे सन 2022-23 या वर्षीचे अंदाजपत्रक प्रशासक तथा मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी नगरपालिका विभाग प्रमुखांच्या बैठकीत मंजूर केले. हे अंदाजपत्रक 184 कोटी 41 लाखांचे असून यात कोणतीही करवाढ केली नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये सांगताना मुख्याधिकारी रमाकांत डाके म्हणाले की, अर्थसंकल्पात कोणतेही कर वाढ नाही. पाणीपट्टी एप्रिल पासुन तोटा भरून काढण्याच्या दृष्टीने मीटर पद्धतीने पाणीपट्टीची आकारणी होणार आहे. MSEB कडून 2.5 कोटी वसुली त्यामुळे उत्पन्नात वाढ होणार आहे. भुयारी गटर योजना पुर्ण करुन घेण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. डिसेंबर २०२० पूर्वीच्या अनाधिकृत विकासांचे गुंठेवारी विकास अधिनियम अन्वये नियमितीकरण करण्यात येणार त्यामुळे वाढीव भागातील अनाधिकृत बांधकामे नियमित होण्यास मदत होणार आहे.

मालमत्तांचे रीअसेसमेंट होणार त्यामुळे मालमत्ता करातून सुटलेल्या इमारतींना कर लागणार. अनाधिकृत इमारतींना कराचे शासकीय लागून उत्पन्न वाढण्यास मदत होणार तर  मुदत संपलेल्या गाळ्यांचे फेर लिलाव होणार, त्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. अग्निशमन विभागांचे सक्षमीकरण होणार, आपत्ती व्यवस्थापन जलदगतीने व चांगल्या पद्धतीने होण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

आरक्षणे विकसित करणे याकरिता वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत तरतूद, आरक्षणे संपादन करण्यासाठी जिल्हास्तर नगरोत्थान व राज्यस्तर नगरोत्थान या योजनेद्वारे निधी प्राप्ती साठी तरतूद, राज्यस्तर नगरोत्थान योजनेंतर्गत पाणीपुरवठा व ड्रेनेज योजनेचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न, अपारंपरिक उर्जा अंतर्गत सोलर उर्जेचा वापर वाढून वीज बचतीचा प्रयत्न होणार आहे, प्रथमच माजी सैनिक कल्याणकारी योजनेमध्ये ३ लाख रुपयेची तरतूद करण्यात आली आहे. D.P.D.C. अतर्गत कर्मचारी निवासी संकुले उभारणीसाठी १५ कोटीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे

सिलिंडरचे दर 105 रुपयांनी वाढले...

वेध माझा ऑनलाइन -  मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले. सिलिंडरचे दर 105 रुपयांनी वाढले आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ही वाढ करण्यात आली असून 7 मार्चनंतर घरगुती एलपीजी सिलिंडरही महाग होण्याची शक्यता आहे. सध्या घरगुती सिंलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर कायम

6 ऑक्टोबर 2021 पासून घरगुती LPG सिलिंडर स्वस्त किंवा महाग झालेले नाहीत. मात्र, या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 102 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. मात्र, या काळात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 दरम्यान व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 170 रुपयांनी वाढ झाली आहे. 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1736 रुपये होती. नोव्हेंबरमध्ये ते 2000 आणि डिसेंबरमध्ये 2101 रुपये झाले. यानंतर, जानेवारीमध्ये ते पुन्हा स्वस्त झाले आणि फेब्रुवारी 2022 मध्ये ते स्वस्त झाले आणि 1907 रुपयांवर आले.

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 105 रुपयांची वाढ
यावेळीही व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 19 किलोचा LPG सिलेंडर 1 मार्चपासून म्हणजेच आजपासून मुंबईत 1857 रुपयांऐवजी 1963 रुपयांना मिळणार आहे. तर, दिल्लीत 1907 रुपयांऐवजी 2012 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात आता व्यावसायिक सिलिंडर 1987 रुपयांऐवजी 2095 रुपयांना मिळणार आहे.


कराड शहरातील वार्ड क्रमांक 13 व 14 मध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यासह इतर नागरी सुविधा मिळाव्यात ; मागणी ; जावेदभाई नाईकवडी यांचे धरणे आंदोलन सुरू...

वेध माझा ऑनलाइन - कराड शहरातील वार्ड क्रमांक 13 व 14 मध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यासह इतर नागरी सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी आजपासून जान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावेदभाई नाईकवडी यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे अशी माहिती त्यांनी स्वतः वेध माझाशी बोलताना दिली

या परिसरासाठी कराड पालिका हद्दीत नगरपालिकेने अद्याप कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. मुख्य रस्ता असो किंवा इतर नागरी सुविधा असो... त्या नागरिकांना दिल्या गेल्या नाहीत. जाणीवपूर्वक या भागातील नागरिकांवर अन्याय केला आणि  वेळोवेळी नगरपालिकेला याविषयी सूचना दिल्या तरीही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने आजपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे नायकवडी यांनी स्वतः वेधमाझा शी बोलताना सांगितले शहर व परिसरातील विविध संघटनांचा या आंदोलनास पाठिंबा मिळत असल्याचेही ते म्हणाले...

आज जिल्ह्यात 10 बाधीत 47 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 10 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 47 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 3 खंडाळा 1खटाव 1 कोरेगांव 0 माण 1 महाबळेश्वर 1 पाटण 0 फलटण 0 सातारा 0 वाई 1 व इतर 2 आणि नंतरचे वाढीव 3 असे  आज अखेर एकूण  25 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 47 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

मराठा समाजाच्या मागण्या मान्य ; संभाजीराजेंनी उपोषण सोडले...

वेध माझा ऑनलाइन -  मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गेली दोन दिवस सुरू असलेलं उपोषण हे खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सोडलं आहे. उपोषण स्थळी एका लहान मुलाच्या हातून रस घेऊन खासदार संभाजीराजेंनी हे उपोषण सोडलं आहे. मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने हे उपोषण सोडत असल्याचं खासदार संभाजीराजेंनी सांगितलं.

खासदार संभाजीराजेंनी हे उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारच्या वतीने त्यांची भेट घेतली. त्यावेळी व्यासपीठावरच त्यांच्यामध्ये चर्चा झाली. लेखी आश्वासनाशिवाय हे उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका खासदार संभाजीराजे यांनी मांडली होती. त्यानंतर मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करत असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 
त्यानंतर खासदार संभाजीराजेंनी आपले उपोषण मागे घेत असल्याचं सांगितलं. त्यांनी पहिला व्यासपीठावर असलेल्या लहान मुलाच्या हातून रस घेत आंदोलन मागे घेतलं. त्यानंतर त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते रस घेतला. खासदार संभाजीराजेंसोबत त्यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनीही आपलं उपोषण सोडलं.


मराठा समाजाच्या खालील मागण्या झाल्या मान्य

 मराठा समाजातील युवकांना अधिकाधिक नोकऱ्या पुरवण्यासाठी प्रयत्न करणार.

सार्थीचं व्हिजन डॉक्यूमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 30 जून, 2022 पर्यंत त्याची पूर्तता करणार.

सार्थी संस्थेमध्ये रिक्त असणारी पदं 15 मार्च, 2022 पर्यंत भरणार.

सार्थी संस्थेच्या आठ उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव देखील 15 मार्च, 2022 पर्यंत मंत्रिमंडळासमोर ठेवणार.

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 100 कोटींपैकी 80 कोटी दिले असून आणखी 20 कोटी आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त 100 कोटी निधी देणार.

व्याज परतावा संदर्भात कागदपंत्रांची पूर्तता करुन व्याज परतावा देऊ. यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येणार नाहीत.

पुनीत याना मोठा झटका ; तब्बल २८ देशांनी रशियाविरोधात घेतला मोठा निर्णय ;

वेध माझा ऑनलाइन - रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा पाचवा दिवस आहे. युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाचा निषेध म्हणून अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. मात्र त्यामुळे रशियाला फारसा फरक पडला नाही. यानंतर अमेरिकेसह युरोपियन देशांनी युक्रेनचा लष्करी मदत देण्यास सुरुवात केली. आता तब्बल २८ देशांनी रशियाविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. 

पाश्चिमात्य देशांनी रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. युरोपियन युनियननं रविवारी याबद्दलची घोषणा केली. संघटनेच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेयेन यांनी याबद्दलची माहिती दिली. रशियाची विमानं, रशियात नोंद झालेली विमानं आणि रशियाचं नियंत्रण असलेल्या विमानांचा यात समावेश आहे. युरोपियन युनियनमध्ये २७ देशांचा समावेश आहे. युरोपियन युनियनसोबतच कॅनडानंही रशियन विमानांसाठी हवाई हद्द बंद केली आहे. 

युरोपियन युनियनचा भाग असलेले २७ देश आणि कॅनडामधून रशियाची विमानं जाऊ शकणार नाहीत. युरोपियन युनियनमध्ये ऑस्ट्रिया, बेल्जियम, बुल्गारिया, क्रोएशिया, सायप्रस, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, लॅटविया, लिथुआनिया, लक्झमबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोवाकिया, स्लोवेनिया, स्पेन आणि स्वीडनचा समावेश होतो.

ईडी चा राष्ट्रवादीला आणखी एक दणका ; राज्यमंत्र्याची 13 कोटींची संपत्ती केली जप्त...

वेध माझा ऑनलाइन 
मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यापाठोपाठ आता आणखी एका महाविकास आघाडीच्या मंत्र्यावर ईडीने कारवाई केली आहे.  राम गणेश गडकरी साखर कारखाना  व्यवहार प्रकरणी  राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीने 13 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची साखर कारखाना आर्थिक घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली होती. जवळपास प्राजक्त तनपुरेंची  10 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीने कारवाई करत प्राजक्त तनपुरे यांची 13 कोटी 41 लाखांची संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे.

घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता?

वेध माझा ऑनलाइन - तेल कंपन्या मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती गॅस किमतीबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 1 मार्च रोजी एलपीजी गॅस सिलेंडरचे दर पुढील एक महिन्यासाठी काय असतील, याबाबत उद्या निर्णय होईल. दर महिन्याच्या 1 तारखेला तेल आणि घरगुती गॅसच्या दरात बदल होतात. घरगुती गॅसच्या किमतीबाबत पेट्रोलियम कंपन्या निर्णय घेतात. यावेळी या किमतींवर रशिया आणि युक्रेनमधील संकटाचाही परिणाम दिसू शकतो. रशिया आणि युक्रेनच्या परिस्थितीचा आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान जगभरातील अनेक देशात गॅसच्या किमतीत वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. चार-पाच दिवस आधी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 101 डॉलर बॅरल झाल्या आहेत. अशात ऑइल-गॅस तज्ञांनुसार, भारतात पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीही वाढू शकतात. याचा परिणाम अनेक सेक्टर्सवर होऊ शकतो.
आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीनुसार तेल आणि घरगुती गॅसचे दर वाढवले आणि कमी केले जातात. परंतु फेब्रुवारीमध्ये 5 राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. आता आंतरराष्ट्रीय बाजारात तेल दरात वाढ झाली आहे, यामुळे भारतावरही याचा परिणाम होऊ शकतो.

Sunday, February 27, 2022

राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे ; खासदार उदयनराजे भोसले...

वेध माझा ऑनलाइन - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडले आहेत. त्यांच्यावर शिवप्रेमींमधून टीका होत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील राज्यपालांवर टीका केली आहे. उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून चुकीचा इतिहास सांगितला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे. 
त्यांनी म्हटलं आहे की, खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात दिशाच्या आईने केला गुन्हा दाखल...

वेध माझा ऑनलाइन - दिशा सालियन आत्महत्या प्रकरणामध्ये आपल्या मुलीबद्दल पत्रकार परिषदा घेऊन वाटेल ते आरोप करणारे भाजपचे नेते नारायण राणे आणि त्यांचा आमदार मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात आता दिशाच्या आईने गुन्हा दाखल केला आहे.  मुंबईतील मालवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे यांच्यासोबत आमदार नितेश राणे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशाच्या आईने हा गुन्हा दाखल केल्याचे समोर आले आहे. नारायण राणे आणि नितेश राणे यांनी जे आरोप केले होते, त्याविरोधात खोटे आरोप करणे, चुकीची माहिती देणे आणि बदनामी करण्याबाबत हा गुन्हा दाखल केला आहे.

नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात कलम 500, 509 आणि आयपीसी कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी दिशा सालियनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजकारणामुळे आम्हाला खूप त्रास होतोय, आम्हा जगू द्या अशी हात जोडून विनंतीच त्यांनी केली आहे.यावेळी दिशाच्या आईने म्हटलं, राजकारणामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. जगू दिलं जात नाहीये. आम्हाला आता त्रास देऊ नका, आम्हाला जगू द्या. राजकीय नेते आमच्या मुलीला बदनाम करत आहेत. ती सोडून गेली, यांना आम्हाला बदनाम करण्याचा काय अधिकार आहे? असा सवालही उपस्थित केला.

आज जिल्ह्यात 25 बाधीत 3 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 25 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 3 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 2 खंडाळा 1खटाव 1 कोरेगांव 0 माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 4 सातारा 7 वाई 6 व इतर 1आणि नंतरचे वाढीव 3 असे  आज अखेर एकूण  25 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 3 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

मराठा आरक्षण ; संभाजीराजेंचे उपोषण सुरू ; संभाजीराजेंनी काय केलंय आवाहन ?

वेध माझा ऑनलाइन 
मराठा आरक्षण आणि इतर मागण्यासाठी खासदार संभाजीराजे मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस असल्यामुळे सरकारने अजूनही दखल घेतली नाही. त्यामुळे मराठा आंदोलक कार्यकर्ते संतापले आहे. उद्यापासून राज्यभरात आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. पण, आपल्या आंदोलनाला गालबोट लागता कामा नये, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.

मुंबईतील आझाद मैदानात खासदार संभाजीराजे उपोषणाला बसले आहे. आज दुसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती खालावत चालली आहे. संभाजीराजे उपोषणाला बसल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहे. आज दुसऱ्या दिवशी समरजीत घाडगे यांनी संभाजीराजेंची भेट घेतील. त्यानंतर झालेल्या पत्रकारा परिषदेत मराठा  समन्वयकांनी  सरकारला इशारा दिला.
डॉक्टरांनी संभाजीराजे यांची तपासणी केली आहे, ब्लडप्रेशर लो होत आहे. राज्य सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. शिवसेनेचे नेते आले होते, ५ तासात याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले होते मात्र अद्याप काही झाले नाही. उद्यापासून रास्ता रोको चालू होणार आहे त्यावर काय करायचं हे सरकारने ठरवावे. आमचे आंदोलन शांततेचं आहे. राजेंना जर काही झालं तर आम्ही शांत बसणार नाही. सरकारने आज जर दखल घेतली नाही तर आम्ही आक्रमक होऊ, अशा इशारा समन्वयकांनी दिला.

संभाजीराजेंनी केलं आवाहन

मला माहीत नव्हते की, समन्वयक पत्रकार परिषद घेणार आहेत समन्वयकांचा आक्रोश मी समज़ू शकतो. समन्वयकांची भूमिका ही त्यांची आहे. समाजाला वेठीस धरून मला आंदोलन करायचे नाही आहे. तुमच्या भावना एका ठिकाणी आहे आणि ही लोकशाही आहे. आता लोकशाही आहे पहिल्यासारखं नाही, छत्रपतींनी आदेश दिला की झालं सगळं, आता असं नाही. मात्र तुमच्या भावना आहेत शांतता राहावी. आंदोलनाला गालबोट लागू नये' अशी विनंती संभाजीराजेंनी केली.

लवासा प्रकल्पात शरद पवार आणि सुप्रिया सुळे याना स्वारस्य होत - मुंबई हाय कोर्टाने नोंदवले निरीक्षण...लवासा प्रकल्पाविरोधात करण्यात आलेले आरोप योग्य असल्याचेही नोंदवले मत...

वेध माझा ऑनलाइन - पुणे जिल्ह्यातील लवासा प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं निकाली काढण्यात आली आहे. लवासा प्रकल्पाविरोधात करण्यात आलेले आरोप योग्य आहेत. असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

'लवासा प्रकल्पाप्रकरणी झालेले आरोप योग्य आहेत.  परंतु आता बराच उशिर झालाय. सध्याच्या स्थितीत तिथलं प्रचंड बांधकाम पाडण्याचे निर्देश देता येणार नाहीत', असं निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला. 
खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना लवासा प्रकल्पात स्वारस्य होतं, असं निरीक्षणही कोर्टानं नोंदवलं. या प्रकल्पासाठी कोणतंही टेंडर काढण्यात आलं नव्हतं, हा आरोपही कोर्टानं मान्य केला. मात्र आता उशिर झाल्याचं सांगत याचिका निकाली काढली.

Saturday, February 26, 2022

अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड ; राजगड कार्यालयातून पत्रक प्रसिद्ध करून केली घोषणा...

वेध माझा ऑनलाइन - आगामी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून मनसेमध्ये सक्रीय असलेले राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे आजच्या मराठी भाषा गौरव दिनाचा मुहुर्त साधून मनसेने मोठी जबाबदारी सोपवली आहे. मनसेने अमित ठाकरे यांची निवड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी केली आहे.

आज सकाळी मनसेच्या मुंबईतील राजगड या मध्यवर्ती कार्यालयाने एक पत्रक प्रसिद्ध करून या संदर्भातील घोषणा केली आहे. आज मराठी भाषा गौरव दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित राज ठाकरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात येत आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. या निवडीमुळे पुढच्या काळात अमित ठाकरे हे मनसेमध्ये अधिक सक्रिय झालेले दिसू शकतात.
राज ठाकरे यांचे सुपुत्र हे गेल्या काही वर्षांपासून मनसेमध्ये बऱ्यापैकी सक्रिय होते. मात्र त्यांच्याकडे पक्षाने कुठलेही पद किंवा जबाबदारी सोपवली नव्हती. ते मनसेच्या विविध कार्यक्रमांमध्ये तसेच दौऱ्यावर जात असत. मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने अमित ठाकरेंवरील जबाबदारी वाढणार आहे.  


युक्रेनमध्ये अडकलेले 219 विद्यार्थी भारतात परतले ; मंत्री पियूष गोयल यांच्याकडून विद्यार्थ्यांचं स्वागत

वेध माझा ऑनलाइन - युक्रेनमध्ये अडकलेले 219 विद्यार्थी भारतात परतले आहेत.रोमानियाहून एअर इंडियाचं पहिलं विमान या विद्यार्थ्यांना घेऊन नुकतचं मुंबई विमानतळावर दाखल झालं आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याकडून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही उपस्थित होत्या. 

युक्रेनहून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी फ्लाइट क्रमांक AI1943 ने मुंबई विमानतळावरून पहाटे 3.40 वाजता उड्डाण केले होते. एअर इंडीयाचं हे विमान आज रात्री साडे आठ वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे. विमान मुंबईत दाखल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मायदेशी परतणाऱ्या भारतीयांचे स्वागत केले. 
दरम्यान, केंद्र सरकारसह राज्य सरकारही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून अडकलेल्या भारतीयांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी पूर्व समन्वय साधल्याशिवाय कोणत्याही सीमेवर जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.

एअर इंडियाचं हे विमान भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन भारताकडे रवाना झाल्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी ट्विटवरून याबाबत माहिती दिली होती. "युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याबाबत आम्ही प्रगती करत आहोत. आमची टीम 24 तास मैदानावर काम करत आहे. मी या सर्व गोष्टींवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहे, अशी माहिती एस. जयशंकर यांनी दिली होती

याज जिल्ह्यात 12 बाधीत,12 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 12 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 12जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 5 खंडाळा 0खटाव 0 कोरेगांव 0 माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 6 वाई 0 व इतर 1आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण  12 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 12 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

शाळा 2 मार्चपासून होणार सुरू ; पालकांना वाटलं तर त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावं ; उपमुख्यमंत्री अजित पवार

वेध माझा ऑनलाइन - राज्यासह पुणे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांमध्ये आता घट होत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना रूग्णांमध्ये 51 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक शाळा 2 मार्चपासून सुरू होणार आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात येणार आहेत. पालकांना वाटलं तर त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 

अजित पवार यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, राज्यासह पुण्यातील लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. 1 मार्चपासून पुण्यातील जम्बो हॉस्पिटल बंद होणार आहेत. याबाबत पुणे महापौरांसोबत बोलणं सुरू आहे. टास्क फोर्स आणि डॉक्टरांसोबतही चर्चा झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या पाहता आता जम्बो हॉस्पिटलची गरज वाटत नाही. त्यामुळेच ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी होणारी रूग्णसंख्या पाहाता शाळा सुरू करण्यास काही हरकत नाही. त्यामुळे बालवाडीपासून 12 पर्यंतचे वर्ग 2 मार्चपासून सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. 
राज्यातील कोरोना रूग्णांमध्येही आता घट होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना नियम शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

कराडच्या दत्त चौकात सलग दोन दिवस झळकले नवाब मलिक...

वेध माझा ऑनलाइन - मंत्री नवाब मलिक कराडच्या दत्त चौकात गेल्या दोन दिवसापासून  झळकत असल्याचे पहायला मिळाले काल येथील भाजपने याचठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलन करत त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली तर आज महाविकास आघाडीने त्यांच्या बचावासाठी ईडी विरोधात येेथे आंदोलन केले म्हणजेच नवाब मलिक कराडच्या दत्त चौकात गेल्या दोन दिवसापासून झळकत आहेत असेच निमित्ताने पहायला मिळाले
 राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर सम्पूर्ण राज्यभर विविध चर्चा सुरू आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी  अधिकारी समीर वानखेडेबाबत वेगवेगळ्या आरोपांची राळ उठवत राज्यभर खळबळ उडवून दिली होती त्याचवेळी भाजपलाही अंगावर घेत वानखेडे यांची बाजू घेण्याच्या भाजपच्या भूमिकेचाही त्यांनी समाचार घेतला होता तो विषय अजून ताजा असतानाच स्वतः मलिक हे एका जमीन व्यवहार प्रकरणी  ईडी च्या ताब्यात आहेत मनी लोन्द्रीगच्या आरोपाखाली त्यांना नुकतीच अटक झाली असून त्यांना सध्या ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे या व्यवहार प्रकरणी त्यांचे कुख्यात गुंड दाऊद शी संबंध असल्याचे आरोप आहेत याविषयी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरू आहे दाऊद शी संबंध असणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या अशी भाजपची मागणी आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी मलिक यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत अशा कारवाई मुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचेही सांगत आहे आणि म्हणून ही आघाडी त्यांना पाठिंबा दर्शवणारी आंदोलने सर्वत्र करीत आहे 
गेले दोन दिवस कराडच्या दत्त चौकात हीच दोन्ही आंदोलने पहायला मिळाली आणि याचनिमित्ताने याठिकाणी सलग दोन दिवस नवाब मलिकही चांगलेच झळकले 

Friday, February 25, 2022

युक्रेनच्या सैनिकांची शौर्यगाथा ; रशियन सैन्याला रोखण्यासाठी स्वत: ला पुलासोबत उडवलं...

वेध माझा ऑनलाइन - रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये  अफगाणिस्तानसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावत आहेत. दहा लाखांहून अधिक लोक युक्रेन सोडून गेले आहेत. त्याच वेळी, राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की यांनी देश सोडून पळून जाण्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. आपण युक्रेनमध्ये आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत देशासोबत उभा राहू, असा व्हिडिओ त्याने जारी केला आहे. दरम्यान, युद्धाशी संबंधित काही इमोशनल घटनाही समोर येत आहेत. क्रिमियामध्ये, रशियन सैन्याला रोखण्यासाठी एका युक्रेनच्या सैनिकानं स्वत: ला पुलासोबत उडवलं आहे.

पुलाच्या रक्षणाची होती जबाबदारी

'द सन'च्या वृत्तानुसार, युक्रेनच्या सैनिकाच्या या शौर्यामुळे रशियन सैन्याच्या ताफ्याला दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. पुलावर स्वत:ला उडवणाऱ्या युक्रेनियन सैनिकाचे नाव विटाली शकुनअसे आहे. क्रिमियन सीमेवरील खेरसॉन भागातील हेनिचेस्क पुलाच्या  रक्षणासाठी विटाली शकुन यांना तैनात करण्यात आलं होतं.

जीव धोक्यात आहे याची होती कल्पना

युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफनं आपल्या फेसबुक पेजवर म्हटलं आहे की, रशियन सैन्याच्या ताफ्याला रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पूल उडवणं हा होता आणि त्यामुळे बटालियन पूल उडवणं हा निर्णय घेतला. यानंतर पुलाभोवती स्फोटके पेरण्यात आली, मात्र तेथून बाहेर पडण्यासाठी वेळ इतका कमी होता की, स्फोट झालेल्या जवानाचा मृत्यू निश्चित होता. सर्व काही माहित असताना, विटाली यांनी हे केले आणि देशासाठी आपला जीव दिला.

पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, सैनिक विटाली शकुन यांनी मेसेज पाठवला की ते पूल उडवणार आहे. थोड्या वेळानं प्रचंड स्फोटाचा आवाज ऐकू आला. त्यांच्या या प्रयत्नानं रशियन सैनिकांचा ताफा तिथेच थांबला. पुलाच्या पलीकडे जाण्यासाठी रशियन सैनिकांना खूप संघर्ष करावा लागला.सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, सर्व युक्रेनियन आपल्या देशासाठी कठीण काळात एकत्र उभे आहेत. युक्रेनियन लोक रशियन कब्जा करणाऱ्यांना सर्व दिशांनी चालवत आहेत. विटाली शकुन यांना त्यांच्या शौर्याबद्दल मरणोत्तर शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.

कराड नगरपालिकेच्या अधिकार्‍यास धक्काबुक्की प्रकरणी दोघांना अटक; चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी...

वेध माझा ऑनलाइन -   नगरपालिकेचे नगर रचनाकार रोहन ढोणे माहिती अधिकारातील माहिती व्यवस्थित देत नसल्याच्या कारणावरून दोघांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणानंतर संबंधित दोघांवर शासकीय कामात अडथळा आणला यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री सातच्या सुमारास ही घटना घडली आहे.

याबाबत माहिती अशी नगरपालिकेतील नगर रचनाकार रोहन ढोणे यांना शहरातील धैर्यशील कराळे, जालिंदर वाघमारे यांनी माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती. संबंधितास कारण देऊन माहिती देता येत नसल्याचे पत्र माहिती मागणाऱ्याला घरी पाठवले होते. त्यावेळी ते पत्र पाहून संबंधित धैर्यशील कराळे याने ढोणे यांना अर्वाच्च भाषेत फोनवरून शिवीगाळ केली.  त्यानंतर ढोणे कार्यालयातील काम आटोपून घरी चालले असता सायंकाळी सातच्या सुमारास धैर्यशील कराळे, जालिंदर वाघमारे यांनी ढोणे यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याबाबतची माहिती पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना मिळताच ढोणे यांच्यासह सर्वजण शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांचा जमाव पोलीस ठाण्यात दाखल झाला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी जमावाला शांत करून योग्य ती रिसल्ट कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके उपस्थित होते.
दरम्यान या प्रकरणातील आरोपी धैर्यशील कराळे, जालिंदर वाघमारे यांना शुक्रवारी न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.  नगरपालिका नगररचना विभागातील सहायक अधिकारी रोहण ढोणे यांना झालेल्या मारहाणीचे आज नगरपालिकेत तीव्र पडसाद उमटले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज सदर घटनेचा निषेध केला. यापुढे असा प्रकार झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

पाणी पुरवठा अभियंता ए. आर. पवार, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, आरोग्य निरिक्षक मिलिंद शिंदे, अकाऊंट प्रमुख कमलेश रविढोणे, प्रशांत कांबळे, दत्तात्रय तारळेकर, उमेश महादर, माणिक बनकर, अशोक पवार, दिनेश पेडणेकर, श्रीकांत भोसले यांच्यासह सर्व कर्मचारीही आंदोलनात सहभागी झाले.


नवाब मलिक राजीनामा द्या ; कराडच्या भाजपची मागणी...

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंञी नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कराडातील दत्त चौकामध्ये भारतीय जनता पार्टी कराड शहर,  कराड दक्षिण व कराड उत्तर मतदार संघाच्यावतीने  आज निदर्शने करण्यात आली. दरम्यान, नवाब मलिक यांचे कुख्यात गुंड डाऊद इब्राहिम याच्या हस्तकाकडून जमीन खरेदी  प्रकरण सध्या चर्चेत आहे यावरुन त्यांचा सरकारने योग्य तो बंदोबस्त करावा त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली

यावेळी  सातारा जिल्हा सरचिटणीस महेंद्रकुमार डूबल, शहर अध्यक्ष एकनाथ बागडी,  शहर सरचिटणीस प्रमोद शिंदे.उत्तर तालुकाध्यक्ष महेश जाधव, तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख  रामकृष्ण वेताळ ,प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटस्कर, ओ.बी.सी.मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, सरचिटणीस धनाजी माने, चिटणीस महेश कुलकर्णी , महेश पाटील, रवि भोसले, रुपेश देसाई, सचिन साळुंखे   नितीन शाह,माणशिंग कदम,विवेक भोसले,विशाल कुलकर्णी,यांच्यासह महिला मोर्चा सौ सीमा घार्गे,सौ भाग्यश्री रोकडे,सौ स्वाती पिसाळ, सौ नम्रता कुलकर्णी,रुपेंद्र कदम,विश्वनाथ फुटाणे,सागर लादे इ कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.

कराड विमानतळाच्या आसपासच्या बांधकाम परवानग्यांचा प्रश्न लागला मार्गी - माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडचे नगरसेवक इंद्रजीत गुजर व अप्पा माने यांच्यासह घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट -

वेध माझा ऑनलाइन - कराड विमानतळाच्या आसपास २० किलोमीटर च्या परिघामध्ये कोणत्याही बांधकामावर बंदी च्या अनुषंगाने विमानतळ विकास प्राधिकरणाच्या जाचक अटी काढल्या जाव्यात व त्याचा कलर कोडेड झोनिंग नकाशा लवकरच प्रसिद्ध व्हावा यासाठी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत कराडचे नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांची व भारतीय विमानपतन प्राधिकरण चे अध्यक्ष संजीव कुमार यांची भेट घेतली. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक शिवराज मोरे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, क्रिडाई चे तनय जाधव, कराडचे नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, जावेद शेख, धनराज शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. 

या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी तात्काळ महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फोन करून कलर कोडेड नकाशा प्रसिद्ध करण्याच्या व त्यानुसार बांधकाम बाबतच्या अटी शिथिल कराव्यात असे आदेश दिले. त्यानुसार महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण विभागाला सूचना आल्या असून आदेशाची नवीन नियमावली सहित कलर कोडेड झोनिंग नकाशा ची त्वरित अंमलबजावणी केली जाणार आहे. 

कराड व मलकापूर शहरासह आसपासच्या बांधकाम व्यावसायिकांना व नागरिकांना सुद्धा हा अत्यंत महत्वाचा विषय असून त्याचे निराकारण माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने झाले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचा दिल्ली येथील २२ वर्षांचा अनुभव तसेच केंद्रीय मंत्री पदाचा अनुभव मुळे केंद्रातील मंत्र्यांशी व अधिकाऱ्यांशी सुकर चर्चा करून मार्ग काढण्यात यश आले. 

गेल्या काही दिवसांपूर्वी विमानतळ प्राधिकरणाकडून महाराष्ट्रात सर्वत्र विमानतळाच्या परीघामधील २० किलोमीटर आसपासच्या बांधकामावर बंदी घातली गेली होती. तो नियम कराड विमानतळाला सुद्धा लागू झाल्याने त्या अटींमध्ये शिथिलता व सुस्पष्टता यावी यासाठी कराडच्या बांधकाम व्यावसायिकांनी व क्रिडाईच्या प्रतिनिधींनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन देत चर्चा केली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी बांधकाम व्यावसायिकांचा विषय पूर्ण समजून घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून व त्यानंतर प्रत्यक्ष मुंबईमध्ये चर्चा केली. तसेच केंद्रीय पातळीवर सुद्धा प्रयत्न करीत मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासमवेत केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व या विभागाचे सचिव संजीव कुमार यांच्याशी चर्चा करून कराड शहराच्या विमानतळाबाबत योग्य ती माहिती देत वस्तुस्तिथी मांडली व जाचक अटी शिथिल करण्याची मागणी केली. त्यानंतरही महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चा केली त्याप्रमाणे महाराष्ट्र विमानतळ विकास  प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कलर कोडेड झोनिंग नकाशा तयार करून मान्यतेसाठी केंद्रीय विभागाला पाठविला होता. तोच नकाशा तात्काळ प्रसिद्ध व्हावा यासाठी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी बांधकाम व्यावसायिक यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री व सचिवांची भेट घेऊन चर्चा केली. 

गेल्या चार महिन्यापासून विमानतळ प्राधिकरणाच्या निर्बंधांमुळे कराड परिसरातील बांधकाम ठप्प आहेत, त्यांना लवकरात लवकर गती मिळण्यासाठी व शहराच्या विकासासाठी विमानतळ प्राधिकरणाने कलर कोडेड झोनिंग नकाशा प्रसिद्ध करावा अशी मागणी यावेळी चर्चेदरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यानुसार तात्काळ या मागणीचा विचार केंद्रीय मंत्र्यांनी कलर कोडेड झोनिंग नकाशाला परवानगी देत, अटींमध्ये सुस्पष्टता व शिथिलता आणून नवीन नियमावली जाहीर करण्याचे आदेश महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला दिले असून त्याची अंमलबजावणी संबंधित विभागाकडून झाली आहे, यामुळे बांधकाम व्यावसायिक व नागरिकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती खालावली : जे. जे. रुग्णालयात केलं दाखल...

वेध माझा ऑनलाइन -  ईडी कोठडीत असलेल्या मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती खालावली आहे. त्यासाठी त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यानं नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, ईडीनं बुधवारी 8 तासांच्या चौकशीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली होती. अंडरवर्ल्डशी संबंध, मनी लॉंड्रिग प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर ईडीनं कारवाई केली आहे. अशातच नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना तपासणीसाठी मुंबईतील भायखळा येथे असलेल्या जे. जे. रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्यानंतर पोटदुखीची समस्या वाढल्यानं नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


दरम्यान, तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही अटक करण्यात आली होती. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर ईडीनं त्यांना अटक केली. ईडीनं 23 फेब्रुवारी रोजी सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. ही बातमी बाहेर येताच राज्यात खळबळ उडाली. नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत.

Thursday, February 24, 2022

राज्यात आज2 हजार 516 रुग्ण कोरोनामुक्त तर, 1182 बाधीत

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील  कोरोनाचा प्रादुर्भाव  आटोक्यात येत असून  राज्यातील  रुग्णसंख्या कमी होताना  दिसून येत आहे.  गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या  1182 नव्या रुग्णांची भर पडली आहे.  राज्यात आज 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 2 हजार 516  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज महानरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही.  

राज्यात आज 58 ओमायक्रॉनबाधितांची नोंद 

राज्यात आज 58 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.  आतापर्यंत 4567 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 4456 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 111 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत

राज्यात आज  19 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आज 19  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख  4 हजार 733 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.99 टक्के आहे.  सध्या राज्यात  1 लाख 56 हजार 920 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 801  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 75 लाख 74  हजार 774 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 

 मुंबईत  आज 119 नवे कोरोनाबाधित

 मुंबईत  आज 119 नवे कोरोनाबाधित आढळले. कालच्या तुलनेत ही रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी असल्याने नागरिकांसह पालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. काल 168 नवे कोरोना बाधित आढळले होते. दरम्यान आज 257 जण कोरोनामुक्त देखील झाले असून त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. यासह आज मुंबईत काही दिवसानंतर पहिल्यांदाच एका कोरोनाबाधिताचा  मृत्यू झाला आहे

ओबीसी आरक्षणासंदर्भातील उद्या होणारी सुनावणी लांबणीवर ...आता सुनावणी होणार 28 फेब्रुवारीला...

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील महाविकास आघाडी सरकारची ओबीसी आरक्षणावरची सर्वात मोठी परीक्षा 28 फेब्रुवारीला होणार आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात  उद्या 25 फेब्रुवारीला होणारी सुनावणी आता सोमवारी 28  फेब्रुवारीला  होणार आहे. कार्यालयीन कारणामुळे ही सुनावणी पुढे गेली आहे. 

