वेध माझा ऑनलाइन - तेल कंपन्या मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती गॅस किमतीबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 1 मार्च रोजी एलपीजी गॅस सिलेंडरचे दर पुढील एक महिन्यासाठी काय असतील, याबाबत उद्या निर्णय होईल. दर महिन्याच्या 1 तारखेला तेल आणि घरगुती गॅसच्या दरात बदल होतात. घरगुती गॅसच्या किमतीबाबत पेट्रोलियम कंपन्या निर्णय घेतात. यावेळी या किमतींवर रशिया आणि युक्रेनमधील संकटाचाही परिणाम दिसू शकतो. रशिया आणि युक्रेनच्या परिस्थितीचा आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान जगभरातील अनेक देशात गॅसच्या किमतीत वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. चार-पाच दिवस आधी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 101 डॉलर बॅरल झाल्या आहेत. अशात ऑइल-गॅस तज्ञांनुसार, भारतात पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीही वाढू शकतात. याचा परिणाम अनेक सेक्टर्सवर होऊ शकतो.
आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीनुसार तेल आणि घरगुती गॅसचे दर वाढवले आणि कमी केले जातात. परंतु फेब्रुवारीमध्ये 5 राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. आता आंतरराष्ट्रीय बाजारात तेल दरात वाढ झाली आहे, यामुळे भारतावरही याचा परिणाम होऊ शकतो.
No comments:
Post a Comment