Tuesday, February 22, 2022

गृहराज्यमंत्र्यांच्या तालुक्यात अत्याचार वाढले ; महिला, लहान मुली असुरक्षित असतील तर मंत्रीपद काय चाटायचय.? संतप्त नागरिक चर्चा करू लागलेत...

वेध माझा ऑनलाइन - राज्याचे गृहराज्यमंत्री ना शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी आहे अल्पवयीन व मतिमंद मुलीवर हा चीड आणणारा अत्याचार झालाय आणि म्हणूूूनच गृहराज्यमंत्र्यांच्या तालुक्यातच स्त्रिया, मुली सुरक्षित नाहीत असा संदेश राज्यभर गेला आहे आणि ही बाब लाजिरवाणीच आहे

ना शंभूराज देसाई हे कार्यतत्पर आहेत असे त्यांचे समर्थक नेहमी सांगतात... मात्र अशा घडलेल्या घटना त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात... काही दिवसांपूर्वी त्याच तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता तिचा खून करून तिचा मृतदेह एका दरीत टाकण्यात आला होता...आणि आता ही दुसरी घटना... मग... कुठ आहे कायदा सुव्यवस्था पाटण तालुक्यात?महिला लहान मुली यांनी या तालुक्यात सुरक्षित रहायचं की नाही? कोण आहे यांचा वाली ? काय करतायत लोकप्रतिनिधी? मंत्रिपद असून तालुक्यातील महिला भयभीत रहात असतील तर त्या मंत्रीपदाला काय चाटायचय...? 

नामदार देसाई हे वाशीम जिल्ह्याचे देखील पालकमंत्री आहेत पण त्याही जिल्ह्यात त्यांचे काम दिसत नाही अशी चर्चा असते... त्याच जिल्ह्यात ऐन कोविड मध्ये पालकमंत्री दाखवा आणि एक रुपया मिळवा असे बोर्ड लागलेले संपूर्ण राज्याने पाहिले होते... म्हणजेच इथंही त्यांच्या कामाची बोंब... आणि तिकडेही तीच बॉम्ब... दिसते आहे... अशी आता चर्चा आहे 
दरम्यान,घडलेली सध्याची पाटण तालुक्यातील घटना एवढी भयानक आहे की सलग 20 दिवस या घटनेतील 8 आरोपी या अल्पवयीन मतिमंद मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करत होते आणि माणुसकीला काळिमा फासला जात होता... एका महिलेची मदत घेत या आठ जणांनी हा अत्याचार केलाय...गृहराज्यमंत्रीपद पाटण तालुक्याला आहे आणि येथील पोलिसांना या घटनेची तब्बल 20 दिवस कुणकुण लागू नये? हे नवलच नाही का?  
बाईक वरून फेरफटका मारणे किंवा साताऱ्यात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी अटक झाला का?याची विचारणा करणे...या घटनेचे vdo  प्रसिद्ध करणे... असले उद्योग करून स्वतःच्या तालुक्यतील महिला सुरक्षित राहणार आहेत का?अत्याचाऱ्याच्या घटना थांबणार आहेत का? याचा विचार ना देसाई यांनी करायला हवा... उठायचं की सायरन वाजवत कराड आणि साताऱ्यातील गल्लीबोलातून फिरायचं...यापेक्षा आपल्या स्वतःच्या तालुक्यात महिलांवर जे अत्याचार चाललेत  याची खबरबात किमान गृह खात्याचे मंत्री म्हणून तरी त्यांनी ठेवली पाहिजे...
वाशीम जिल्ह्यात त्यांची निष्क्रियता दाखवणारे बोर्ड लागले... तसे सातारा जिल्ह्यात लागणार नाहीत याची काळजी यापुढे त्यांनी घेतली पाहिजे अशीही आता चर्चा आहे...

No comments:

Post a Comment