वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या वादात उडी घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. एवढंच नाहीतर दिशा सॅलियनचा बलात्कार झाल्याचा पुन्हा एकदा आरोप केला. या प्रकरणी शिवसेनेच्या नेते आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणेंविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात दिशा सॅलियन प्रकरणावरून नारायण राणे यांनी भाष्य केल्यामुळे कारवाई करण्याची मागणी केली आहे.
'सुशात सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने पूर्ण केला आहे. सीबीआयने दिशा सॅलियन प्रकरणाचाही तपास पूर्ण केला असून तिच्यावर बलात्कार झाला नाही, ती गरोदर सुद्धा नव्हती, असं तिच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. तिच्या आई-वडिलांनी सुद्धा या अहवालाला दुजोरा दिला आहे. एवढंच नाहीतर तिच्या आई-वडिलांनी मुलीच्या मृत्यूनंतरही बदनामी होत असल्याची तक्रार दिली आहे. तरीही नारायण राणे यांनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन बलात्कार आणि हत्या झाल्याचे आरोप करत आहे, हे थांबवले पाहिजे, दिशाची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पेडणेकर यांनी पत्रातून केली आहे.
काय म्हणाले होते राणे?
दोन दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी, सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूवरही भाष्य करत नारायण राणे यांनी खळबळजनक दावा केला होता.
8 जून रोजी दिशा सालियनची हत्या झाली. का करेल ती आत्महत्या? एकतर ती पार्टीला जात नव्हती. जबरदस्ती बोलवलं. त्यानंतर ती थांबत नव्हती, घरी जायला निघाली होती. त्यानंतर कोण-कोण होते? पोलीस संरक्षण कोणाला होतं? तिच्यावर वाईट कृत्य होत असताना बाहेर संरक्षण कोणाचं होतं. सालियनचा पोस्टमार्टम रिपोर्ट अजून आला नाही, का नाही आला? सात महिन्यात यायला हवा होता. दिशा सालियन ज्या इमारतीत राहत होती त्या इमारतीच्या रजिस्टरमधील 8 जूनची पाने कोणी फाडली? कोणाला इन्ट्रेस्ट होता.
त्यानंतर दिशा सालियनबाबत सुशांतसिंगला जेव्हा कळालं तेव्हा तो कुठे तरी बोलला की मी यांना सोडणार नाही. त्यानंतर काहीजण त्याच्या घरी गेले. दिशा सालियनच्या मुद्द्यावरुन बाचाबाची झाली. त्यात बिचाऱ्या सुशांतची हत्या करण्यात आली. तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती? त्या इमारतीचं त्या दिवशीचं सीसीटीव्ही गायब कसे झाले? आधी सीसीटीव्ही होते असं सोसायटीचे लोक सांगतात. ठराविक माणसाची रुग्णवाहिका कशी आली, रुग्णवाहिका कोणी आणली? रुग्णालयात कोणी नेलं, पुरावे कुणी नष्ट केले? या सर्वांची चौकशी होणार, असंही नारायण राणे म्हणाले.
त्यात कोणते अधिकारी होते ते सुद्धा आता तिकडे राहिले नाहीत. ते उघडं करतील आता सगळं, हा महाराष्ट्र? अशा रितीने? कलाक्षेत्रात चांगली संधी आहे म्हणून देशभरातून कलाकार मुंबईत येतात. अशा एका तरुण कलाकाराची हत्या केली. कोणी केली? जुन्या काही घटना आठवतात अशा काही हत्येत आरोपी सापडले नाहीत, असंही नारायण राणे म्हणाले.
No comments:
Post a Comment