Wednesday, February 16, 2022

महाराष्ट्रात होणार्या निवडणुका ओ बी सी आरक्षणाशिवाय नको ; ओबीसी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नवाज सुतार यांची मागणी

वेध माझा ऑनलाइन -  राज्य सरकारला विनंती आहे ओ बी सी  आरक्षणास मागील काही महिन्यांपासून स्थगिती दिली आहे त्यामुळे ओ बी सी समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे  राज्य सरकारकडून इंपरियल डेटा सादर करण्यास विलंब होत आहे  त्यामुळे ओ बी सी समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे  राज्य सरकारने ओ बी सी आरक्षणा संदर्भात जे काही कागदपत्रे सादर करायची आहेत ते सादर करून आरक्षणाचा विषय  संपवावा जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांना स्थगिती द्या  अन्यथा राज्याचे अध्यक्ष सादिक भाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रभर आंदोलन करणार असल्याचे ओबीसी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नवाज सुतार यांनी नूकतेच सांगितले आहे
याबाबतचे निवेदन कराडचे प्रांताधिकारी यांना देण्यात आले, यावेळी साजिद मुल्ला , जावेद नायकवडी , मोहसीन कागदी , समीर संदे साबिरमिया मुल्ला , समीर कुडची वसिमभाई शेख ,  शाहरुख मुजावर सरफराज सय्यद नजर मुल्ला आदी पदाधिकारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment