वेध माझा ऑनलाइन - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर युक्रेननं आपले एयरस्पेस बंद केलेत. दरम्यान आताच समोर आलेल्या युक्रेनियन सैन्याच्या शस्त्रांनी भरलेल्या गोदामात स्फोट झाला आहे. या स्फोटाचा व्हिडिओ समोर आला आहे.
रशियन हल्ल्यादरम्यान युक्रेनला भीती वाटत आहे की त्यांच्याकडे येणाऱ्या विमानांवर सायबर हल्ला होऊ शकतो. याशिवाय नागरी उड्डाणांना लक्ष्य करून गोळीबार होण्याचाही धोका आहे. युक्रेन स्टेट एअर ट्रॅफिक सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, धोका लक्षात घेऊन युक्रेनमधील एयरस्पेस गुरुवारी नागरी उड्डाणांसाठी बंद करण्यात आलं आहे.
एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलमधील तेल अवीव येथून कॅनडातील टोरंटोला जाणाऱ्या विमानानं रात्री उशिरा युक्रेनच्या हवाई क्षेत्रातून अचानक यू-टर्न घेतला. या घटनेनंतर उड्डाणांबाबत सतर्कता आणखी वाढवण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment