वेध माझा ऑनलाइन - काही दिवसांपूर्वी येथील जुन्या कोयना पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरुणाचा येथील शाहू चौक मित्रपरिवाराच्या वतीने आज शिवजयंतीचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला सदर तरुणाचे नाव अनिकेत प्रकाश शिंदे असून तो पाटण तालुक्यातील गारवडे येथील रहिवासी आहे
तसेच शनिवार पेठ येथील वेश्या वस्तीत काल आग लागलेल्या घरातील स्त्रिया व लहान मुलांना जीवाची बाजी लावून वाचवणाऱ्या होमगार्ड सुहास संपत देवकर रा.किरपे यांचाही सत्कार शाहू चौक मित्रपरिवाराने आज केला डॉ.रणजित पाटील (d.y.s.p. कराड) व बी.आर.पाटील,(वरिष्ठ पोलीस निरीक्षक) यांचे हस्ते हा सत्कार करण्यात आला यावेळी शाहू चौक मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
दरम्यान या ग्रुपने कोरोना काळात मोठे काम केले आहे मोफत जेवण वाटप असो... किंवा पेशंट ची बेड मिळवून देण्यासाहित सर्वतोपरी मदत करणे असो... किंवा मोफत धान्य वाटप मास्क सॅनिटायझर चे वाटप असो... या ग्रुपने आपली सामाजिक बांधिलकी नेहमीच जपली आहे आजही त्याचेच प्रत्यंतर देत शाहू चौक मित्रपरिवाराने दोन शूरवीरांचा सत्कार करत एक प्रकारे आपला आदर्शच निर्माण केला आहे
No comments:
Post a Comment