वेध माझा ऑनलाइन - बारामतीच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री चषक 2022 क्रिकेट स्पर्धेत कराडच्या अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान संघाने द्वितीय क्रमांक पटकवत कराडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे
यावेळी अंतिम सामन्यात 109 धावाचे लक्ष होते प्रतिष्ठानने 105 धावांपर्यंत मजल मारली व द्वितीय क्रमांक पटकावला हा अंतिम सामना पाहण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा हजर होते एकूण 15000 प्रेक्षकांनी या सामन्याचा आनंद लुटला दरम्यान,अतुलदादा प्रतिष्ठानच्या या घवघवीत यशाचे कराडसह संपूर्ण राज्यभरातून कौतुक होत आहे युवा नेते अतुल शिंदे यांचे देखील सर्वत्र अभिनंदन होत आहे
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती येथे उपमुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते राज्यभरातून एकूण 32 संघांची त्याकरिता निवड करण्यात आली होती त्यामध्ये कराडच्या अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान संघाचीही निवड करण्यात आली होती या संघाने अंतिम फेरीपर्यंत आपली मजल मारत मॅन ऑफ दि सिरीज तसेच उत्कृष्ठ गोलंदाज चे विशेष बक्षीस जिंकत स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला अतुलदादा शिंदे प्रतिष्ठानने मिळवलेल्या या यशाने कराडची मान राज्यात अभिमानाने उंचावली आहे कराडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे दोन लाख पन्नास हजार रोख व चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे हा पुरस्कारसोहळा बारामती येथे नुकताच पार पडला युवा नेते अतुल शिंदे स्वतः या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेले होते त्यांच्या समवेत युवक राष्ट्रवादीचे कराड शहर अध्यक्ष युवा नेते पोपटराव साळुंखे,राजू शिंदे,अनिल धोत्रे,सागर पाटील,अधिक शिंदे,रमेश गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते
No comments:
Post a Comment