Friday, February 18, 2022

10वी, 12वी टर्म 1 चा निकाल या आठवड्यात होणार जाहीर...

वेध माझा ऑनलाइन - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) घेतलेल्या टर्म-1 परीक्षेत देशातील लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्या निकालाची ते आतुरतेने वाट पाहत आहेत. टर्म-१ च्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. CBSE वर्ग 10 आणि वर्ग 12 टर्म-1 चा निकाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. CBSE टर्म 1 च्या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये CBSE द्वारे 10 व 12 वीच्या वर्गासाठी घेण्यात आल्या होत्या.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या इयत्ता 10, 12 टर्म 1 च्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी रविवार, 20 फेब्रुवारीपर्यंत निकाल लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय. कारण बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने यापूर्वी दोन्ही इयत्तेसाठी निकाल जाहीर करण्याचे संकेत दिले होते. मात्र या आठवड्यात इयत्ता 10, 12 वी या दोन्ही वर्गांसाठी टर्म 1 चा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. एकदा निश्चित झाल्यावर बोर्ड निकालाची तारीख जाहीर करेल. दरम्यान, विद्यार्थ्यांना फक्त अधिकृत वेबसाइट्स फॉलो करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षा बोर्डाने पहिल्यांदा  10 वी आणि 12 वीच्या अंतिम परीक्षा दोन टर्ममध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला. 


No comments:

Post a Comment