Friday, February 11, 2022

मुख्याधिकारी असावा तर असा...शहरात चर्चा...सी ओ डाके यांनी घेतली डॅशिंग भूमिका...महावितरणला पाठवली अडीच कोटींची नोटीस ; दिला कारवाईचा इशारा...

वेध माझा ऑनलाइन - कराड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शुक्रवारी महावितरणला अडीच कोटीच्या वसुलीची नोटीस पाठवली आहे महावितरण कँपणीचे खांब डी पी ट्रान्सफारमर पालिकेच्या जागेत उभे आहेत  या सर्व ठिकाणाहून महावितरण कडून पालिकेला कोणतेही उत्पन्न येत नाही म्हणून  डाके यांनी महावितरणला झटका देत 2 कोटी 50 लाख 90 हजार 800 रुपयांचे भाडे 15 दिवसात भरण्याचे आदेश दिले आहेत अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे

डाके हे प्रशासक म्हणून सध्या जोरात काम पाहताना दिसत आहेत त्यांनी शहराच्या पाणी प्रश्नाबाबतही डॅशिंग भूमिका घेत पालीकेच्या ढिसाळ कारभारामुळे पालिकेवर पडणाऱ्या आर्थिक बोजाविषयी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी देखील त्यांनी अशीच डॅशिंग भूमिका घेतली होतो 24 तास पाणी योजना अनेक वर्धे रखडली असताना त्यांनीच ती कार्यान्वित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत मधल्या काळात देखील Mseb ने पालिका हद्दीतील वृक्ष तोड केल्याबद्दल
 m s e b ला याअगोदरही आपला झटका देत दंडाच्या नोटीसीचा शॉक त्यांनी दिला आहे त्यातच काल त्यानी  येथील महावितरणला अडीच कोटींची पुन्हा दुसरी नोटीस देत कारवाईचा इशारा दिल्याने डाके यांच्या डॅशिंग भूमिकेची सध्या जोरदार चर्चा आहे

No comments:

Post a Comment