Sunday, February 13, 2022

पृथ्वीराजबाबांची लता मंगेशकर यांना श्रद्धांजली ; लता दिदींच्या मुंबईच्या निवासस्थानी जाऊन वाहिली श्रद्धांजली ; म्हणाले...दिदींच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे...असा दैवी आवाज पुन्हा होणे नाही...

वेध माझा ऑनलाइन - महान गायिका लता मंगशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला.त्यांना जगभरातील अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली राज्याचे माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन तिथे त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर व त्यांच्या भगिनी उषा मंगेशकर उपस्थित होत्या 

लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. अगदी काही दिवसांपूर्वी त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी बातमी आली होती. त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही काढला होता. पण 5 फेब्रुवारी रोजी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली त्यांचा त्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाला राज्यासह देश विदेशातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली नुकतीच राज्याचे माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन तिथे त्यांना श्रद्धांजली वाहिली
त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही त्यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे असा दैवी आवाज  पुन्हा होणे नाही अशा शब्दात आ चव्हाण यांनी लता दिदींना श्रद्धांजली वाहिली यावेळी लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर व त्यांच्या भगिनी उषा मंगेशकर उपस्थित होत्या

No comments:

Post a Comment