Saturday, February 19, 2022

पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडून कराडातील आग लागलेल्या परिसराची पाहणी...

वेध माझा ऑनलाइन - 
येथील स्टँड नजीक असलेल्या वेश्या वस्तीत काल रात्री भीषण आग लागल्याने तेथील 24  घरे जळून खाक झाली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी त्या जळीत परिसराची आज पाहणी केली त्यावेळी बोलताना ना पाटील म्हणाले ज्यांच्या घराचे नुकसान झालं आहे याठिकाणचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे येथे असणाऱ्या दाट वस्तीमुळे आग वेगाने पसरली असे दिसत आहे प्रशासन यापुढील योग्यती कारवाई करेल शहरातील सामाजिक संस्थांनी या पीडित लोकांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे या लोकांच्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना ना पाटील यांनी यावेळी दिल्या पंचनामे पूर्ण झाल्यावर शासन स्तरावर याठिकाणी मदत दिली जाणारच आहे असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी पालकमंत्र्यांनी त्याठिकाणच्या स्थानिक लोकांकडून देखील घटनेची माहिती घेतली यावेळी गटनेते सौरभ पाटील तसेच राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment