वेध माझा ऑनलाइन - मनी लाँड्रिंग प्रकरणाचा आरोप ठेवून ईडीने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. मलिक यांच्या अटकेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आहे. राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक घेतल्यानंतर शरद पवार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला रवाना झाला आहे. त्यामुळे यापुढे भाजपविरोधात मोठ्या निर्णयाची शक्यता आहे
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते हजर होते. तसंच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण सुद्धा हजर होते. या बैठकीमध्ये नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने ज्या प्रकारे सरकारी तपास यंत्रणाचा वापर केला आहे. त्याला चोख उत्तर देण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहे.
या बैठकीनंतर शरद पवार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्याकडे रवाना झाले आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला आहे तो निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानी घातला जाणार, अशी माहिती मिळत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अजित पवार पोहोचले आहे.
No comments:
Post a Comment