महाराष्ट्रातल्या स्थानिक निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाचं भवितव्य ठरवणारी ही सुनावणी असणार आहे. मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम रिपोर्टनुसार आरक्षण लागू करण्याची परवानगी राज्य सरकारने मागितली आहे. ओबीसी आरक्षण प्रकरणात येत्या 28 तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार की नाही याचे उत्तर याच सुनावणीवर अवलंबून आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 17 डिसेंबर रोजी ओबीसी आरक्षणासाठीची त्रिसूत्री पार पाडल्याशिवाय राजकीय आरक्षण लागू करता येणार नाही असा आदेश दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातल्या 105 नगर पंचायतींच्या निवडणुकाही दोन टप्प्यांत पार पाडण्याची वेळ आली होती. आयोगाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ओबीसीसाठी राखीव जागा या खुल्या प्रवर्गातल्या म्हणूनच गृहीत धरल्या जाव्यात असा आदेश कोर्टानं दिला होता.
राज्य सरकारनं ओबीसी राजकीय आरक्षणासाठी सहा विभागाचा मिळून एकत्रित डेटा जमा केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांचे म्हणजे ओबीसीचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आवश्यक सांख्यिकी राज्य सरकारने तयार ठेवली आहे. राज्य सरकारच्या विविध संस्था आणि शासकीय प्रणालीद्वारे काढलेल्या माहितीनुसार राज्यात ओबीसी समाज 40 टक्के ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रमाण 30 टक्के तर ओबीसी शेतकऱ्यांचे प्रमाण 39 टक्के असल्याचे सूचवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या डेटाला अर्जाला दिल्यास आगामी काळात होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होऊ शकते.

आज जिल्ह्यात 22 बाधित 51 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 22 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 51जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 6 खंडाळा 1खटाव 5 कोरेगांव 0 माण 1 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 1 सातारा 3 वाई 1 व इतर 4आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण  22 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 51 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

श्री छ उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसनानिमित्त कराडमध्ये यशवन्त मॅरेथॉन मोठ्या उत्साहात संपन्न...

वेध माझा ऑनलाइन - श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त  यशवंत मॅरेथान २०२२ या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेचे गटनेते राजेंद्रसिंह यादव मित्रपरिवाराच्या वतीने आज दि 24 रोजी आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी दीड हजाराहून अधिक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला दत्त चौकातून शहरातील प्रमुख रस्त्यावरून ही मॅरेथॉन धावली विजेत्यास्पर्धकांना रोख रक्कम मेडल्स तसेच ट्रॉफी देण्यात आली 


यावेळी मा. उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, विजयसिंह यादव .यांच्यासह क्रिडा जिल्हा अधिकारी युवराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होत यावेळी आर.वाय. जाधव,नगरसेवक हणमंतराव पवार , विजय वाटेगावकर , गजेंद्र कांबळे ,किरण पाटील  बाळासाहेब यादव, प्रितम यादव, नगरसेविका स्मिता हुलवान, ओमकार मुळे ,निशांत ढेकळे, राहुल खराडे, भाजप नेते विष्णू पाटसकर,राजू मुल्ला,साबिरमियाँ  मुल्ला .नुरुल मुल्ला बापू देसाई. पवन निकम. च्रंद्रकांत कुंभार. रुषीकेश कुंभार. विनोद शिंदे. सुजीत थोरात.आदी मान्यवर  उपस्थित होते 

स्पर्धा यशस्वी होणेसाठी . नरेंद्र लिबे,अतुल पाटील. महेंद्र भोसले. दिलिप चिंचकर. दत्ता पाटील. एन.टी. सर. कैलास माने. शशिकांत पाटील. उमेश नलवडे गोविंद पवार. जगताप सर. काटकर सर.जानुगडे सर. राठोड सर तसेच राजेंद्रसिंह यादव विजयसिंह यादव मित्रपरिवार व सर्व कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमास कराड वाहतुक पोलिस शाखेेचे सहकार्य लाभले

युक्रेनियन सैन्याच्या शस्त्रांनी भरलेल्या गोदामात स्फोट...

वेध माझा ऑनलाइन - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर युक्रेननं आपले एयरस्पेस बंद केलेत. दरम्यान आताच समोर आलेल्या युक्रेनियन सैन्याच्या शस्त्रांनी भरलेल्या गोदामात स्फोट झाला आहे. या स्फोटाचा व्हिडिओ समोर आला आहे.

रशियन हल्ल्यादरम्यान युक्रेनला भीती वाटत आहे की त्यांच्याकडे येणाऱ्या विमानांवर सायबर हल्ला होऊ शकतो. याशिवाय नागरी उड्डाणांना लक्ष्य करून गोळीबार होण्याचाही धोका आहे. युक्रेन स्टेट एअर ट्रॅफिक सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, धोका लक्षात घेऊन युक्रेनमधील एयरस्पेस गुरुवारी नागरी उड्डाणांसाठी बंद करण्यात आलं आहे.
एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलमधील तेल अवीव येथून कॅनडातील टोरंटोला जाणाऱ्या विमानानं रात्री उशिरा युक्रेनच्या हवाई क्षेत्रातून अचानक यू-टर्न घेतला. या घटनेनंतर उड्डाणांबाबत सतर्कता आणखी वाढवण्यात आली आहे.

Wednesday, February 23, 2022

नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कस्टडी ; सत्र न्यायालयाचा निर्णय... कस्टडीत काळात मलिक यांना औषधे आणि घरातून जेवण मिळावे एवढी मागणी न्यायालयाकडून मान्य...

वेध माझा ऑनलाइन - नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता त्यांना 3 मार्चपर्यंत म्हणजे नऊ दिवसांची ईडीची कस्टडी देण्याचा निर्णय सत्र न्यायालयाने दिला आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. त्यानंतर या प्रकरणात सत्र न्यायालयात हा निर्णय दिला आहे.

हे प्रकरण अंडरवर्ल्डशी संबंधित आहे, मनी लॉंड्रिंगशी संबंधित आहे त्यामुळे या प्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी ईडीची कस्टडी मिळावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती.ईडीच्या कस्टडीच्या काळात नवाब मलिक यांना औषधे आणि त्यांच्या घरातून जेवण मिळावे अशी मागणी नवाब मलिकांच्या वकिलांनी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे. 

ईडीचा युक्तीवाद

दाऊदची अनेक ठिकाणी बेनामी संपत्ती आहे. दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. हसिना पारकर आणि नवाब मलिक याचां संबंध आहे. नवाब मलिकांचा संबंध थेट अंडरवर्ल्डशी आहे. दाऊदशी संबंधित सात ठिकाणच्या संपत्तीचे मालक हे नवाब मलिक आहेत. डी गँगशी संबंधित संपत्ती मलिकांच्या कुटुंबियांनी खरेदी केली आहे.अंडरवर्ल्डशी संबंध, त्यांच्याशी संबंधित पैशाचा वापर करणे, हा पैसा परदेशात पाठवणाऱ्या कंपनीशी संबंध असणे या आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. या प्रकरणी सर्व पुरावे न्यायालयात मांडण्यात आले आहेत. त्यानंतर सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 



महाविकास आघाडीने ईडीच्या कारवाईविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा घेतला निर्णय ; आघाडीचे सर्व मंत्री, नेते उद्या गुरुवारी करणार आंदोलन...

वेध माझा ऑनलाइन - मनी लाँड्रिंग प्रकरणाचा आरोप ठेवून ईडीने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने आता ईडीच्या कारवाईविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीचे सर्व मंत्री, नेते उद्या गुरुवारी आंदोलन करणार आहे.

नवाब मलिकांच्या अटकमुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.  महाविकास आघाडीचे नेते, मंत्री उद्या गुरुवारी सकाळी 10 वाजता मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध करणार आहे.   तीनही पक्षांचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्ते मंत्रालयाच्या बाजूलाच असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेधासाठी जमणार आहे. ईडीच्या या कारवाईविरोधात महाविकास आघाडी म्हणून सत्ताधारी एकत्र येणार आहे. नवाब मलिक यांच्या कारवाई विरोधात महाविकास आघाडीने निषेधाचा पवित्रा घेतला आहे.

शरद पवार भाजपच्या विरोधात मोठा निर्णय घेण्याची शक्यता ;भाजपने ज्या प्रकारे सरकारी तपास यंत्रणाचा वापर केला आहे. त्याला चोख उत्तर देण्याचे शरद पवार यांनी आदेश दिल्याची माहिती...

वेध माझा ऑनलाइन  - मनी लाँड्रिंग प्रकरणाचा आरोप ठेवून ईडीने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. मलिक यांच्या अटकेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आहे. राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक घेतल्यानंतर शरद पवार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला रवाना झाला आहे. त्यामुळे यापुढे भाजपविरोधात मोठ्या निर्णयाची शक्यता आहे

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते हजर होते. तसंच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण सुद्धा हजर होते. या बैठकीमध्ये नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने ज्या प्रकारे सरकारी तपास यंत्रणाचा वापर केला आहे. त्याला चोख उत्तर देण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहे.

या बैठकीनंतर शरद पवार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्याकडे रवाना झाले आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला आहे तो निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानी घातला जाणार, अशी माहिती मिळत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अजित पवार पोहोचले आहे.

उद्या मोठी घोषणा करणार ; उदयनराजे यांनी केले ट्विट ; राजकीय गोटात खळबळ...

वेध माझा ऑनलाइन -  खासदार उदयनराजे भोसले हे कोणत्या-ना-कोणत्या कारणाने मीडियामध्ये चर्चेत असतात. उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलने ओळखले जातात. तसेच, डायलॉगबाजी, कॉलर उडवण्याची त्यांची स्टाईल आदींमुळे ते सोशल मिडियावर चर्चेत येतात. दरम्यान, आता उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत उद्या म्हणजेच 24 तारखेला साताऱ्यात एक मोठी घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नेमकी कोणती घोषणा उदयनराजे भोसले करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ह्या 24 तारखेला एक मोठी घोषणा करायचे मनात आहे. राजकीय आरोप-प्रतिआरोपांच्या ह्या वातावरणात पहिल्याच वाक्याने ज्या ज्या शक्यता तुमच्या डोक्यात आल्या असतील, त्यामध्ये काहीच नसणार आहे. उपक्रम अभिनव आहे, तेव्हा हे आमंत्रण पण फार औपचारिक अशा धाटणीचे नाही, असे उदयनराजे भोसले यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. 
याचबरोबर, आपण सारेच आपल्या भोवती सुरु असणाऱ्या घटना पाहत असतो. काही अयोग्य वाटल्या तर त्या कोणीतरी दुरूस्त करेल अशी केवळ इच्छा आपण व्यक्त करत असतो. आम्ही मात्र एका सामाजिक प्रश्नावर गेली अनेक वर्षे प्रशासकीय बदलांसाठी अनेक प्रयत्न केले. पण ते पुरेसे नाहीत. गेल्या काही दिवसांच्या चिंतनातून आम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणून स्वत:च एक व्यवस्था उभी करण्याचे ठरविले आहे, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.  
याशिवाय, कोणता प्रश्न, काय व्यवस्था... अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी आम्ही सदर पत्राने आमंत्रण देत आहोत, असे ट्विटमध्ये म्हणत उदयनराजे भोसले यांनी पत्रकार आणि जनतेला आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आता साताऱ्यातील विकास कामांबाबत उदयनराजे भोसले बोलणार आहेत की येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने काही राजकीय भूमिका मांडणार आहेत, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. तसेच, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान,  गेल्या काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊणतास चर्चा झाली होती. साताऱ्यातील विकास कामांच्या अनुषंगाने ही भेट होती. मात्र, बऱ्याच दिवसानंतर दोन्ही नेते एकमेकांना भेटल्याने या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यावेळी उदयनराजे भोसले मीडियासमोर येताच तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर उदयनराजे भोसले यांनी सर्वपक्षीय समभाव अशी सूचक प्रतिक्रिया देऊन सर्वांना बुचकळ्यात पाडले होते. त्यामुळे ते खरंच राष्ट्रवादीत जाणार का? अशी चर्चा रंगली होती.

नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केले ट्विट... त्यामध्ये किरीट सोमय्या म्हणतात...

