Saturday, February 19, 2022

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

वेध माझा ऑनलाइन -  स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कराड शहरातील दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ मूर्तीला आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अभिवादन केले. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, इंद्रजित गुजर, कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर पोलीस निरीक्षक बी आर पाटील, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, ऍड अमित जाधव, दिलीप देशमुख, भास्कर देवकर, गजानन आवळकर, प्रशांत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रयतेसाठी खर्च केले. त्यांनी सांगितलेले आदर्श विचार आज प्रत्येक राज्यकर्त्यांनी अंगीकारणे आवश्यक आहे. रयत सुखी तरच राज्य सुखी अशी भावना शिवरायांची होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनच एवढे भव्य आहे कि, त्यांचे जेवढे अवलोकन करावे तेवढे कमीच आहे, ते दूरदृष्टीचे, संघटक, स्फूर्तीदाते, महा पराक्रमी असे सर्वगुण संपन्न होते त्यांच्या कुठल्याही गुणाला आजच्या काळातच नाही तर पुढील अनेक शतकात तोड नाही. अश्या भावना यावेळी आ. चव्हाण यांनी व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment