Monday, February 28, 2022

यावर्षीचे कराड पालिकेचे अंदाजपत्रक प्रशासक तथा मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले मंजूर ; अंदाजपत्रक 184 कोटी 41 लाखांचे ; यात कोणतीही करवाढ केली नाही ; नागरिकांना दिलासा...


वेध माझा ऑनलाइन -कराड 
नगरपालिकेचे सन 2022-23 या वर्षीचे अंदाजपत्रक प्रशासक तथा मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी नगरपालिका विभाग प्रमुखांच्या बैठकीत मंजूर केले. हे अंदाजपत्रक 184 कोटी 41 लाखांचे असून यात कोणतीही करवाढ केली नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये सांगताना मुख्याधिकारी रमाकांत डाके म्हणाले की, अर्थसंकल्पात कोणतेही कर वाढ नाही. पाणीपट्टी एप्रिल पासुन तोटा भरून काढण्याच्या दृष्टीने मीटर पद्धतीने पाणीपट्टीची आकारणी होणार आहे. MSEB कडून 2.5 कोटी वसुली त्यामुळे उत्पन्नात वाढ होणार आहे. भुयारी गटर योजना पुर्ण करुन घेण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. डिसेंबर २०२० पूर्वीच्या अनाधिकृत विकासांचे गुंठेवारी विकास अधिनियम अन्वये नियमितीकरण करण्यात येणार त्यामुळे वाढीव भागातील अनाधिकृत बांधकामे नियमित होण्यास मदत होणार आहे.

मालमत्तांचे रीअसेसमेंट होणार त्यामुळे मालमत्ता करातून सुटलेल्या इमारतींना कर लागणार. अनाधिकृत इमारतींना कराचे शासकीय लागून उत्पन्न वाढण्यास मदत होणार तर  मुदत संपलेल्या गाळ्यांचे फेर लिलाव होणार, त्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. अग्निशमन विभागांचे सक्षमीकरण होणार, आपत्ती व्यवस्थापन जलदगतीने व चांगल्या पद्धतीने होण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

आरक्षणे विकसित करणे याकरिता वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत तरतूद, आरक्षणे संपादन करण्यासाठी जिल्हास्तर नगरोत्थान व राज्यस्तर नगरोत्थान या योजनेद्वारे निधी प्राप्ती साठी तरतूद, राज्यस्तर नगरोत्थान योजनेंतर्गत पाणीपुरवठा व ड्रेनेज योजनेचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न, अपारंपरिक उर्जा अंतर्गत सोलर उर्जेचा वापर वाढून वीज बचतीचा प्रयत्न होणार आहे, प्रथमच माजी सैनिक कल्याणकारी योजनेमध्ये ३ लाख रुपयेची तरतूद करण्यात आली आहे. D.P.D.C. अतर्गत कर्मचारी निवासी संकुले उभारणीसाठी १५ कोटीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे

No comments:

Post a Comment