वेध माझा ऑनलाइन -  
नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी लगेच ट्विट केलं आहे. त्यामध्ये किरीट सोमय्या म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यानंतर आता नवाब मलिक आणि त्यानंतर शिवसेनेचे नेते अनिल परब असं, म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारमधील सर्व घोटाळेबाजांना हिशोब द्यावा लागेल, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. 


दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी याप्रकरणात एनआयए आणि ईडीकडून मुंबईत संयुक्तपणे छापे टाकण्यात आले होते. कुख्यात गुंड दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते. तसेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यालाही ईडीने अटक केली होती. इकबाल कासकरच्या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव पुढे आल्याचे समजते. त्यामुळे ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी होती असल्याचे समजते.
काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कागदपत्रे समोर आणत नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींसोबत व्यवहार  केल्याचा आरोप केला होता. आता त्या आरोपांबाबतच्या चौकशीसाठीच ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक याना अटक ...

वेध माझा ऑनलाइन -राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक याना नुकतीच अटक करण्यात आली आहे मनी लाँड्रिंग प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी सुरू झाली. ईडीने ही सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. ही बातमी बाहेर येताच सकाळीच राज्यात खळबळ उडाली. नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत. 


नवाब मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात नेण्यात येण्याची शक्यता आहे. दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांचाही सहभाग असल्याचा पुरावे सापडले असल्याचे सूत्रांनी सांगितले.आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ईडी अधिकारी मलिक यांचे घरी दाखल झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांच्या भावाला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, मलिक यांना समन्स देण्यात आले नव्हते. 

प्रकरण काय?

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरला ईडी कोठडी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे. याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती. शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए  कोर्टात हजर केलं होतं. यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.


कराडची ग्रामदेवता श्री उत्तरा लक्ष्मी संस्थानचे नव्याने संशोधन: युवा संशोधकाने उचललंय शिवधनुष्य; मंदिर पुजार्याच्या धाडसावर प्रकाश...

वेध माझा ऑनलाइन - प्राचीन शिल्पकलेतील अजोड कलाकृती म्हणून लौकिक असलेली येथील ग्रामदेवता श्री उत्तरालक्ष्मीची मूर्ती सर्वसामान्यांसह इतिहासकारांच्या जिव्हाळय़ाची आहे. कराडच्या सोमवार पेठेत स्थित असलेल्या या देवीचा इतिहास बाराव्या, तेराव्या शतकापासून आहे. या संस्थानचे नव्याने संशोधन सुरू झाले असून इतिहासातील अनेक संदर्भ प्रकाशात येणार आहेत.

सातारा जिल्हय़ातील शिरवळचे मोडी लिपी अभ्यासक व संशोधक महेश्वर चव्हाण व मंदिराचे पुजारी चंद्रहास पुजारी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पुजारी यांच्या वाडवडिलांनी जतन केलेल्या जुन्या कागदपत्रांचे संशोधन महेश्वर चव्हाण यांनी सुरू केले आहे. यात अतिशय महत्वाची माहिती पुढे आली आहे. ती म्हणजे सोळाव्या शतकात परकीय आक्रमणावेळी ही अजोड मूर्ती पुजारी यांच्या वंशजांनी मोठय़ा धाडसाने घरात लपवून ठेवली होती. ती कृष्णाकाठी जमिनीत सापडली नव्हती, असा इतिहास नव्याने समोर आलाय.
सोमवार पेठेतील भैरोबा गल्लीत श्री उत्तरालक्ष्मीचे मंदिर आहे. या प्राचीन मूर्तीची ख्याती लक्षात घेऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर यांच्यासह संशोधकांनी मंदिराला भेटी दिल्या आहेत.
मोडी लिपीचे अभ्यासक महेश्वर चव्हाण यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, कराडमधील संशोधक के. डी. देशपांडे यांच्या लिखाणातून या देवीची माहिती मिळाली होती. त्यातून त्यांची जिज्ञासा वाढत गेली. दरम्यान, इस्लामपूरला परीक्षेसाठी आल्यानंतर त्यांनी उत्तरालक्ष्मी मंदिरला भेट दिली. पुजारी चंद्रहास पुजारी यांच्याशी चर्चा केली. महेश्वर हे मोडी लिपीचे अभ्यासक असल्याचे समजताच त्यांनी वाडवडिलांच्या काळापासून जतन करून ठेवलेली मोडीतील मध्ययुगीन कागदपत्रे त्यांना दिली. महेश्वर यांनी या कागदपत्रांचा अभ्यास सुरू केला. ही कागदपत्रे अतिशय जीर्ण होती. मात्र मोठय़ा कौशल्याने त्यांनी संशोधन केले. यातून श्री उत्तरालक्ष्मी संस्थानबद्दलच्या नव्या माहितीवर प्रकाश पडत गेला. गेले 5 महिने ते संशोधन करत आहेत.  
या संशोधनातून ही मूर्ती पुजारी यांच्या वंशजांनी 1736 सालापूर्वी झालेल्या परकीय आक्रमणावेळी हे देवालय विछिन्न होत असताना मोठय़ा धाडसाने घरात लपवली होती. धामधुमीचा काळ असतानाही स्वगृही प्रतिष्ठापना करून नित्यसेवा केली. या देवीची मोठी महती असल्याने गावकऱयांनी वर्गणी जमवून देवीचे नवीन मंदिर बांधले, अशी हकीकत सांगणारे 1736 सालचे औंध पंतप्रतिनिधींचे पत्र उपलब्ध झाले आहे. यापूर्वी 17 व्या शतकातील परकीय आक्रमणावेळी ही मूर्ती तळय़ाकाठी, नदीकाठी वाळवंटात लपवली होती. नंतर ती जमीन नांगरताना फाळाला लागली. त्यावेळी तिची प्रतिष्ठापना भैरोबा गल्लीत करण्यात आली, अशी आख्यायिका लोकस्मृतिनुसार प्रचलित होती. मात्र गेल्या दहा पिढय़ा या देवीची सेवा करणाऱया पुजारी कुटुंबातील वंशजांनी मूर्ती धाडसाने लपवून नित्यसेवा केल्याचा नवा इतिहास पुढे आला आहे. या देवीच्या संस्थानची नवी कागदपत्रे समोर आली असून महेश्वर चव्हाण यांनी याबाबतचा शोधनिबंध भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे येथे सादर केला असून त्याचे वाचनही झाले आहे.  
महेश्वर चव्हाण हे मोडी लिपीचे अभ्यासक आहेत. 2017 साली त्यांनी मोडीचा अभ्यास सुरू केला. विशेष म्हणजे जिज्ञासेपोटी त्यांनी श्री उत्तरालक्ष्मीच्या कागदपत्रांचा अभ्यास केला. 2021 मध्ये यांनी आपला संशोधनाचा पहिला शोधनिबंध भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे यांना सादर केला आहे.  

आणखी इतिहास पुढे येईल...

मी मोठय़ा जिज्ञासेने या संस्थानच्या संशोधनासाठी पुढाकार घेतला. मंदिराचे पुजारी चंद्रहास पुजारी यांनी मला जुनी कागदपत्रे उपलब्ध करून दिली. अजूनही बरीच कागदपत्रे अभ्यासणार आहे. यातून जुन्या काळातील या महत्वाच्या संस्थानचा  इतिहास पुढे येणार आहे. या कार्यामध्ये गुरुवर्य, दुर्गप्रेमी के. एन.देसाई, का. धों. देशपांडे, सहकारी मित्र तेजस अरबुणे, किरण माळी, संकेत फडके, किरण जाधव, जयेश मोरे, वैष्णवी सुर्वे या सर्वांसह पुजारी कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.  
-महेश्वर चव्हाण, मोडी अभ्यासक

 नव्या पिढीसमोर उत्तरालक्ष्मीची महती येतेय, याचे समाधान...
आमच्या दहा पिढय़ांनी या देवीची मनोभावे सेवा केली. देवीचा आमच्यावर सतत कृपाशिर्वाद राहिला. आता नव्याने आमच्याकडील कागदपत्रांचा अभ्यास महेश्वरसारखी नवी पिढी करतेय आणि या देवीची महती नव्या पिढीसमोर येतेय, याचे समाधान वाटते.  
-चंद्रहास पुजारी, कराड

नव्याने समोर आलेला इतिहास
 1829 सालच्या पत्रात देवीच्या उत्सवाच्या नोंदी
आदिलशाही काळात संस्थानचा जागृत देवस्थान म्हणून उल्लेख
रोजचा नैवेद्य, नंदादीपसाठी साडे पंधरा रूपये लावून दिल्याचे व विडय़ाची पाने सुमारे 25 व सुपारी 3 टका याप्रमाणे लावून दिल्याची नोंद
1697 मधील शंकराचार्य पंडितराव यांच्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख  
देवीकार्यात लबाडी करणाऱया मोकादमास खडसावणारे पत्र
देवीचे वार्षिक उत्सव, त्याचा खर्च, उत्सवाचे स्वरूप याची माहिती उजेडात

Tuesday, February 22, 2022

गृहराज्यमंत्र्यांच्या तालुक्यात अत्याचार वाढले ; महिला, लहान मुली असुरक्षित असतील तर मंत्रीपद काय चाटायचय.? संतप्त नागरिक चर्चा करू लागलेत...

वेध माझा ऑनलाइन - राज्याचे गृहराज्यमंत्री ना शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी आहे अल्पवयीन व मतिमंद मुलीवर हा चीड आणणारा अत्याचार झालाय आणि म्हणूूूनच गृहराज्यमंत्र्यांच्या तालुक्यातच स्त्रिया, मुली सुरक्षित नाहीत असा संदेश राज्यभर गेला आहे आणि ही बाब लाजिरवाणीच आहे

ना शंभूराज देसाई हे कार्यतत्पर आहेत असे त्यांचे समर्थक नेहमी सांगतात... मात्र अशा घडलेल्या घटना त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात... काही दिवसांपूर्वी त्याच तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता तिचा खून करून तिचा मृतदेह एका दरीत टाकण्यात आला होता...आणि आता ही दुसरी घटना... मग... कुठ आहे कायदा सुव्यवस्था पाटण तालुक्यात?महिला लहान मुली यांनी या तालुक्यात सुरक्षित रहायचं की नाही? कोण आहे यांचा वाली ? काय करतायत लोकप्रतिनिधी? मंत्रिपद असून तालुक्यातील महिला भयभीत रहात असतील तर त्या मंत्रीपदाला काय चाटायचय...? 

नामदार देसाई हे वाशीम जिल्ह्याचे देखील पालकमंत्री आहेत पण त्याही जिल्ह्यात त्यांचे काम दिसत नाही अशी चर्चा असते... त्याच जिल्ह्यात ऐन कोविड मध्ये पालकमंत्री दाखवा आणि एक रुपया मिळवा असे बोर्ड लागलेले संपूर्ण राज्याने पाहिले होते... म्हणजेच इथंही त्यांच्या कामाची बोंब... आणि तिकडेही तीच बॉम्ब... दिसते आहे... अशी आता चर्चा आहे 
दरम्यान,घडलेली सध्याची पाटण तालुक्यातील घटना एवढी भयानक आहे की सलग 20 दिवस या घटनेतील 8 आरोपी या अल्पवयीन मतिमंद मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करत होते आणि माणुसकीला काळिमा फासला जात होता... एका महिलेची मदत घेत या आठ जणांनी हा अत्याचार केलाय...गृहराज्यमंत्रीपद पाटण तालुक्याला आहे आणि येथील पोलिसांना या घटनेची तब्बल 20 दिवस कुणकुण लागू नये? हे नवलच नाही का?  
बाईक वरून फेरफटका मारणे किंवा साताऱ्यात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी अटक झाला का?याची विचारणा करणे...या घटनेचे vdo  प्रसिद्ध करणे... असले उद्योग करून स्वतःच्या तालुक्यतील महिला सुरक्षित राहणार आहेत का?अत्याचाऱ्याच्या घटना थांबणार आहेत का? याचा विचार ना देसाई यांनी करायला हवा... उठायचं की सायरन वाजवत कराड आणि साताऱ्यातील गल्लीबोलातून फिरायचं...यापेक्षा आपल्या स्वतःच्या तालुक्यात महिलांवर जे अत्याचार चाललेत  याची खबरबात किमान गृह खात्याचे मंत्री म्हणून तरी त्यांनी ठेवली पाहिजे...
वाशीम जिल्ह्यात त्यांची निष्क्रियता दाखवणारे बोर्ड लागले... तसे सातारा जिल्ह्यात लागणार नाहीत याची काळजी यापुढे त्यांनी घेतली पाहिजे अशीही आता चर्चा आहे...

मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस म्हटलं जातं ; मंत्री नवाब मलिक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून शरद पवारांचा हल्लाबोल...

वेध माझा ऑनलाइन - सत्याची भूमिका मांडणाऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. जे जाहीरपणाने बोलतात त्यांच्याविरोधात यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. नवाब मलिक हे केंद्राच्या विरोधात सप्ष्टपणे भूमिका मांडतात, त्यामुळेचं अशा प्रकारे यंत्रणांचा वापर करुन कारवाई होत असल्याचे पवार यावेळी म्हणाले. मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं असेही पवार यांनी सांगितले. सत्तेचा गैरवापर करुन लोकांना त्रास देणे, बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे पवार म्हणाले. दरम्यान, मी मुख्यमंत्री असताना देखील माझ्यावरही असेच आरोप केले जात होते असेही पवार यावेळी म्हणाले.

सद्या यंत्रणांचा गैरवापर केला जातो त्याचं हे उदाहरण आहे. नवाब मलिक जाहीरपणे बोलातात त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे अधिक भाष्य करायची गरज नसल्याचे पवार यांनी सांगितले. पुरावे कशाचे? कसली केस काढली त्यांनी? एक साधी गोष्ट आहे, काही झालं आणि विशेषत: मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं. कोण काय, कुठं काय माहिती नाही. देशात हे सुरु आहे. हे काही नवीन नाही. मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी माझ्यावरही असाच आरोप होता. त्यावेळीही असं वातावरण तयार केलं होतं. 25 वर्ष झाली. केंद्र सरकार किंवा एजन्सीबद्दल जे बोलतात त्यांना यंत्रणांचा गैरवापर करुन त्रास दिला जातोय, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला. संजय राऊत काय म्हणाले त्याची मला कल्पना नाही, मी त्याच्यावर भाष्य करण्याचं कारण नाही असेही पवार म्हणाले.
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

लवकरच 2 ते 6 वयोगटातील मुलांसाठी लस होणार उपलब्ध ; कोवोवॅक्सची ट्रायल मे महिन्यापर्यंत होणार पूर्ण...

वेध माझा ऑनलाइन - एक मोठी बातमी समोर आली आहे. आतापर्यंत फक्त 12 वर्षांवरील मुलांनाच कोरोनाची लस दिली जात होती. मात्र आता 2 ते 6 वर्षे वयोगटातील मुलंही देशात सर्वात कमी वयात कोरोनाची लस घेणारी मुलं बनली आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं विकसित केलेले कोवोवॅक्स ट्रायल दरम्यान 2 ते 6 वयोगटातील 230 मुलांना देण्यात आलं. या मुलांना Covovax चा पहिला डोस आधीच मिळाला आहे. या मुलांना Covovax चा दुसरा डोस 21 दिवसांनी दिला जाईल. कोवोवॅक्सची ट्रायल मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. यानंतर 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोवोवॅक्स लस दिली जाईल.

देशाच्या विविध भागांतील 10 रुग्णालयांमध्ये ट्रायलदरम्यान या मुलांना कोवोवॅक्स लस देण्यात आली. कोवोवॅक्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, देशातील 10 रुग्णालयांमध्ये ट्रायल दरम्यान 230 सर्वात लहान मुलांना ही लस देण्यात आली आहे. भारतात कोवोवॅक्सची ही एडवांस ह्युमन ट्रायल आहे.


ऑगस्टमध्ये सुरु झालं होतं ट्रायल

फेज 2 आणि फेज 3 मुलांवर कोवोवॅक्सच्या ट्रायल ऑगस्टमध्ये सुरू झाल्या होत्या. या ट्रायलमध्ये एकूण 920 मुले सहभागी होत आहेत. यामध्ये 12 ते 17 वयोगटातील 460 मुले, 7 ते 11 वर्षे वयोगटातील 230 मुले आणि 2 ते 6 वर्षे वयोगटातील 230 बालकांचा समावेश आहे. सीरम इन्स्टिट्यूट व्यतिरिक्त, भारत बायोटेक, दोन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांवरही कोवॅक्सिनची ट्रायल करत आहे.

सीरम इन्स्टिट्यूटने प्रथम किशोरवयीन मुलांवर कोवोवॅक्सची ट्रायल घेण्याच्या मंजुरीसाठी औषध नियामक संस्थेकडे अर्ज केला होता. सीरम इन्स्टिट्यूटला 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांवर ट्रायल घेण्यास मान्यता देण्यात आली. जेव्हा त्यांना किशोरवयीन मुलांवरील सुरक्षिततेच्या सर्व पैलूंची खात्री होती. त्यानंतर आता 2 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांवर याची ट्रायल केली जात आहे.

प्रोटिन आधारित लस

किशोरवयीन मुलांवरील ट्रायलच्या सर्व पॅरामीटर्सवर सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतर, सीरम इन्स्टिट्यूटनं 2 ते 6 वर्षांच्या मुलांवर ट्रायल सुरू केली आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, आम्ही प्रथम किशोरवयीन मुलांवर याची ट्रायल केली. त्यानंतर 7 ते 11 वर्षांच्या मुलांवर ही ट्रायल करण्यात आली आणि आता 2 ते 6 वर्षांच्या मुलांवर ही ट्रायल केली जात आहे. या मुलांवर पुढील सहा महिने लक्ष ठेवण्यात येणार आहे. ही अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी फर्म Novavax द्वारे विकसित केलेली प्रोटीन-आधारित लस आहे. त्याचा भारतातील सीरम इन्स्टिट्यूटशी करार आहे. भारतात ते Covovax या ब्रँड नावानं ओळखलं जातं.

आज पहाटे ईडी अधिकाऱ्यांची नवाब मलिक यांच्या घरी धडक ; ईडी कडून मलिक यांची चौकशी सुरू ; अंडरवर्ल्डच्या व्यक्ती सोबत जमीन व्यवहार केल्याचा होता आरोप त्यासंबंधी ईडी कडून कारवाईची झाल्याची चर्चा...

वेध माझा ऑनलाइन - राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. आज पहाटे नवाब मलिक यांच्या निवास्थानी आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांना मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आणले असून, तिथे सकाळपासून त्यांची चौकशी सुरू आहे. कुर्ल्यातील जमीन व्यवहाराप्रकरणी नवाब मलिक यांची चौकशी करण्यात येत असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दरम्यान, या कारवाईमुळे राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या निवासस्थानी आले. तेव्हा त्यांच्यासोबत सीआरपीएफचे जवान होते. मलिक यांना कारवाईची कल्पना दिल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी साडेसात वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात आणले. त्यानंतर सकाळी पावणेआठ वाजल्यापासून मलिक यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच ईडीच्या कार्यालयाबाहेरही बंदोबस्त वाढण्यात आला आहे.  

काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कागदपत्रे समोर आणत नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींसोबत व्यवहार  केल्याचा आरोप केला होता. आता त्या आरोपांबाबतच्या चौकशीसाठीच ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

निवडणूक प्रचारावरचे सर्व निर्बंध हटवले ; आता रोड शो लाही परवानगी ...

वेध माझा ऑनलाइन - निवडणूक प्रचारावर कोरोनामुळे असलेले सर्व निर्बंध आता हटवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने निवडणूक आयोगाकडून सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.  राजकीय सभांना पूर्वीप्रमाणे 50 टक्के उपस्थितीची मर्यादा हटवण्यात आली आहे. तसेच  रोड शो ला देखील आता परवानगी देण्यात आले आहे.

दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाट सुरू असताना उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदान झाले आहे. तर उत्तरप्रेदशात तीन टप्प्यात 172 जागांसाठी मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यासाठी बुधवारी मतदान होणार आहे. तर बाकी उर्वरित तीन टप्प्यांसाठी रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशात सात टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे. मणीपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 28 फेब्रुवारी आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 मार्चला होणार आहे. 
देशातील कोरोनाबाधितांची घटती प्रकरणं पाहून निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे.  देशात कोरोनाच्या साडेतील लाख रुग्णांची नोंद केली जात होती. अशातच आज हा आकडा घटला असून दररोज सुमारे 13 हजार कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. त्यामुळे निर्बंधांमध्ये सूट देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. प्रचार सभांसाठी आणि रॅलींसाठी निवडणूक आयोगानं  पूर्ण सूट दिली आहे. 
आयोगानं देशातील तसेच ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहे, त्या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांमध्ये झालेली लक्षणीय घट झाल्याचं लक्षात घेतलं. वस्तुस्थिती आणि परिस्थितीच्या आधारावर, राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या निवडणुकीत अधिकाधिक सहभागाची गरज, आयोग पुढील रीतीने निवडणूक प्रचाराच्या तरतुदी तत्काळ प्रभावाने शिथिल करतो.

राज्यात कोरोनाच्या 1080 नव्या रुग्णांची भर तर, 2 हजार 488 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले...

वेध माझा ऑनलाइन - कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून आटोक्यात येत आहे. सोमवारी हजारखाली गेलेली रुग्णसंख्या आज काही प्रमाणात वाढली आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 1080 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय राज्यात 2 हजार 488 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी देखील परतले आहेत. ओमायक्रॉनबाधितांचा विचार करता आतापर्यंत 4509 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 3994 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 

राज्यात 47 कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबईत 135 नवे कोरोनाबाधित   

मुंबईत मागील 24 तासांत 135 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. सोमवारी रुग्णसंख्या शंभरहून कमी आढळल्यानंतर आज रुग्णसंख्या काहीशी अधिक आढळली आहे. सोमवारी 96 नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान आज 233 जण कोरोनामुक्त देखील झाले असून त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे.  मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 135 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 233 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 315 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 135 रुग्णांपैकी 20 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 248 बेड्सपैकी केवळ 781 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.02% टक्के इतका झाला आहे.

आज जिल्ह्यात 15 बाधीत,52 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 15 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 52 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 5खंडाळा 0 खटाव 1 कोरेगांव 1 माण 1 महाबळेश्वर 1 पाटण 0 फलटण 1 सातारा 2 वाई 1 व इतर 1आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण  15 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 52 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

संपामुळे झालेले नुकसान कामगारांकडून वसूल करण्याचा कोणताही निर्णय नाही : एसटी महामंडळ...

वेध माझा ऑनलाइन - एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत असले तरी हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी स्पष्टोक्ती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज दिली. एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिककाळ सुरु असलेल्या या संपामुळे महामंडळाला कोट्यावधी रूपयांचे नुकसान सोसावे लागत आहे ही वस्तूस्थिती आहे. मात्र, हे नुकसान भरून काढण्यासाठी एसटी कामगारांच्या वेतनात कपात करून वसूल करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या विचारधीन आहे, असे वृत्त काही प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे.वास्तविक, अशा प्रकरणी संपामुळे होणारी महसूली नुकसान भरपाई कामगिरीवर रुजू झालेल्या कामगारांच्या वेतनातून वसूल करण्याचा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नाही किंवा तसा प्रस्तावही विचारधीन नाही, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. तसेच अशा तथ्यहिन वृत्तांवर कामगारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.


गेल्या 100 दिवसांहून अधिक काळ झालं एसटी कर्मचारी संपावर आहेत. कोणत्याही परिस्थितीत एसटीचे विलिनीकरण झालेच पाहिजे, या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे अद्याप संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण, संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहावालावर आज मुंबई उच्च न्यायलयात सुनावणी होणार आहे. विलिनीकरणासंदर्भात आपल्या बाजूने निकाल लागला नाही तर आंदोलन चिघळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आज पुण्यात केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चा ; वडेट्टीवारांविरोधात घोषणाबाजी ; त्यानंतर मोर्चात झाला जोरदार राडा...

वेध माझा ऑनलाइन - काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल कडून आज पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसह समाजाच्या इतर मागण्यांसाठी आज पुण्यात केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस ओबीसी सेलने हल्लाबोल मोर्चा काढला. मात्र, या मोर्चात जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं.

