Wednesday, February 23, 2022

महाविकास आघाडीने ईडीच्या कारवाईविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा घेतला निर्णय ; आघाडीचे सर्व मंत्री, नेते उद्या गुरुवारी करणार आंदोलन...

वेध माझा ऑनलाइन - मनी लाँड्रिंग प्रकरणाचा आरोप ठेवून ईडीने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने आता ईडीच्या कारवाईविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीचे सर्व मंत्री, नेते उद्या गुरुवारी आंदोलन करणार आहे.

नवाब मलिकांच्या अटकमुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.  महाविकास आघाडीचे नेते, मंत्री उद्या गुरुवारी सकाळी 10 वाजता मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध करणार आहे.   तीनही पक्षांचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्ते मंत्रालयाच्या बाजूलाच असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेधासाठी जमणार आहे. ईडीच्या या कारवाईविरोधात महाविकास आघाडी म्हणून सत्ताधारी एकत्र येणार आहे. नवाब मलिक यांच्या कारवाई विरोधात महाविकास आघाडीने निषेधाचा पवित्रा घेतला आहे.

No comments:

Post a Comment