वेध माझा ऑनलाइन - नुकताच माजी आमदार आनंदराव पाटील नाना यांनी आपला वाढदिवस साजरा केला यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देणारे पोस्टर येथील दत्त चौकात लागले आहे यावरून अनेक चर्चा सध्या गावात सुरू आहेत त्या पोस्टरवर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व मंडळींना नानांनी शुभेच्छा देणार्यामध्ये स्थान दिले आहे तर दुसरीकडे स्व प्रेमलाकाकी चव्हाण यांचाही फोटो त्याठिकाणी आहे म्हणजेच नानांनी हे पोस्टर लावून एकप्रकारे दोन्ही बाजूने ढोलकी वाजवली असली तरी नेमका यामागचा अर्थ काय घ्यायचा ? हीच चर्चा आहे
माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांचा वाढदिवस नुकताच झाला त्यांना शुभेछ्या अनेक प्रकारे अनेक माध्यमांद्वारे देण्यात आल्या येथील दत्त चौकात त्यांना शुभेच्छा देणारे जे पोस्टर लावले आहे यातून नानांना कोणाला आणि काय सुचवायचं आहे हाच प्रश्न आहे... आ पृथ्वीराज चव्हाण यांची सावली म्हणून ओळख महाराष्ट्रात ज्यांना मिळाली ते नाना आता पृथ्वीराज बाबांच्या विरोधकांना जाऊन मिळालेत ! असे असले तरी या विषयावर स्वतः पृथ्वीबाबा एका शब्दाने बोलत नाहीत... तर या विषयाला त्यांच्या ड्रीष्टोने फार महत्व नाही असे दाखवत पुढचा विषय चर्चेत घेतात असा पत्रकार परिषदेत अनेकदा अनुभव आला आहे... बाबा मुख्यमंत्री असताना आनंदराव नाना याना शॅडो मुख्यमंत्री म्हटले जायचे... मग असे काय घडले की ज्यामुळे आज त्यांच्या पोस्टरवर बाबाना विधानसभेला पराभूत करण्यासाठो प्रयत्न करणारी सर्व मंडळी दिसतेय...? याबाबत येथील काही बाबा समर्थक काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधण्याचा नानाकडून प्रयत्न झाला खरा...पण बाबानी त्याकडे दुर्लक्ष केले...आणि नानापासून फारकत घेतली... आता नाना स्वतः भाजप मध्ये नसले तरी अतुल भोसलेंच्या भाजपशी जवळीक करून आहेत ...घार उडते आकाशी...लक्ष तिचे पिलापाशी असे प्रिथ्वीबाबाच्या नेतृत्वाबद्दल बोलताना नाना नेहमी म्हणायचे...आता नानांची घार बदलली आहे...ती आता भाजपची झाली आहे... त्यामुळे आता या घारीचे कौतुक करण्यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने नानांची पोस्टरबाजी आहे ? अशीही चर्चा आहे पृथ्वीबाबांजवळ असताना आपले स्वतःचे लॉबिंग देखील त्यांनी केले होते... त्यामुळे तिथे जे कोणी नाना-नाना म्हणत आनंदराव यांच्या मागे फिरताना दिसत होते तेही आज बाबांना सोडून नानांबरोबर दिसत आहेत... दत्त चौकात लावलेल्या पोस्टरवरून आपल्या चालू राजकारणाचे गणित नानांनी दाखवत काँग्रेसला डिवचलय ?...की त्यातून थेट अतुलबाबांना भविष्यात आपलेच चॅलेंज असेल असे सुचवले आहे ? याचीही चर्चा आहे...
या चर्चा होण्यामागे अनेक तर्कही आहेत...
आमदार म्हणून आपला कालावधी पूर्ण केल्यानंतर नाना फारसे राजकारणात दर्शनी सक्रिय दिसत नसले तरी पडद्यामागे ते सक्रिय असतातच... त्यांनी राजकारणातील आपली निवृत्ती जाहीर केलेली नाही... म्हणजेच योग्य संधीच्या शोधात ते आहेत... त्यासाठी त्यांनी सध्या भोसले गटाच्या भाजपशी संधान बांधले आहे.. आपला गट शाबूत ठेवण्यासाठी त्यांनी अतुलबाबाना आमदार करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सर्वश्रुतच आहे... मात्र राजकीय महत्वकांक्षा असणारे नाना कायमच अतुलबाबाना आमदार करण्यासाठी प्रयत्न करतील असे होणार नाही... त्यांनाही आमदार व्हायचं आहे? हे नाकारून चालणार नाही त्यासाठी ते योग्य संधी साधतील याबाबत देखील शंका नको...
नाना स्वतः अद्याप भाजप मध्ये गेले नसले तरी त्यांचे अनुयायी भाजप चे काम करताना उघड दिसत आहेत... त्यामुळे योग्य वेळी आनंदराव भाजप मध्ये प्रवेश करून कराड दक्षिण मधून उमेदवारी मागतील का? तसा शब्द घेऊनच ते भाजप मध्ये प्रवेश करतील का? याचीही चर्चा आहे... अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमध्ये भाजप तळागाळात पोचवली हे सत्य आहे मात्र त्यांचा सलग दुसऱ्यांदा झालेला पराभव त्यांना आता तिसर्यादा संधी मिळवून देईल का? हाही प्रश्न आहेच...त्यामुळे याठिकाणी भाजपचा शब्द घेऊन आपल्याला संधी मिळाल्यास भाजप प्रवेश करण्याच्या मानसिकतेत आनंदराव नाना आहेत का? आणि म्हणून ते अतुल भोसले यांच्या भाजपशी जवळीक करून असावेत का? अशीही चर्चा आहे...म्हणजे भाजपकडून तसा विचार झाल्यास आपला पक्षप्रवेश करून दक्षिणमधील भाजपचे झालेले तयार ग्राउंड... भोसलेंची मदत आणि प्रिथ्वीबाबा विरोधी ताकदीची बेरीज करून आपण काँग्रेस विरोधात याठिकाणी आमदार होऊ शकतो ? असा समज करून घेऊन नानांनी भोसलेंच्या जवळीकीची गणिते मांडली आहेत का? अशा अनेक चर्चा दत्त चौकातील पोस्टरवरून शहर व तालुक्यात रंगल्या आहेत यातून ते एका दगडात दक्षिणमधील दोन्ही "बाबा'चे राजकारण टिपण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशाही चर्चा आहेत...
No comments:
Post a Comment