Thursday, February 17, 2022

पहिल्याच सामन्यात मुख्याधिकारी टीमचा "जय हो'... पालिका कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धांमध्ये सहभाग...मुख्याधिकारी डाके यांची प्रतिक्रिया...प्रतिवर्षीप्रमाणे पालिका कर्मचारी वर्गाकडून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन...


वेध माझा ऑनलाइन - डॉ 
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील पालिकेनजीक असणाऱ्या डॉ आंबेडकर क्रीडा मैदानावर कराड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याकडूूून या क्रकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आरोग्य अभियंता आर डी भालदार,अभियंता ए आर पवार,आरोग्य निरिक्षक मिलिंद शिंदे, नगरपरिषदचे वरीष्ठ मुकादम मारुती काटरे  तसेच सर्व स्टाफ उपस्थित होता. 
प्रतिवर्षी प्रमाणे याहिवर्षी सामन्याला सुरुवात झाली आज पहिल्याच दिवशी झालेल्या सामन्यात मुख्याधिकारी डाके यांच्या टिम विरुद्ध शुक्रवार पेठ सफाई कामगार यांच्या टीमचा सामना झाला यामध्ये मुख्याधिकारी टीमने विजय मिळवला तसेच अस्थापना विभाग विरुद्ध सफाई कामगार असा सामना झाला असता त्यामध्ये सफाई कामगार टिमने विजय मिळवला आजच्या सामन्यांचे हे रिझल्ट असले तरी आता याठिकाणी काही दिवस रोज सामने होणार असल्याने क्रिकेट प्रेमींना ही पर्वणीच ठरणार आहे 
दरम्यान पालिका कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाबरोबरच खेळामध्येही अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धांमध्ये आपला  सहभाग असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी डाके यांनी दिली आहे

No comments:

Post a Comment