पुण्यात ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन सुरू असताना ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी काँग्रेस मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. इतकेच नाही तर काळा झेंडा दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी संतप्त झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मृणाल ढोले पाटील यांना धक्काबुक्की करत मारहाण सुद्धा केली.
ओबीसी आरक्षणाच्या मागणीसह समाजाच्या इतर मागण्यांसाठी पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता. ढोले पाटील ओबीसीना आरक्षण मिळावे म्हणून लढा देत आहेत. त्यामुळे ते सुद्धा या मोर्चाच्या ठिकाणी आले. मात्र, त्यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ते पाहून संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोले पाटील यांना धक्काबुक्की केली.
काँग्रेस शहराध्यक्ष, काँग्रेस ओबीसी प्रदेशाध्यक्ष या मोर्चात सहभागी झाले होते. त्याचवेळी अचानक मंत्री वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली आणि अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मृणाल ढोले पाटील याला मारहाण सुद्धा केली. मृणाल ढोले पाटील हा भाजपचा पदाधिकारी असल्याचंही काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.

Monday, February 21, 2022

कराडच्या अतुलदादा शिंदे प्रतिष्ठानचे घवघवीत यश ; अतुलदादा शिंदे प्रतिष्ठानने पटकावला मानाच्या उपमुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेत द्वितीय क्रमांक ; संपूर्ण राज्यभरातून होतय अभिनंदन...

वेध माझा ऑनलाइन - बारामतीच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री चषक 2022 क्रिकेट स्पर्धेत कराडच्या अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान संघाने द्वितीय क्रमांक पटकवत कराडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे 
यावेळी अंतिम सामन्यात 109 धावाचे लक्ष होते प्रतिष्ठानने 105 धावांपर्यंत मजल मारली व द्वितीय क्रमांक पटकावला हा अंतिम सामना पाहण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा हजर होते एकूण 15000 प्रेक्षकांनी या सामन्याचा आनंद लुटला दरम्यान,अतुलदादा प्रतिष्ठानच्या या घवघवीत यशाचे कराडसह संपूर्ण राज्यभरातून कौतुक होत आहे युवा नेते अतुल शिंदे यांचे देखील सर्वत्र अभिनंदन होत आहे


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती येथे उपमुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते राज्यभरातून एकूण 32 संघांची त्याकरिता निवड करण्यात आली होती त्यामध्ये कराडच्या अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान संघाचीही निवड करण्यात आली होती या संघाने अंतिम फेरीपर्यंत आपली मजल मारत मॅन ऑफ दि सिरीज तसेच उत्कृष्ठ गोलंदाज चे विशेष बक्षीस जिंकत स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला अतुलदादा शिंदे प्रतिष्ठानने मिळवलेल्या या यशाने कराडची मान राज्यात अभिमानाने उंचावली आहे कराडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे दोन लाख पन्नास हजार रोख व चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे हा पुरस्कारसोहळा बारामती येथे नुकताच पार पडला युवा नेते अतुल शिंदे स्वतः या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेले होते त्यांच्या समवेत  युवक राष्ट्रवादीचे कराड शहर अध्यक्ष युवा नेते पोपटराव साळुंखे,राजू शिंदे,अनिल धोत्रे,सागर पाटील,अधिक शिंदे,रमेश गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते

नारायण राणे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता ; राणेंविरोधात महिला आयोगाकडे तक्रार...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या वादात उडी घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. एवढंच नाहीतर दिशा सॅलियनचा बलात्कार झाल्याचा पुन्हा एकदा आरोप केला. या प्रकरणी शिवसेनेच्या नेते आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणेंविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात दिशा सॅलियन प्रकरणावरून नारायण राणे यांनी भाष्य केल्यामुळे कारवाई करण्याची मागणी केली आहे.
'सुशात सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने पूर्ण केला आहे. सीबीआयने दिशा सॅलियन प्रकरणाचाही तपास पूर्ण केला असून तिच्यावर बलात्कार झाला नाही, ती गरोदर सुद्धा नव्हती, असं तिच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. तिच्या आई-वडिलांनी सुद्धा या अहवालाला दुजोरा दिला आहे. एवढंच नाहीतर तिच्या आई-वडिलांनी मुलीच्या मृत्यूनंतरही बदनामी होत असल्याची तक्रार दिली आहे.  तरीही नारायण राणे यांनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन बलात्कार आणि हत्या झाल्याचे आरोप करत आहे, हे थांबवले पाहिजे, दिशाची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पेडणेकर यांनी पत्रातून केली आहे.

काय म्हणाले होते राणे?

दोन दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी, सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूवरही भाष्य करत नारायण राणे यांनी खळबळजनक दावा केला होता.
8 जून रोजी दिशा सालियनची हत्या झाली. का करेल ती आत्महत्या? एकतर ती पार्टीला जात नव्हती. जबरदस्ती बोलवलं. त्यानंतर ती थांबत नव्हती, घरी जायला निघाली होती. त्यानंतर कोण-कोण होते? पोलीस संरक्षण कोणाला होतं? तिच्यावर वाईट कृत्य होत असताना बाहेर संरक्षण कोणाचं होतं. सालियनचा पोस्टमार्टम रिपोर्ट अजून आला नाही, का नाही आला? सात महिन्यात यायला हवा होता. दिशा सालियन ज्या इमारतीत राहत होती त्या इमारतीच्या रजिस्टरमधील 8 जूनची पाने कोणी फाडली? कोणाला इन्ट्रेस्ट होता.
त्यानंतर दिशा सालियनबाबत सुशांतसिंगला जेव्हा कळालं तेव्हा तो कुठे तरी बोलला की मी यांना सोडणार नाही. त्यानंतर काहीजण त्याच्या घरी गेले. दिशा सालियनच्या मुद्द्यावरुन बाचाबाची झाली. त्यात बिचाऱ्या सुशांतची हत्या करण्यात आली. तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती? त्या इमारतीचं त्या दिवशीचं सीसीटीव्ही गायब कसे झाले? आधी सीसीटीव्ही होते असं सोसायटीचे लोक सांगतात. ठराविक माणसाची रुग्णवाहिका कशी आली, रुग्णवाहिका कोणी आणली? रुग्णालयात कोणी नेलं, पुरावे कुणी नष्ट केले? या सर्वांची चौकशी होणार, असंही नारायण राणे म्हणाले.
त्यात कोणते अधिकारी होते ते सुद्धा आता तिकडे राहिले नाहीत. ते उघडं करतील आता सगळं, हा महाराष्ट्र? अशा रितीने? कलाक्षेत्रात चांगली संधी आहे म्हणून देशभरातून कलाकार मुंबईत येतात. अशा एका तरुण कलाकाराची हत्या केली. कोणी केली? जुन्या काही घटना आठवतात अशा काही हत्येत आरोपी सापडले नाहीत, असंही नारायण राणे म्हणाले.

आज जिल्ह्यात 17 बाधीत,78 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 17 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 78 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 2 खंडाळा 0 खटाव 1 कोरेगांव 0 माण 1 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 2 सातारा 9 वाई 0 व इतर 1आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण  17 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 78 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

राणे कुटुंबीयांच्या नीलरत्न बंगल्यावर पडणार हातोडा ? केंद्रातील मोदी सरकारने यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती...

वेध माझा ऑनलाइन - गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्या आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेही शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. एकीकडे नारायण राणे यांच्या मुंबईतील घरावर महापालिका कारवाई करण्याच्या तयारीत असतानाच दुसरीकडे राणे कुटुंबीयांचा मालवण जिल्ह्यातील नीलरत्न बंगल्यावर हातोडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

केंद्रातील मोदी सरकारने यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. मालवण जिल्ह्यातील चिवला समुद्रकिनाऱ्यावर राणे कुटुंबीयांचा नीलरत्न हा बंगला आहे. हा बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये ही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

नारायण राणेंच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबई महापालिकेने बंगल्यावर कारवाईची तयारी केल्याने आक्रमक झालेले राणे कुटुंबीय या प्रकरणात काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे. दुसरीकडे, नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याबाबत कारवाई करण्याबाबत मुंबई महापालिकेची हालचाल सुरू झाली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी राणेंच्या बंगल्याची पाहणी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राणेंच्या बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोसबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या नोटिसीनंतर नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपूत्र आक्रमक झाले होते. नारायण राणे यांनी आपल्या बंगल्यात एका इंचाचेही अनधिकृत बांधकाम नसल्याचा दावा केला होता. तर नितेश राणे यांनी पालिकेच्या नोटीसला योग्यवेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे म्हटले होते.

संतापजनक बातमी ; पाटणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार ...9 जण अटकेत...पाटण तालुका हादरला...

वेध माझा ऑनलाइन -  येथील अल्पवयीन व मतीमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पाटण तालुका हादरला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील एका महिलेने 27 जानेवारी 2022 ते 18 फेब्रुवारी 2022 या दरम्यान तिच्या परिचयाच्या एका अल्पवयीन व मतीमंद मुलीचा गैरफायदा घेऊन तिला बाहेर फिरायला नेण्याचे, बाहेर खाऊ खायला देण्याचे व पैसे देण्याचे आमिष दाखवून तिला बाहेर घेऊन जाऊन तिची पाटण व आजूबाजूचे परिसरातील लोकांशी ओळख करून देऊन त्यांचेशी शरिर संबंध ठेवण्यास भाग पाडले. पाटण व आजूबाजूच्या परिसरातील आठ लोकांनी सदर अल्पवयीन व मतीमंद पिडीत मुलीवर वेळोवेळी व वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार बलात्कार केला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पाटण पोलीस करत आहेत.

Sunday, February 20, 2022

आज जिल्ह्यात 50 बाधीत 25 डिस्चार्ज...

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 50 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 25 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 9 खंडाळा 3 खटाव 6 कोरेगांव 6 माण 3 महाबळेश्वर 0 पाटण 3 फलटण 6 सातारा 9 वाई 1 व इतर 4 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण  50 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 25 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

मन गुतल' अल्बम सॉंग सोमवारी होणार रिलीज लेखक, दिग्दर्शक अभिषेक सकटे यांची माहिती : ग्रामीण भागातील युवकांची कलाकृती...

वेध माझा ऑनलाइन - ग्रामीण भागातील युवक कलाकारांनी एकत्र येत 'मन गुतल' या अल्बम सॉंगची निर्मिती केली आहे. हे सॉंग उद्या सोमवारी 21 रोजी कराड येथून 'चेतन गरुड प्रॉडक्शन' या युट्युब चॅनेलवर रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती लेखक, दिग्दर्शक अभिषेक सकटे यांनी दिली. 

         येथील हॉटेल अलंकार येथे रविवारी 20 रोजी 'मन गुतल' या अल्बम सॉंगच्या रिलीज कार्यक्रमाबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गायिका व अभिनेत्री साक्षी कालवडेकर, अभिनेता रोहन यादव यांच्यासह मन गुतल'ची संपूर्ण टीम उपस्थित होती.

        सकटे म्हणाले, आम्हा सर्व कलाकारांना कोणताही कलेचा वारसा नाही. परंतु, धेय्याने, जिद्दीने झपाटलेल्या आम्ही सर्व ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील कलाकारांनी प्रत्येकाची कला पारखून ही टीम तयार केली आहे. हे अल्बम सॉंग तयार करण्यासाठी आम्हाला कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेक अडचणी आल्या. मात्र, सर्व कलाकारांच्या घरच्यांनी सपोर्ट केल्यामुळे आम्ही तब्बल 6 महिन्यांनंतर या सॉंगचे रेकॉर्डिंग पूर्ण करून उद्या ते रिलीज करत आहोत. याचा आम्हाला आनंद आहे. ‘शहरी व ग्रामीण भागातील युवकांची प्रेमकहाणी’ ही या सॉंगची थीम असून ती नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच सोमवारी 21 रोजी 'चेतन गरुड प्रोडक्शन' या यूट्यूब चॅनलवर जाऊन सर्वांनी हे सॉंग आवश्यक पहावे. त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक व सबस्क्राईबही करावे, असे आवाहनही लेखक, दिग्दर्शक सकटे यावेळी केले. 

