वेध माझा ऑनलाइन - मंत्री नवाब मलिक कराडच्या दत्त चौकात गेल्या दोन दिवसापासून झळकत असल्याचे पहायला मिळाले काल येथील भाजपने याचठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलन करत त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली तर आज महाविकास आघाडीने त्यांच्या बचावासाठी ईडी विरोधात येेथे आंदोलन केले म्हणजेच नवाब मलिक कराडच्या दत्त चौकात गेल्या दोन दिवसापासून झळकत आहेत असेच निमित्ताने पहायला मिळाले
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर सम्पूर्ण राज्यभर विविध चर्चा सुरू आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी अधिकारी समीर वानखेडेबाबत वेगवेगळ्या आरोपांची राळ उठवत राज्यभर खळबळ उडवून दिली होती त्याचवेळी भाजपलाही अंगावर घेत वानखेडे यांची बाजू घेण्याच्या भाजपच्या भूमिकेचाही त्यांनी समाचार घेतला होता तो विषय अजून ताजा असतानाच स्वतः मलिक हे एका जमीन व्यवहार प्रकरणी ईडी च्या ताब्यात आहेत मनी लोन्द्रीगच्या आरोपाखाली त्यांना नुकतीच अटक झाली असून त्यांना सध्या ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे या व्यवहार प्रकरणी त्यांचे कुख्यात गुंड दाऊद शी संबंध असल्याचे आरोप आहेत याविषयी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरू आहे दाऊद शी संबंध असणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या अशी भाजपची मागणी आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी मलिक यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत अशा कारवाई मुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचेही सांगत आहे आणि म्हणून ही आघाडी त्यांना पाठिंबा दर्शवणारी आंदोलने सर्वत्र करीत आहे
गेले दोन दिवस कराडच्या दत्त चौकात हीच दोन्ही आंदोलने पहायला मिळाली आणि याचनिमित्ताने याठिकाणी सलग दोन दिवस नवाब मलिकही चांगलेच झळकले
No comments:
Post a Comment