संगीत व अभिनयाची सुरुवातीपासून आवड होती. ही कला जोपासण्यासाठी व त्याचे व्यवसायात रुपांतर करण्यासाठी सर्व कुटुंबियांनी पाठबळ दिले. प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलींवर अनेक बंधने असतात. मात्र, ते झुगारण्याचे आव्हान पेलण्यासाठी कुटुंबीयांनीच बळ दिल्याने आज तिथपर्यंत पोहोचता आले. भविष्यात संगीत विशारदचे क्लासेस घेणार असून ग्रामीण कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

साक्षी कालवडेकर (गायिका, अभिनेत्री)

आपली कला जोपासत ती चित्र वाहिनी आणि चित्रपट स्तरापर्यंत नेण्याची सुरुवातीपासून जिद्द बाळगली. आज त्याला यश आले असून 'मन गुतल' हे त्या दर्जाचे अल्बम सॉंग तयार केले आहे. ते नक्कीच प्रेक्षकांची दाद मिळवेल, यात शंका नाही. तसेच यापुढेही दर्जेदार कलाकृती बनवून गरुडझेप घेण्याचे आमचे धेय्य आहे.

रोहन यादव (अभिनेता)

आनंदराव पाटील यांचे वाढदिवसानिमित्त दत्त चौकात पोस्टर ; पोस्टरवर पृथ्वीराज बाबांच्या विरोधकांना स्थान ; स्वर्गीय प्रेमलाकाकी चव्हाण यांचाही पोस्टरवर फोटो ; यातून नेमक नानांना सुचवायचय काय ? आणि कोणाला ? कशासाठी ? कराडात जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाइन - नुकताच माजी आमदार आनंदराव पाटील नाना यांनी आपला वाढदिवस साजरा केला यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देणारे पोस्टर येथील दत्त चौकात लागले आहे यावरून अनेक चर्चा सध्या गावात सुरू आहेत त्या पोस्टरवर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व मंडळींना नानांनी शुभेच्छा देणार्यामध्ये स्थान दिले आहे तर दुसरीकडे स्व प्रेमलाकाकी चव्हाण यांचाही फोटो त्याठिकाणी आहे म्हणजेच नानांनी हे पोस्टर लावून एकप्रकारे  दोन्ही बाजूने ढोलकी वाजवली असली तरी नेमका यामागचा अर्थ काय घ्यायचा ? हीच चर्चा आहे

माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांचा वाढदिवस नुकताच झाला त्यांना शुभेछ्या अनेक प्रकारे अनेक माध्यमांद्वारे देण्यात आल्या येथील दत्त चौकात त्यांना शुभेच्छा देणारे जे पोस्टर लावले आहे यातून नानांना कोणाला आणि काय सुचवायचं आहे हाच प्रश्न आहे... आ पृथ्वीराज चव्हाण यांची सावली म्हणून ओळख महाराष्ट्रात ज्यांना मिळाली ते नाना आता पृथ्वीराज बाबांच्या विरोधकांना जाऊन मिळालेत !  असे असले तरी या विषयावर स्वतः पृथ्वीबाबा एका शब्दाने बोलत नाहीत... तर या विषयाला त्यांच्या ड्रीष्टोने फार महत्व नाही असे दाखवत पुढचा विषय चर्चेत घेतात असा पत्रकार परिषदेत अनेकदा अनुभव आला आहे... बाबा मुख्यमंत्री असताना आनंदराव नाना याना शॅडो मुख्यमंत्री म्हटले जायचे... मग असे काय घडले की ज्यामुळे आज त्यांच्या पोस्टरवर बाबाना  विधानसभेला पराभूत करण्यासाठो प्रयत्न करणारी सर्व मंडळी दिसतेय...? याबाबत येथील काही बाबा समर्थक काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधण्याचा नानाकडून प्रयत्न झाला खरा...पण बाबानी त्याकडे दुर्लक्ष केले...आणि नानापासून फारकत घेतली... आता नाना स्वतः भाजप मध्ये नसले तरी अतुल भोसलेंच्या भाजपशी जवळीक करून आहेत ...घार उडते आकाशी...लक्ष तिचे पिलापाशी असे प्रिथ्वीबाबाच्या नेतृत्वाबद्दल बोलताना नाना नेहमी म्हणायचे...आता नानांची घार बदलली आहे...ती आता  भाजपची झाली आहे... त्यामुळे आता या घारीचे कौतुक करण्यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने नानांची पोस्टरबाजी आहे ?  अशीही चर्चा आहे  पृथ्वीबाबांजवळ असताना आपले स्वतःचे लॉबिंग देखील त्यांनी केले होते... त्यामुळे तिथे जे कोणी नाना-नाना म्हणत आनंदराव यांच्या मागे फिरताना दिसत होते तेही आज बाबांना सोडून नानांबरोबर दिसत आहेत... दत्त चौकात लावलेल्या पोस्टरवरून आपल्या चालू राजकारणाचे गणित नानांनी  दाखवत काँग्रेसला डिवचलय ?...की त्यातून थेट अतुलबाबांना भविष्यात आपलेच चॅलेंज असेल असे सुचवले आहे ? याचीही चर्चा आहे...
या चर्चा होण्यामागे अनेक तर्कही आहेत...

आमदार म्हणून आपला कालावधी पूर्ण केल्यानंतर नाना फारसे राजकारणात दर्शनी सक्रिय दिसत नसले तरी पडद्यामागे ते सक्रिय असतातच... त्यांनी राजकारणातील आपली निवृत्ती जाहीर केलेली नाही... म्हणजेच योग्य संधीच्या शोधात ते आहेत... त्यासाठी त्यांनी सध्या भोसले गटाच्या भाजपशी संधान बांधले आहे.. आपला गट शाबूत ठेवण्यासाठी त्यांनी अतुलबाबाना आमदार करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सर्वश्रुतच आहे... मात्र राजकीय महत्वकांक्षा असणारे नाना कायमच अतुलबाबाना आमदार करण्यासाठी प्रयत्न करतील असे होणार नाही... त्यांनाही आमदार व्हायचं आहे? हे नाकारून चालणार नाही त्यासाठी ते योग्य संधी साधतील याबाबत देखील शंका नको... 

नाना स्वतः अद्याप भाजप मध्ये गेले नसले तरी त्यांचे अनुयायी भाजप चे काम करताना उघड दिसत आहेत... त्यामुळे योग्य वेळी आनंदराव भाजप मध्ये प्रवेश करून कराड दक्षिण मधून उमेदवारी मागतील का? तसा शब्द घेऊनच ते भाजप मध्ये प्रवेश करतील का? याचीही चर्चा आहे... अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमध्ये भाजप तळागाळात पोचवली हे सत्य आहे मात्र त्यांचा सलग दुसऱ्यांदा झालेला पराभव त्यांना आता तिसर्यादा संधी मिळवून देईल का? हाही प्रश्न आहेच...त्यामुळे याठिकाणी भाजपचा शब्द घेऊन आपल्याला संधी मिळाल्यास भाजप प्रवेश करण्याच्या मानसिकतेत आनंदराव नाना आहेत का? आणि म्हणून ते अतुल भोसले यांच्या भाजपशी जवळीक करून असावेत का? अशीही चर्चा आहे...म्हणजे भाजपकडून तसा विचार झाल्यास आपला पक्षप्रवेश करून दक्षिणमधील भाजपचे झालेले तयार ग्राउंड... भोसलेंची मदत आणि प्रिथ्वीबाबा विरोधी ताकदीची बेरीज करून आपण काँग्रेस विरोधात याठिकाणी आमदार होऊ शकतो ? असा  समज करून घेऊन नानांनी भोसलेंच्या  जवळीकीची गणिते मांडली आहेत का?  अशा अनेक चर्चा दत्त चौकातील पोस्टरवरून शहर व तालुक्यात रंगल्या आहेत यातून ते एका दगडात दक्षिणमधील दोन्ही "बाबा'चे राजकारण टिपण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशाही चर्चा आहेत...


विधिमंडळ अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा फक्त वर्तमानपत्रातूनच - आ पृथ्वीराज चव्हाण यांचे स्पष्टीकरण...

वेध माझा ऑनलाइन - माझ्या नावाची विधिमंडळ अध्यक्षपदासाठीची चर्चा ही फक्त वर्तमानपत्रातील चर्चा आहे ते पद बरेच दिवस रिक्त आहे काँग्रेसकडेच ते पद असल्याने पक्षश्रेष्टी त्याबाबतीत योग्यवेळी तेे कोणाला द्यायचे हा निर्णय घेतील असे स्पष्ट वक्तव्य आ पृथ्वीराज चव्हाण यांनी आज यथे पत्रकार परिषदेत केले यावेळी त्यांनी विबिध विषयाला स्पर्श करत पत्रकारांकरांच्या प्रश्नाला उत्तरे दिली

कराड पालिकेची निवडणूक ओबीसी आरक्षणाचा निर्णय कोर्टात प्रलंबित आहे तो झाल्या नंतर   होईल असे स्पष्ट करत काल येथील शनिवार पेठेतील वेश्या वस्तीत लागलेल्या आगीसंदर्भात आपण  प्रशासनाला तेथील लोकांच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी सूचना केल्या आहेत असेही ते म्हणाले त्या लोकांना तात्पुरते शाळा नंबर 3 मध्ये हलवण्यात आले असले तरी त्या लोकांना तिथे रहायचे नाही.. तर त्यांना पुनर्वसन हवे आहे... म्हणून त्यांच्या राहत्या ठिकाणीच त्यांना तंबू किंवा तत्सम काही सुविधा करण्याबाबत विचार करता येतील का हे आम्ही पाहतोय असेही ते म्हणाले

मोदींच्या महाराष्ट्रमुळे कोरोना वाढला या वक्तव्याचा समाचारही त्यांनी यावेळीं घेतला ते म्हणाले मोदिनी हे वक्तव्य कोरोना स्थिती हाताळताना त्यांना आलेल्या अपयशातून वैफल्यग्रस्त होऊन केले असावे मात्र चीड आणणारे हे वक्तव्य आहे... वाईन विक्री बाबत सर्वत्र विरोध होत असताना राज्य सरकारने याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही असे सांगत लोकांनी याविषयी आपली मते नोंदवलयानंतर त्याचा विचार होऊन याबाबत काय तो अंतिम निर्णय होईल असेही ते म्हणाले

किरीट सोमय्यांसारखे लोक राजकारणातून संपतील ; संजय राऊत यांचा हल्लाबोल...

वेध माझा ऑनलाइन - अनेक दिवसांपासून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गंभीर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेण्याआधी सोनिया गांधींची परवानगी घेतली आहे का, असा खोचक टोला लगावला होता. यासंदर्भात संजय राऊत यांना विचारले असता, देशाच्या राजकारणात बदल घडत आहेत. वर्ष २०२४ नंतर देशात स्वच्छ आणि पारदर्शी सरकार येणार आहे. त्यामुळे सोमय्यासारखी लोकं राजकारणातून संपतील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबाबत असे वक्तव्य करणे हा राज्याचा अपमान आहे. राज्यातील नागरिकांचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्याला केंद्र सरकार सुरक्षा देते, या शब्दांत संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्लाबोल केला.

बिगर भाजप राजकारणाबाबत विचार 

बिगर-भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत. तेलंगणचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. आम्ही सर्वजण तिथे उपस्थित राहणार आहोत. देशाच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव, स्टॅलिन किंवा मग उद्धव ठाकरे असो. बिगरभाजपा सरकारे असणारी राज्ये एकत्रित बसून देशातील आगामी राजकारणाबाबत विचार करत आहेत. शरद पवार सर्वात मोठे नेते असून आमचे मार्गदर्शक आहेत, असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, एक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटायला येत असताना अशाप्रकारे भाजपावाल्यांनी अपमान करणे हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा, मराठी लोकांचा अपमान आहे. म्हणूनच मी त्यांच्याबाबत अपशब्द काढले. अशा लोकांना केंद्र सरकार सुरक्षा देते हादेखील अपमान आहे, असे सांगत संजय राऊत यांनी आपल्या विधानाचे समर्थन केले आहे.

Saturday, February 19, 2022

दिलासादायक...राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटतेय...

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 1 हजार 635 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दोन दिवसांपासून   रुग्णसंख्या स्थिर असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 29 तासात 4 हजार 394  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद  नाही

राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही आतापर्यंत 4456 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 3334 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 1,122 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत

राज्यात आज  29 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आज 29 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख  91 हजार 064 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.89 टक्के आहे.  सध्या राज्यात  2 लाख 22 हजार 920 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1081  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 71 लाख 29 हजार 145 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

शनिवारी मुंबईत 201 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईत 201 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचकालावधीत 345 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसंच कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2870 दिवसांवर आला आहे.  मंगळवारी कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2407 इतका होता.  त्यामुळे सातत्याने मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे.